हिंदूंना आतंकवादाशी जोडल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी क्षमा मागावी ! – अमित शहा

या प्रकरणी केवळ क्षमा मागून चालणार नाही, तर पी. चिदंबरम्, सुशीलकुमार शिंदे, दिग्विजय सिंह आदी काँग्रेसी नेत्यांना भाजपने कारागृहात डांबले पाहिजे ! निरपराध हिंदुत्वनिष्ठांचा कारागृहात छळ केल्याप्रकरणी काँग्रेसवाल्यांना कठोर शिक्षा करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, तरच हिंदूंना न्याय मिळेल !

(म्हणे) ‘पाक त्याच्या कर्माने मरेल; म्हणून त्याला सोडून देऊन आपण पुढे जाऊया !’ – नरेंद्र मोदी

पाकने गेली ३ दशके भारतात आतंकवादी कारवाया करून सहस्रो नागरिक आणि सैनिक यांना मारले असतांना त्याला त्याच्या कर्मावर सोडायचे, हे हिंदु धर्म शिकवत नाही ! त्याला असे कर्मावर सोडणे, हा राष्ट्रघात होय ! शिशूपालाचे १०० अपराध भरल्यावर भगवान श्रीकृष्णाने त्याचा नाश केला, ही हिंदु धर्माची शिकवण आहे.

बरेली (उत्तरप्रदेश) येथे मिशनरी शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव

निधर्मीवादी प्रसारमाध्यमे अशा घटनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात आणि अन्य धर्मियांनी हिंदु धर्मात केलेल्या घरवापसीच्या घटनांच्या विरोधात वृत्त प्रसारित करतात ! ‘अशा शाळांमध्ये स्वतःच्या पाल्याला शिकायला पाठवणे, म्हणजे आत्मघात’, हे हिंदु पाल्यांना समजेल, तो सुदिन !

जोधपूरजवळ मिग २७ विमान कोसळले; मात्र वैमानिक सुरक्षित

तत्कालिन काँग्रेस आणि आता भाजपच्याही राज्यात उडत्या शवपेट्या झालेली मिग विमाने अजून वायूदलात का तैनात करण्यात आली आहेत, हे भारतीय जनतेला न सुटलेले कोडे आहे !

बिहारचे राष्ट्रीय जनता दलाचे आमदार हाजी सुब्हान यांनी मसूद अझहर याला ‘साहेब’ म्हटले !

अशा आमदारांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात डांबण्याचे धारिष्ट्य बिहारमधील जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांचे सरकार दाखवील का ?

(म्हणे) ‘पुलवामा येथील आक्रमणात खरेच ४० पोलीस हुतात्मा झाले ?’ – फारूख अब्दुल्ला

सातत्याने अशा प्रकारची देशद्रोही विधाने करणारे फारूख अब्दुल्ला यांना कारागृहात डांबण्याचे धारिष्ट्य भाजप सरकार का दाखवत नाही ?

कर्नाटकमध्ये आधुनिक वैद्याला धमकी देऊन पैसे उकळणार्‍या ४ पत्रकारांना अटक

लोकशाहीचा चौथा स्तंभ असणार्‍या पत्रकारितेला कलंकित करणार्‍या अशा पत्रकारांना कठोर शिक्षा करणे आवश्यक ! अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्याचे दायित्व पत्रकारांवर असतांना स्वतःच अन्याय करणारे गुंड वृत्तीचे पत्रकार हे समाजासाठी घातक !

बिहारमध्ये ताप्ती-गंगा एक्सप्रेसचे १० डबे रुळावरून घसरले

काँग्रेसच्या आणि आता भाजपच्या काळात अपघातांत जागतिक विक्रम करणारी भारतीय रेल्वे ! बिहारमधील छपरा येथे ताप्ती-गंगा एक्सप्रेसला झालेल्या अपघातात रेल्वेचे १० डबे रुळावरून घसरले. या अपघातात ४ प्रवासी घायाळ झाले.

मराठवाड्यात मार्च मासातच पाण्यासाठी नागरिकांची वणवण !

संभाजीनगर शहरातील ११५ पैकी ५४ पेक्षा अधिक वसाहतींना मागील काही दिवसांपासून ८ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. जुन्या शहरातील काही प्रभागांना ४ दिवसाआड म्हणजेच पाचव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. पैठण येथील जायकवाडी धरणातून शहरात पाणी आणण्यात येते. हे अंतर ६० किलोमीटर आहे.


Multi Language |Offline reading | PDF