काँग्रेसपेक्षा मोदी सरकारने मुसलमानांना अधिक दिले !- भाजपच्या मुसलमान नेत्याची स्वीकृती

गेल्या ५ वर्षांत मोदी सरकारमधील एकतरी हिंदु मंत्री ‘मोदी सरकारने हिंदूंना काँग्रेसपेक्षा अधिक दिले’ असे म्हणू शकतो का ? नाही म्हणू शकणार; कारण मोदी सरकारने हिंदूंची उपेक्षा केली, हे लक्षात घ्या ! 

पाकमधील एफ्-१६ विमानांची मोजणी आम्ही केलेली नाही ! – पेंटागॉनकडून स्पष्टीकरण

अमेरिकेच्या या मासिकाच्या वृत्तावरून भारतीय वायूदलाला खोटे ठरवणारे फारूख अब्दुल्ला यांच्यावर भाजप सरकार आता देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात डांबण्याचे धाडस दाखवणार का ?

१६ ते २० एप्रिल या काळात भारत पाकवर आक्रमण करणार ! – पाकचा दावा

वास्तविक भाजप सरकारने अशी कृती आधीच करणे अपेक्षित होते ! आता सरकार अशी काही कृती करणार असेल, तर त्याने आरपारची कृती करून पाकला नष्ट करण्याचे धाडस दाखवावे !

गोमांस निर्यातदारांशी केवळ मुसलमानच नव्हे, तर जैन आणि अन्य धर्मीयही जोडले आहेत ! – पंतप्रधान मोदी यांनी म्हटल्याचा राज ठाकरे यांचा दावा

राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चित्रफीत दाखवून हा आरोप केला आहे. याचे अजूनही भाजपने खंडण केलेले नाही अथवा स्वतःची बाजू मांडलेली नाही ! याचा अर्थ हिंदूंनी ‘हे वक्तव्य सत्य आहे’, असे समजायचे का ? 

मध्यप्रदेशचे काँग्रेसचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या स्वीय सचिवाच्या घरासह देशभरात ५० ठिकाणी आयकर विभागाच्या धाडी

‘आता निवडणूक आल्यामुळे अशा धाडी घातल्या जात आहेत का ?’, असे जनतेला वाटू नये, यासाठी भाजप सरकारने भ्रष्टाचार्‍यांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे !

काँग्रेसच्या सभेत रिकाम्या खुर्च्यांचे छायाचित्र काढणार्‍या पत्रकाराला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मारहाण

काँग्रेसच्या या असहिष्णुतेविषयी देशातील एकही पत्रकार, छायाचित्रकार, लेखक, निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आता तोंड उघडणार नाहीत; कारण मारहाण करणे हा ‘अहिंसावादी’ काँग्रेसचा ‘जन्मसिद्ध अधिकार’ आहे, असेच त्यांना वाटत असणार !

अमेरिकेतील भारतीय संस्कृतीरक्षणास महत्त्व देत असल्यामुळे ते भाजपशी जोडले गेले असावेत ! – काँग्रेस नेते सॅम पित्रोदा

अमेरिकेतील आणि भारतातीलही हिंदूंना ‘काँग्रेस हिंदुद्रोही आणि हिंदु संस्कृतीविरोधी आहे, ती हिंदूंना ‘आतंकवादी’ ठरवत आहे’, हे लक्षात आल्याने ते काँग्रेसपासून दूर गेेले आहेत, हे सॅम पित्रोदा यांनी लक्षात ठेवावे !


Multi Language |Offline reading | PDF