‘हिंदु आतंकवाद’ हा शब्द वापरून काँग्रेसने देशाचा अवमान केला ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

लोकसभा निवडणूक जवळ आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेसाठी ‘हिंदूं’ची आठवण झाली, हे न समजायला हिंदू दूधखुळे नाहीत ! . . . प्रतिदिन हिंदूंचा अशा पद्धतीने अवमान होत असतांना गेल्या ५ वर्षांत त्याविषयी नरेंद्र मोदी यांनी हिंदूंसाठी काय केले, हे त्यांनी सांगायला हवे !

(म्हणे) ‘भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी देशातील श्रमिकांची हानी केली !’

नक्षलवाद्यांचा हिंदुद्वेष ! गेल्या ७१ वर्षांत देशाला रसातळाला नेणार्‍या काँग्रेसविषयी नक्षलवादी गप्प का ? हिंदु राष्ट्राची मागणी केल्यावर लोकशाही धोक्यात आल्याची आरोळी ठोकणार्‍या पुरो(अधो)गाम्यांना नक्षलवाद्यांनी निवडणुकांवर बहिष्कार घालण्याविषयी चेतावणी दिल्यावर लोकशाही सुरक्षित आहे, असे वाटते का ?

वेल्लोर (तमिळनाडू) येथे द्रमुकच्या नेत्याच्या गोदामातून पैशांनी भरलेल्या गोण्या जप्त

आयकर विभागाने तमिळनाडूतील वेल्लोर येथे द्रमुकच्या एका नेत्याच्या गोदामातून गोण्या आणि खोके यांमध्ये भरलेले पैसे जप्त करण्यात आले आहेत. राजकारण्यांच्या संपत्तीत वाढ कशी होते, हेही आता जनतेला समजले पाहिजे !

(म्हणे) ‘सनातन आणि काश्मीरमधील आतंकवादी हे दोन्ही आतंकवादीच !

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची बौद्धिक दिवाळखोरी ! काहीही संबंध नसतांना कुठून तरी राष्ट्रभक्त सनातन संस्थेचे नाव वारंवार आतंकवादी म्हणून घ्यायची सवयच हिंदुद्वेषी पृथ्वीराज चव्हाण यांना लागली आहे, हेच यातून लक्षात येते !

केंद्रशासनाच्या ‘जवाहर नवोदय विद्यालया’ने ठेवल्या गुढीपाडव्यालाच परीक्षा !

केंद्रशासनाच्या अखत्यारीत असणार्‍या ‘जवाहर नवोदय विद्यालया’च्या प्रशासनाने यंदाच्या वर्षी इयत्ता ६ वीसाठीची प्रवेशपरीक्षा ६ एप्रिल २०१९ या गुढीपाडव्याच्या दिवशीच अर्थात् हिंदु नववर्षारंभी ठेवण्याचा घाट घातला आहे. या प्रकाराचा हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी निषेध केला आहे.

पाक सैन्याने पुंछ येथे केलेल्या गोळीबारात एक सैन्याधिकारी हुतात्मा आणि एका मुलीचा मृत्यू

‘आतंकवाद सहन करणार नाही’, असे म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकचा गोळीबार कधीपर्यंत सहन करणार आहेत ? कि ते ‘पाक त्याच्या कर्माने मरेल’, असेच सांगणार आहेत ?

रावण, दुर्योधन, कंस, जरासंध इत्यादी असुरांना ईश्‍वराने अवतार घेऊन मारले. ईश्‍वर असुरांना सोडून देत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी ईश्‍वराच्या अवतारांपेक्षा मोठे आहेत का ?

‘आपल्याला जगाशी बरोबरी करायची आहे. आपण पाकिस्तान प्रकरणात भरपूर वेळ वाया घालवला. पाकिस्तान त्याच्या कर्माने मरेल. त्याला सोडून द्या. आपण पुढे जाऊया.’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी  

‘इस्रो’कडून एकाच वेळी भारताच्या ‘एमीसॅट’सह अन्य देशांच्या २८ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

भारतीय शास्त्रज्ञांचे अभिनंदन ! भारतीय अवकाश संशोधन संस्थेकडून (इस्रोकडून) भारताच्या ‘एमीसॅट’ उपग्रहासह इतर देशांच्या २८ नॅनो उपग्रहांचे श्रीहरिकोटा येथील अवकाशतळावरून ‘पीएस्एल्व्ही सी ४५’ या प्रक्षेपकाच्या साहाय्याने यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ५५ व्या पंचमुखी हनुमत्कवच यज्ञाची भावपूर्ण वातावरणात सांगता !

हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्युयोग टळावा आणि त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, तसेच साधकांच्या साधनेतील अडथळे दूर व्हावे, या संकल्पाने आरंभलेल्या ५५ पंचमुखी हनुमत्कवच यज्ञांची येथे सांगता झाली.

प्रभु श्रीरामस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती हनुमंताप्रमाणे दास्यभाव असणारे कलियुगातील आदर्श उदाहरण म्हणजे प.पू. दास महाराज !

‘पानवळ, बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील प.पू. दास महाराज यांच्या संकल्पानुसार साधकांना होणार्‍या आध्यात्मिक त्रासांच्या निवारणार्थ वर्ष २००२ मध्ये पंचमुखी हनुमत्कवच यज्ञांना आरंभ झाला. प.पू. दास महाराज यांनी ५५ यज्ञांचा संकल्प केला होता. त्यानुसार वर्ष २००२ मध्ये फोंडा (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात…


Multi Language |Offline reading | PDF