‘एअर स्ट्राईक’च्या ४३ दिवसांनंतर पाकने आंतरराष्ट्रीय माध्यमांना बालाकोट दाखवले !

‘एअर स्ट्राईक’ नंतर इतक्या दिवसांनी पाकने बालाकोट येथे प्रसारमाध्यमांना नेले, यावरून ‘पाकने आक्रमणात झालेली हानी लपवली’, हे स्पष्ट होते ! जर पाकला ‘येथे काहीच झाले नाही’, असे दाखवायचे असते, तर त्याने कारवाईच्या दुसर्‍याच दिवशी प्रसारमाध्यमांना तेथे नेले असते !

पाक सरकार तेथील ४०० मंदिरे हिंदूंच्या स्वाधीन करणार !

पाकला हिंदूंसाठी खरेच काही करायचे असेल, तर त्याने प्रथम हिंंदूंना सुरक्षा देऊन आतापर्यंत ज्या हिंदूंचे धर्मांतर झाले आहे, त्यांना त्यांच्या मूळ धर्मांत आणण्याचा प्रयत्न करावा, तसेच हिंदूंचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्‍या धर्मांधांना कठोरात कठोर शिक्षा करावी !

कथित विचारवंतांच्या हत्यांच्या प्रकरणी ठाणे येथील सनातनचे साधक हरि प्रभु यांची पोलिसांकडून चौकशी

सनातनच्या साधकांच्या मागे पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा चालूच : वारंवार चौकशी करून सनातनच्या निरपराध साधकांना नाहक छळणारे पोलीस जनतेला न्याय काय देणार ? अशी चौकशी जिहादी आतंकवाद्यांची केली असती, तर एव्हाना देश आतंकवादमुक्त झाला असता !

आंध्रप्रदेशमध्ये तेलुगू देसम् आणि वायएस्आर् काँग्रेस पार्टी पक्षांच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारीत एकाचा मृत्यू

हाणामारी करणारे कार्यकर्ते असणारे पक्ष कधीतरी कायदा आणि सुव्यवस्था राखतील का ? मतदानकेंद्रात कार्यकर्त्यांमधील हाणामारीही रोखू न शकणारे पोलीस निवडणुकीच्या वेळी आतंकवाद्यांनी आक्रमण केल्यास, ते कधी रोखू शकतील का ?

खडकी (पुणे) पोलिसांची हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला अमानुष मारहाण; प्रकृती गंभीर !

पोलिसांची मोगलाई ! आझाद मैदानातील दंगलीसारख्या घटनांत धर्मांधांकडून मुकाट्याने मार खाणारे  पोलीस हिंदूंवर मर्दुमकी गाजवतात, हे लक्षात घ्या ! असे हिंदुद्वेषी पोलीस जेव्हा धर्मांधांकडून मार खात असतील, तेव्हा अशा पोलिसांना वाचवावेसे हिंदूंना वाटेल का ?

ममता बॅनर्जी यांच्या सरकारला २० लाख रुपयांचा दंड !

राजकारणावर टीका असणार्‍या चित्रपटाचे प्रदर्शन रोखल्याचे प्रकरण : असे प्रदर्शन एखाद्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने रोखण्याचा प्रयत्न केला असता किंवा भाजप सरकारने केला असता, तर याच पुरो(अधो)गामी संघटनांनी आकाशपाताळ एक करण्याचा प्रयत्न केला असता !

सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना सूचना !

‘डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्यांच्या प्रकरणी पोलिसांकडून वारंवार साधक आणि कार्यकर्ते यांची चौकशी करण्यात येत आहे अन् चौकशीच्या नावाखाली त्यांचा नाहक छळ केला जात आहे. साधक आणि कार्यकर्ते यांनी हा चौकशीचा वृत्तांत त्वरित ‘सनातन प्रभात’च्या जवळच्या कार्यालयात पाठवावा.’

गुरुंवरील दृढ श्रद्धेच्या बळावर चिकाटीने साधना करून ठाणे येथील श्री. प्रसन्न ढगे आणि सौ. अर्चना अर्गेकर, तसेच मुंबईतील सौ. कल्पना कार्येकर अन् सौ. नमिता दुखंडे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

चैत्र शुक्ल षष्ठीचा दिवस (११ एप्रिल) मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांतील साधकांसाठी अविस्मरणीय ठरला !

इतरांना तत्परतेने साहाय्य करणारे आणि परात्पर गुरुदेवांवर अपार श्रद्धा असलेलेे ठाणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रसन्न ढगे (वय ५७ वर्षे) !

‘श्री. प्रसन्न ढगे मागील २० वर्षांपासून साधना करत आहेत. सध्या ते ‘दैनिक सनातन प्रभात’चे वितरक म्हणून सेवा करतात. त्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, तरीही ‘दैनिक सनातन प्रभात’प्रती असलेला भाव आणि परात्पर गुरु डॉक्टरांवरील अढळ श्रद्धा या बळावर ते ही सेवा करतात.

चिकाटीने आणि परिपूर्ण सेवा करणार्‍या मुंबई येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. कल्पना कार्येकर (वय ५३ वर्षे) !

१. ‘ती. अनंत आठवले (ती. भाऊकाका (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू) मुंबई येथे असतांना सौ. कार्येकर यांच्याकडे त्यांच्यासाठी जेवणाचा डबा पाठवण्याची सेवा होती. त्या नियमित आणि वेळेत डबा द्यायच्या. त्या ही सेवा उत्साहाने करायच्या.


Multi Language |Offline reading | PDF