कांकेर (छत्तीसगड) येथे नक्षलवाद्यांच्या आक्रमणात बीएस्एफ्चे ४ सैनिक हुतात्मा 

येथे नक्षलवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएस्एफ्च्या) वाहन ताफ्यावर केलेल्या आक्रमणात ४ सैनिक हुतात्मा झाले, तर २ जण घायाळ झाले. ही घटना महला या गावामध्ये घडली. येथून हा ताफा जात असतांना हे आक्रमण करण्यात आले.

काश्मीरमध्ये निवडणुकीच्या काळात आतंकवादी आक्रमणाची शक्यता

अशा वेळी मतदानकेंद्रांची सुरक्षा वाढवणे, पोलिसांची अधिक कुमक ठेवणे यांसारख्या वरवरच्या उपाययोजना केल्या जातात. त्याऐवजी असे आतंकवादी आक्रमण करण्याचा कट रचणार्‍या आतंकवाद्यांच्या अड्ड्यांवर आक्रमण करून त्यांचा पूर्ण निःपात करण्याची बुद्धी भाजपच्या शासनकर्त्यांना होईल, तो सुदिन !

केरळमध्ये राहुल गांधी यांच्या निवडणूक फेरीत मुस्लिम लीगच्या कार्यकर्त्यांचा चांदतारा असणार्‍या हिरव्या झेंड्यासह सहभाग

भारताची फाळणी होण्यास गांधीसह मुस्लिम लीगही तितक्याच प्रमाणात उत्तरदायी आहे. अशा भारतद्वेषी आणि हिंदुद्वेषी पक्षाशी हातमिळवणी करणार्‍या काँग्रेस पक्षाला हिंदूंनी या निवडणुकीत त्याची जागा दाखवून द्यावी !

तरनतारन (पंजाब) येथे भारताने पाकिस्तानी ड्रोन पाडले

येथील खेमकरनच्या बॉर्डर आऊट पोस्टमध्ये सीमा सुरक्षा दलाने एक पाकिस्तानी ड्रोन पाडले आहे.

भारत पुढील ४ वर्षांत अत्याधुनिक हायपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र बनवणार

भारतीय शास्त्रज्ञ देशाच्या संरक्षणासाठी विविध शस्त्रे आणि अस्त्रे बनवत आहेत; मात्र तरीही मूठभर आतंकवादी देशाला डोईजड होत आहेत आणि शासनकर्ते त्यांना मुळासकट नष्ट करण्यात अपयशी ठरले आहेत !

पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर !

पाक आर्थिकदृष्ट्या दिवाळखोर होणार असला, तरी त्याची आतंकवाद्यांना पाठीशी घालण्याची आणि त्यांना भारतात कारवाया करण्यास पाठवण्याची खोड जाणार नाही. आर्थिक कारणामुळे पाकचे तुकडे झाले, तरी तेथील धर्मांधांची  भारताच्या विरोधातील वळवळ बंद होणार नाही, हेही लक्षात ठेवायला हवे !

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याच्या प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या दोषींची निर्दोष सुटका

चुकीचे निर्णय दिल्यामुळेे पीडितांवर अन्याय होतो. त्यामुळे चुकीचे निर्णय दिले जाऊ नयेत, यासाठी न्याययंत्रणा काही प्रयत्न करणार का ? ‘असे केल्यास निर्दोष व्यक्तीवर अन्याय होणार नाही’, असे जनतेला वाटते !

हिंदु जनजागृती समिती निर्मित गुढीपाडव्याच्या प्रबोधनात्मक ‘व्हिडिओ’ची मोडतोड करून ‘टिकटॉक’ अ‍ॅपच्या माध्यमातून धर्मविरोधी प्रचार !

काही धर्मविरोधकांकडून या व्हिडिओतील केवळ एका युवकाच्या तोंडी असणार्‍या चुकीचा इतिहास सांगणार्‍या वाक्यांचा ध्वनी (ऑडिओ) ‘सत्य इतिहास’ असे नाव देऊन ‘टिकटॉक’ अ‍ॅपच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आल्याचे समोर आले.

हिंदूंनो, धर्मविरोधी भूलथापांना बळी न पडता धर्मशास्त्र समजून घेऊन गुढीपाडवा साजरा करा ! – हिंदु जनजागृती समिती

गुढीपाडवा अर्थात् चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा ! ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती करून सत्ययुगाचा प्रारंभ केला म्हणून हा दिवस नववर्षाचा प्रारंभदिन म्हणून साजरा केला जातो.


Multi Language |Offline reading | PDF