भाजपच्या ‘संकल्पपत्रा’त पुन्हा राममंदिर, कलम ३७० चे आश्‍वासन !

केंद्रात आणि विशेषतः उत्तरप्रदेशमध्ये बहुमतातील सत्ता असतांना राममंदिर उभारू न शकणारे भाजप सरकार आता ते उभारील, यावर हिंदूंनी कसा विश्‍वास ठेवायचा ? भाजप अद्यापही राममंदिरासाठी कायदा करण्याचे स्पष्ट आश्‍वासन हिंदूंना देत नाही, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘कलम ३७० समाप्त केल्यास स्वतंत्र होऊ !’ – फारूख अब्दुल्ला यांची धमकी

वडील शेख अब्दुल्ला यांनाही जे जमले नाही, ते करण्याच्या फुकाच्या घोषणा फारूख अब्दुल्ला यांनी देऊ नयेत ! भाजप सरकार अशा प्रकारची देशद्रोही विधाने करणार्‍या अब्दुल्ल्ला पिता-पुत्र, मेहबूबा मुफ्ती यांना कारागृहात का डांबत नाही ?

काश्मीरमध्ये प्रचाराच्या वेळी भाजप भगव्याऐवजी हिरव्या रंगात !

सत्तेसाठी काहीही करण्यास सिद्ध असलेल्या भाजपचा हाच खरा तोंडवळा आहे, हे लक्षात घ्या ! एकीकडे ‘गोहत्येच्या विरोधात आहे’, असे दाखवण्याचा भाजप प्रयत्न करतो, तर दुसरीकडे गोवा, मिझोराम येथे ‘गोमांस पुरवू’ असे आश्‍वासन देतो. त्याचप्रमाणे आता भाजपने काश्मीरमध्येही त्याचा ‘रंग’ दाखवला आहे !

किमान ५ मतदानकेंद्रांवरील ईव्हीएम् आणि व्हीव्हीपॅट यंत्रातील मतांची पडताळणी करा ! – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी, यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील किमान ५ केंद्रांवरील (बुथवरील) ईव्हीएम् यंत्रांमध्ये नोंद झालेली मते आणि ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रांमधील चिठ्ठ्यांवर नोंद झालेली मते यांची पडताळणी करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.

(म्हणे) ‘राममंदिर उभारण्यातील सर्व अडथळे लवकरच दूर होतील !’ – विहिंप

संतांच्या आदेशानुसार आयोजित देशव्यापी जनजागरण कार्यक्रमाद्वारे रामजन्मभूमीवर मंदिर उभारण्यातील सर्व अडथळे दूर होतील, असे विधान विश्‍व हिंदु परिषदेचे कार्याध्यक्ष अधिवक्ता आलोक कुमार यांनी नुकतेच केले.

भारताचा चीनच्या बीआरआय (बेल्ट अ‍ॅण्ड रोड इनिशिएटिव्ह) परिषदेवर सलग दुसर्‍यांदा बहिष्कार

बहिष्कार घातला, हे चांगलेच झाले; मात्र त्याही पुढे जाऊन चीनला धडा शिकवण्यासाठी भाजप सरकारने आणखी कठोर पावले उचलणे अपेक्षित आहे !

जम्मू-काश्मीरमध्ये ४०० हून अधिक नेत्यांना सुरक्षा पुरवण्यात येणार

हे नेते आतंकवादाच्या विरोधात आवाज उठवतात का ? त्यामुळेच त्यांच्या जिवाला धोका आहे का ? याची निश्‍चिती सरकारने सुरक्षा देतांना केली आहे का ?

‘स्तोत्रांजली बालसंस्कार संस्थे’च्या हिंदु दिनदर्शिकेचे प्रकाशन !

‘स्तोत्रांजली बालसंस्कार’ या संस्थेच्या हिंदु पंचांगानुसार सिद्ध करण्यात आलेल्या हिंदु दिनदर्शिकेचे प्रकाशन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर संत संताजी जगनाडे महाराज चौक लालबाग, मुंबई येथे करण्यात आले.

‘कलंक’ या चित्रपटातून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन दिले असल्याचे चित्रपटाच्या ‘ट्रेलर’मधून उघड !

१७ एप्रिल या दिवशी प्रदर्शित होणार्‍या ‘कलंक’ या चित्रपटाचा ‘ट्रेलर’ प्रसारित करण्यात आला असून या चित्रपटात विवाहित हिंदु युवती आणि मुसलमान युवक यांचे प्रेमसंबंध दाखवण्यात आले आहेत.

उष्णतेचा दाह न्यून होण्यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या चंदन उटी पूजेस प्रारंभ !

गुढीपाडव्यापासून उष्णतेचे प्रमाण वाढत असल्याने उष्णतेचा दाह न्यून होण्यासाठी ६ एप्रिलपासून श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्तींच्या चंदन उटी पूजेला प्रारंभ करण्यात आला.


Multi Language |Offline reading | PDF