मंदिरांचे नियंत्रण भक्तांकडेच असावे, ते सरकारचे काम नाही !

सर्वोच्च न्यायालयाचे मंदिर सरकारीकरणावर मत : आतातरी केंद्रातील आणि राज्यांतील सरकारे हिंदूंची मंदिरे भक्तांच्या कह्यात देतील का ? मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात हिंदु जनजागृती समिती १३ वर्षांपासून देत असलेल्या लढ्याचे हे यशच होय !

दंतेवाडा (छत्तीसगड) येथील नक्षलवाद्यांच्या आक्रमणात भाजपचे आमदार ठार, तर ३ पोलीस हुतात्मा

जिहादी आतंकवाद्यांच्या आक्रमणात संघ स्वयंसेवक तर नक्षलवाद्यांच्या आक्रमणात भाजपचे आमदार ठार झाले, तरी भाजप आतंकवाद मुळासकट नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार नाही, हे वास्तव आहे ! संघाने या ५ वर्षांत भाजप सरकारवर दबाव आणला असता, तर एव्हाना आतंकवाद आणि नक्षलवाद नष्ट झाला असता !

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांच्या आक्रमणात संघ स्वयंसेवक आणि त्यांचे सुरक्षारक्षक ठार

येथील जिल्हा रुग्णालयातील मेडिकल असिस्टंट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक चंद्रकांत शर्मा यांच्यावर ९ एप्रिलला दुपारी आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात ते आणि त्यांचा सुरक्षारक्षक ठार झाले.

हिंदूंना आतंकवादी ठरवणार्‍या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना पुन्हा निवडून देऊ नका !  योगेश देशपांडे

हिंदूंना आतंकवादी ठरवणार्‍या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना पुन्हा निवडून देऊन नका, असे आवाहन परभणी, पूर्णा आणि जालना येथील बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी निर्दोष मुक्त झालेले श्री. योगेश देशपांडे यांनी केले.

राजस्थान, मध्यप्रदेश आणि हरियाणा येथे सामूहिक प्रार्थनेच्या माध्यमातून अभियानाला प्रारंभ !

सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने राजस्थान, मध्यप्रदेश आणि हरियाणा येथे ठिकठिकाणी सामूहिक प्रार्थना करण्यात आल्या.

साधना आणि धर्माचरण केल्यास जीवनामध्ये आमूलाग्र पालट होतो ! – शंभू गवारे, पूर्वोत्तर राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

व्यवसाय करतांना साधना आणि धर्माचरण केल्यास व्यवसायामधूनही साधना होईल. साधना केल्याने जीवनात अमूलाग्र पालट होतो, असे वक्तव्य हिंदु जनजागृती समितीचे पूर्वोत्तर राज्य समन्वयक श्री. शंभू गवारे यांनी येथील व्यावसासिकांसमवेत झालेल्या बैठकीत केले.

हरियाणात ठिकठिकाणी व्याख्याने आणि संपर्क यांद्वारे धर्मप्रेमींना साधनेविषयी, तसेच हिंदूंना धर्मबळ वाढवण्याविषयी मार्गदर्शन

धर्मशिक्षण नसल्याने आजचा हिंदु तरुण धर्माची बाजू मांडतांना शास्त्रशुद्ध विवेचन करू शकत नाही. आज लोक व्यक्तीस्वातंत्र्याच्या गोष्टी करतात; मात्र हिंदूंना स्वत:चे मत मांडण्याचा अधिकार नाही. घटनेत ‘सेक्युलर’ शब्द घालून खाण्याच्या, आचरणाच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार चालू आहे

मंगळूरू, कर्नाटक येथे भावपूर्ण वातावरणात पार पडले धर्मप्रेमींचे राज्यस्तरीय शिबिर

येथील सनातनच्या सेवाकेंद्रामध्ये अलीकडेच धर्मप्रेमींसाठी कर्नाटक राज्यस्तरीय शिबिर अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडले.

चेन्नई येथे सनातन संस्थेच्या वतीने सत्संग महोत्सव

येथील कोला पेरुमल शाळेमध्ये ७ एप्रिल या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने सत्संग महोत्सव आयोजित करण्यात आला. सत्संगाच्या प्रारंभी सनातन संस्थेच्या सौ. सुधा यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यांनी रामनवमी आणि तमिळ नववर्ष यांविषयी महत्त्व सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF