(म्हणे) ‘सरकारी पैसा कशावर खर्च करायचा, हे न्यायालय ठरवू शकत नाही !’ – मायावती

सरकारी पैसा शिक्षणावर खर्च केला पाहिजे कि रुग्णालयावर हा वादाचा प्रश्‍न आहे, त्यामुळे न्यायालय हे ठरवू शकत नाही. लोकांना प्रेरणा देण्यासाठी स्मारक बनवले गेले होते. यातील मूर्ती वास्तूशिल्पाचा नमुना आहे. त्या बहुजन समाज पक्षाचे प्रतिनिधित्व करत नाहीत

रांची (झारखंड) येथे आदिवासींना पैशांचे आमीष दाखवून धर्मांतर करणार्‍या दोघा ख्रिस्ती महिलांना अटक

येथील नगरा टोली परिसरात ३१ मार्चच्या रात्री सरना  (आदिवासींचा प्राचीन धर्म) धर्मियांचे पैशांचे आमीष दाखवून धर्मांतर करून त्यांना ख्रिस्ती बनवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. ही घटना येथील प्रभाग क्रमांक १९ च्या नगरसेविका रोशनी खलखो यांच्या घराजवळ ही घटना घडली.

परभणी येथील सामूहिक कॉपी प्रकरणी गुन्हे नोंद करण्यास शिक्षणाधिकार्‍यांची टाळाटाळ !

येथील कै. हरीभाऊ वरपुडकर कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १२ वीच्या  ‘संरक्षणशास्त्र’ विषयाच्या १३ मार्च या दिवशी झालेल्या परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचा प्रकार घडला. त्यानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परभणी येथील माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी वंदना वाहूळ यांना…

अमेरिकेकडून भारताला पाणबुड्यांचा वेध घेणारी अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स मिळणार

अमेरिकेने ‘लॉकहिड मार्टिन’द्वारे निर्मित अनुमाने १ सहस्र ३०० कोटी रुपये मूल्याची २४ ‘एम्एच् ६० रोमिओ सी हॉक’ या हेलिकॉप्टरची भारताला विक्री करण्यास संमती दिली आहे. हे हेलिकॉप्टर्स पाणबुडी आणि युद्धनौका यांवर अचूक निशाणा साधण्यास सक्षम आहेत.

लातूर येथे व्यापार्‍याला लुटणारे चार पोलीस कर्मचारी बडतर्फ !

लोकसभा आचारसंहितेचा धाक दाखवून उदगीर (लातूर) येथे सराफ व्यापार्‍याचे दीड लक्ष रुपये लुटणार्‍या चार पोलीस कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्यात आले आहे, अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी २ एप्रिल या दिवशी दिली.

सीआरपीएफच्या तळावरील आक्रमणाच्या सूत्रधाराला ‘यूएई’ने भारताला सोपवले

संयुक्त अरब अमिरातीने जैश-ए-महंमदच्या निसार अहमद तांत्रे या आतंकवाद्याला भारताकडे सोपवले आहे. डिसेंबर २०१७ मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफच्या) जम्मू-काश्मीरमधील लीथपोरा येथील तळावर आतंकवादी आक्रमण झाले होते.

कोल्हापूर जिल्ह्यात गुढीपाडव्यानिमित्त ठिकठिकाणी प्रवचने, प्रात्यक्षिके, तसेच ध्वनीचित्रचकती यांद्वारे शास्त्र पोचवण्याचा प्रयत्न !

६ एप्रिलला असणारा गुढीपाडवा हिंदु धर्मशास्त्रानुसार साजरा होण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रवचने, प्रात्यक्षिके, तसेच ध्वनीचित्रचकतींद्वारे प्रबोधन करण्यात आले. विषय ऐकल्यावर अनेक ठिकाणी धर्मप्रेमींनी ‘आम्ही शास्त्रानुसारच गुढीपाडवा साजरा करणार’, असे ठासून सांगितले.

अमेरिकेच्या आस्थापनांकडून भारताला लढाऊ विमाने बनवून देण्याची सिद्धता

अमेरिकेच्या ‘बोइंग’ आणि ‘लॉकहीड’ या २ आस्थापनांनी भारताला मध्यम युद्ध विमाने बनवून देण्याचा प्रस्ताव दिला आहे. ‘एफ् १८’ या जातीची युद्ध विमाने बनवण्याचे यात म्हटले आहे. प्रकल्पासाठी ही आस्थापने विमानांची संपूर्ण निर्मिती यंत्रणाच भारतात उभारू शकतात

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पात्रता नसतांना लिपिकाला व्यवस्थापक पद दिले – विभागीय सहनिबंधकाकडे तक्रार

पात्रता नसतांना लिपिकाला व्यवस्थापक, सरव्यवस्थापक ही पदे देण्यात आल्याने लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाचा नियमबाह्य कारभार समोर आला आहे. या प्रकरणी विभागीय सहनिबंधक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मातोश्री महिला दूध उत्पादक सहकारी संस्थेचे सतीष शेषेराव जाधव यांनी तक्रार केली आहे.

संत अवलिया उत्तमबाबा यांचा जळगाव येथे १४ वा महानिर्वाण महोत्सव !

येथील संत गुलाबबाबा आणि संत अवलिया उत्तमबाबा भक्त मंडळाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही १० ते १७ एप्रिल या कालावधीत ‘महानिर्वाण महोत्सव’आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवादरम्यान श्रीराम कथा, भजन, अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह, दिंडी सोहळा, महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.


Multi Language |Offline reading | PDF