(म्हणे) ‘योग करतांना सूर्यनमस्कार घालत नसाल, तर चंद्रनमस्कार घाला !’

योग हा हिंदु धर्मातील एक साधनामार्ग आहे आणि यातून आध्यात्मिक उन्नती करता येते; मात्र पुरो(अधो)गामी, निधर्मी आणि हिंदुद्वेषी मंडळींच्या विरोधाला बळी पडून उपराष्ट्रपती असे विधान करत आहेत ! आणि योगसाधनेत ‘चंद्रनमस्कार’ असा काही प्रकार नसतांना ते कोणत्या अधिकाराने कोणाला असा सल्ला देत आहेत ?

(म्हणे) ‘भारताने पाकचे एफ्-१६ विमान पाडले नाही !’

भारतीय वायूदलापेक्षा अमेरिकेच्या मासिकावर अधिक विश्‍वास ठेवणारे फारूख अब्दुल्ला ! आणखी किती भारतद्वेषी विधाने केल्यावर भाजप सरकार फारूख अब्दुल्ला आणि त्यांचे पुत्र ओमर अब्दुल्ला यांना कारागृहात डांबणार आहे ?

शोपियां येथे २ आतंकवादी ठार

एक एक आतंकवाद्यांना ठार करण्यापेक्षा आतंकवाद्यांचा कारखाना असणार्‍या पाकला नष्ट करा !

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सनातनचे श्रद्धास्थान संत भक्तराज महाराज यांनी वापरलेल्या प्रासादिक पादुकांचे सनातनच्या आश्रमात आगमन

गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्षारंभ ! ६ एप्रिल या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातही सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे गुरु तथा सनातनचे श्रद्धास्थान संत भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या पणजी (गोवा) येथील भक्त श्रीमती स्मिता राव यांच्याकडील चरणपादुकांचे आगमन झाले.

(म्हणे) ‘नरेंद्र मोदी यांच्यामुळे हिंदु सर्वाधिक हिंसक धर्म बनला आहे !’

काश्मिरी मुसलमानाशी निकाह करणार्‍या काँग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी तोडलेले ‘चांदतारे’ ! तोंड असल्यामुळे काहीही बरळणार्‍या अशांना हिंदूंनी त्यांची जागा दाखवून द्यावी !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आयुरारोग्य लाभावे, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, यांसाठी तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवीला साकडे !

हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त धर्मप्रेमींनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आयुरारोग्य लाभावे, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील अडथळे दूर व्हावेत’, यांसाठी महाराष्ट्राचे कुलदैवत श्री तुळजाभवानी देवीला साकडे घातले.

महाराष्ट्रात हिंदु नववर्षारंभ उत्साहात साजरा !

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, यवतमाळ, भुसावळ, कोल्हापूर, सोलापूर आदी सर्वच लहान-मोठ्या शहारांमध्ये हिंदूंनी पारंपरिक वेशभूषेत, तसेच ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणुका काढत हिंदु नववर्षारंभाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.

काही जण देशभक्तीची नवी व्याख्या शिकवत असल्याचे सांगत सोनिया गांधी यांचा थयथयाट !

काँग्रेसने हिंदूंना ‘आतंकवादी’ ठरवण्याची ‘नवी व्याख्या’ शिकवण्याचा प्रयत्न केला होता. हिंदू हे विसरलेेले नाहीत, हे सोनिया गांधी यांनी लक्षात ठेवावे ! ‘मणिशंकर अय्यर, दिग्विजय सिंह यांच्यासारखे पाकप्रेमी आणि आतंकवादीप्रेमी काँग्रेसी नेत्यांकडून आता राष्ट्रप्रेमींनी देशभक्ती शिकायची’, असे सोनिया गांधी यांना वाटते का ?


Multi Language |Offline reading | PDF