(म्हणे) ‘एन्आयएच्या आतंकवाद्यांच्या सूचीमध्ये अनेक हिंदूंचा समावेश !’

काँग्रेसनंतर आता हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमांचा हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न ! ‘हिंदु आतंकवाद’ असे काही असते, तर आतापर्यंत एकतरी काँग्रेसवाले किंवा इतर धर्मीय जिवंत राहिले असते का ? आणि प्रसारमाध्यमांना हिंदूंना आतंकवादी म्हणण्याचे धारिष्ट्य झाले असते का ?

कोल्हापूर महापालिकेत ७ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा भ्रष्टाचार उघड

या प्रकरणी महानगरपालिका आयुक्तांनी त्यांची भूमिका जनतेसमोर स्पष्ट करावी अन्यथा आम्ही फौजदारी कारवाई करू. वेळ पडलीच तर जनआंदोलन उभारू, अशी चेतावणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी कोल्हापूर प्रेस क्लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

(म्हणे) ‘कलम ३७० रहित केल्यास काश्मीर भारतापासून स्वतंत्र होईल !’- मेहबूबा मुफ्ती यांची धमकी

अशा प्रकारची देशद्रोही विधाने करणार्‍या मेहबूबा मुफ्ती यांच्यासमवेत भाजपने युती करून सरकार स्थापन केले होते, हे लक्षात घ्या ! अशी धमकी देणार्‍यांच्या विरोधात भाजप निष्क्रीयच रहाणार असल्याने अशांवर कारवाई होण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

आतंकवाद्यांना अर्थपुरवठा करणार्‍या वटाली याला देहली उच्च न्यायालयाने दिलेला जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रहित

उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालय रहित करते, याचाच अर्थ कायद्याचा अर्थ प्रत्येक न्यायालय वेगवेगळ्या पद्धतीने काढतो, असे समजायचे का ?

राजस्थानमधील वायूदलाच्या तळाजवळ जिवंत बॉम्ब आढळला

नाल-बिकानेर येथील वायूदलाच्या तळाजवळ एक जिवंत बॉम्ब आढळला. याविषयी अधिक माहिती मिळू शकलेली नाही. वायूदलाचे अधिकारी या बॉम्बचे अन्वेषण करत आहेत.

भारताचे घोषवाक्य ‘सत्यमेव जयते’ एक प्रकारे पराभूत ! – चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

जिल्ह्यातील दिवाणी न्यायालयामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अधिवक्त्यांसाठी नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी अधिवक्त्यांना संबोधित केले. आज धर्मग्लानीने परमोच्च क्षण गाठला आहे. आज असे कुठलेच तंत्र राहिलेले नाही…

हिंदु युवकांना धर्माशी जोडण्यासाठी धर्माचरणाचे शास्त्र सांगा ! – आनंद जाखोटिया

आजची पिढी धर्माचरणाविषयी प्रमाण मागत आहे. त्यांना समजेल, अशा वैज्ञानिक भाषेत हिंदु जनजागृती समिती धर्मशिक्षणाचा प्रसार करत आहे. धर्म समजून घ्या, आचरण करून त्याचा लाभ अनुभवा आणि त्याचा प्रसार करा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी केले.

बंगालच्या चिचुरा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान

येथील चिचुरामधील श्रीकृष्ण सेनेचे संस्थापक श्री. विजय यादव यांच्या पुढाकाराने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये २१ युवक सहभागी झाले होते. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. शंभू गवारे आणि श्री. सुमंतो देबनाथ यांनी व्याख्यान घेतले.

आज मानवासमोर असलेल्या सर्व भीषण समस्यांचे मूळ कारण अधर्माचरण आहे ! – प्रकाश मालोंडकर

आज संपूर्ण जगभर भ्रष्टाचार, हिंसाचार, अत्याचार, अनीती, असुरक्षितता पसरली आहे. या सर्व समस्यांचे मूळ मानवाच्या अधर्माचरणामध्ये आहे. आजचा मनुष्य स्वत:ला, परिवाराला, समाजाला, राष्ट्राला घातक आहे, अशा कृती बिनदिक्कत करतो वा त्या होत असतांना मूक साक्षीदार म्हणून पहातो.


Multi Language |Offline reading | PDF