धाडी घालण्यापूर्वी आम्हाला कळवा !

आयकर विभाग किंवा अंमलबजावणी संचालनालय भाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांवर आणि तेही निवडणुकीच्या काळातच कशी कारवाई करते, याचे उत्तर भाजप सरकार आणि या यंत्रणा यांनी दिले पाहिजे !

राफेल प्रकरणाच्या निकालावर सर्वोच्च न्यायालय फेरविचार करणार !

एकदा दिलेल्या निर्णयावर फेरविचार करणार्‍या न्यायालयांचा निर्णय अंतिम का नसतो ? त्यांना फेरविचार का करावा लागतो ? जर एखाद्या व्यक्तीची फेरविचार याचिका प्रविष्ट करण्यासाठी आर्थिक क्षमताच नसेल, तर त्याने काय करायचे ?

‘द ताश्कंद फाईल्स’ चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासाठी काँग्रेसमधील एका बड्या कुटुंबाचा दबाव ! – दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांचा आरोप

माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची हत्या घडवून आणल्याचे आजही सांगितले जाते. असे असतांना तत्कालीन काँग्रेस सरकारने त्याविषयीचे सत्य जगासमोर आणणे आवश्यक होते; मात्र तसे झाले नाही. ‘हे पाप जगासमोर येऊ नये; म्हणून काँग्रेस या चित्रपटाला विरोध करत आहे’, असे राष्ट्रप्रेमींना वाटल्यास चूक ते काय ?

(म्हणे) ‘नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले, तरच शांततेवर चर्चा होऊ शकते !’ – इम्रान खान

आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकची नाचक्की झाल्यावर भारताशी संबंध सुधारणे त्याच्यासाठी अपरिहार्य आहे. त्यासाठी शांतीचर्चा होणे त्याच्यासाठी महत्त्वाचे आहे. यासाठी अशा प्रकारची विधाने करत आहेत ! अशा कावेबाज शत्रूला टाळ्यावर आणण्यासाठी आक्रमक धोरणच अवलंबणे आवश्यक !

अभिनेते सलमान खान यांना पुरातत्व विभागाची नोटीस

मूर्तींना हानी होईपर्यंत पुरातत्व विभाग आणि राज्यातील काँग्रेस सरकार झोपले होते का ? अन्य धर्मियांच्या धर्मस्थळी चित्रीकरण करण्यास अशा प्रकारची अनुमती देण्याआधी पुरातत्व विभाग किंवा राज्य सरकार यांनी १०० वेळा विचार केला असता; मात्र हिंदू सहिष्णु असल्याने त्यांना वारंवार गृहित धरले जाते !

मुसलमानांनी महाआघाडीला मत द्यावे ! – जमात-ए-इस्लामी हिंदचा फतवा

निवडणूक आयोग अशी विधाने करणार्‍या संघटनांवर कारवाई कधी करणार ? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वावरून मत मागितल्यावरून त्यांना ६ वर्षे मतदान करण्यावर बंदी घालणार्‍या न्यायपालिकेने जमात-ए-इस्लामी हिंदवरही कारवाई करावी, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे !

देशभरातील हिंदूंच्या हत्यांच्या चौकशीसाठी सीबीआयचे विशेष अन्वेषण पथक स्थापन करावे ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

जम्मूपासून केरळपर्यंत हिंदूंच्या हत्यांचे सत्र चालूच : हिंदु जनजागृती समितीने केलेल्या मागणीप्रमाणे तथाकथित पुरोगामी संघटना आणि त्यांचे नेते मागणी का करत नाहीत ? कि ‘केवळ देशात पुरो(अधो)गाम्यांच्या हत्यांचेच अन्वेेषण व्हावे’, असे त्यांना वाटते ?

नम्रता, सेवाभाव यांच्या बळावर संत, साधक आणि मित्र यांचा विश्‍वास संपादन केलेले चिंचवड येथील श्री. अशोक संकपाळ (वय ६५ वर्षे) !

‘श्री. अशोक संकपाळ (काका) यांना भेटल्यावर किंवा भ्रमणभाष केल्यावर ते अतिशय उत्साहाने ‘नमस्कार’, असे म्हणतात. त्यांनी अधिकोषात ‘व्यवस्थापक’ या पदावर नोकरी केली आहे; पण त्यांच्या वागण्या-बोलण्यात कोणत्याच प्रकारचा अहं जाणवत नाही. ते अतिशय नम्रपणे वागतात.’

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही स्थिर राहून प्रारब्ध भोगणारे भोसरी येथील श्री. महादेव पाटील (वय ६७ वर्षे) !

‘श्री. पाटीलकाका नेहमी हसतमुख असतात. त्यांचा स्वभाव शांत असून ते नम्र आहेत. ते नेहमी समोरच्या व्यक्तीची आदराने चौकशी करतात.’

नम्र आणि शांत स्वभावाचे अन् भावपूर्ण कृती करणारे तळेगाव (जिल्हा पुणे) येथील श्री. भालचंद्र कर्वे (वय ४५ वर्षे) !

‘श्री. भालचंद्र प्रतिदिन सकाळ-संध्याकाळ त्यांच्या वडिलांना वाकून नमस्कार करतात. तो पहातांना त्यांच्यातील ‘नम्रभाव आणि मोठ्यांचा आदर करणे’ हे गुण दिसून येतात.


Multi Language |Offline reading | PDF