देहली, मुंबई आणि गोवा येथे आतंकवादी आक्रमणाची शक्यता

जगात कुठेही मुसलमानांवर आक्रमण झाल्यावर त्याचा सूड घेण्याचा प्रयत्न जिहादी आतंकवादी करतात, तर हिंदूंवर सतत देशभरात आणि विशेषतः इस्लामी देशांत आक्रमणे होत असतांना हिंदू वैध मार्गानेही या विरोधात आवाज उठवत नाहीत !

कॅलिफोर्निया (अमेरिका) येथे ‘श्‍वेत राष्ट्रवाद्यां’कडून मशिदीला आग लावण्याची घटना

आता अमेरिकेतील नागरिकांनाही ‘असहिष्णु’ म्हटले जाईल; मात्र असे करतांना जगभरात मुसलमानांच्या विरोधात उद्रेक का वाढत आहे, याचे उत्तर मानवतावादी, निधर्मीवादी आणि सामाजिक धुरिणी यांनी शोधायला हवे !

जगामध्ये ‘श्‍वेत राष्ट्रवादा’त मोठ्या प्रमाणात वाढ

हे ‘श्‍वेत राष्ट्रवादी’ विकसित देशांतील आणि आधुनिक देशांतील आहेत. ते विज्ञानवादी आहेत, तरीही त्यांच्यात स्थलांतरित मुसलमानांविषयी चीड निर्माण होत आहे. यामागील कारण भारतियांनी जाणून घेण्याची आवश्यकता आहे. . . .

पाकमध्ये प्रतिवर्षी अल्पसंख्यांकांच्या १ सहस्र मुलींचे धर्मांतर !

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि महिला संघटना यांना हे दिसत नाही का ? कि त्या आंधळ्या झाल्या आहेत ? हे भारतीय दूतावासाला ठाऊक आहे; मात्र भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना ठाऊक नाही, असे कसे म्हणता येईल ? तरीही त्यांनी गेल्या ५ वर्षांत या संदर्भात काहीच केले नाही, हे लक्षात येते !

(म्हणे) ‘सत्तेत आल्यास देशातील २० टक्के गरीब कुटुंबांना वर्षाला ७२ सहस्र रुपये देणार !’ – राहुल गांधी यांचे आमीष

देशातील ७१ वर्षांतील सर्वाधिक काळ सत्तेवर असतांना गरिबी हटवण्याऐवजी गरिबांनाच हटवण्याचे पाप करणार्‍या काँग्रेसला अशी योजना राबवण्याचा अधिकार आहे का ? निवडणूक जिंकण्यासाठी अशी आश्‍वासने देणे म्हणजे एकप्रकारे जनतेला लाच देण्याचा प्रकार होय. अशांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !

मेरठ (उत्तरप्रदेश) येथील रुग्णालयातील अतीदक्षता विभागात महिला रुग्णावर कर्मचार्‍यांकडून सामूहिक बलात्कार

अशा वासनांधांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत ! भारतियांची नैतिकता किती रसातळाला गेली आहे, हेच यातून स्पष्ट होते ! याला गेल्या ७१ वर्षांत जनतेला नैतिकता आणि साधना न शिकवणारे, त्यांच्यावर योग्य संस्कार न करणारे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत !

हिंदु जनजागृती समितीच्या ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’ची यशस्वी सांगता

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी राबवण्यात येणार्‍या ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’ची २५ मार्च या दिवशी यशस्वी सांगता झाली. प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही हे अभियान शतप्रतिशत यशस्वी झाले.

(म्हणे) ‘पाकच्या विरोधात बोलणार्‍यांना १० पट अधिक शिव्या घालीन !’ –  नॅशनल कॉन्फरन्सचे नेते महंमद अकबर लोन यांचे देशद्रोही विधान

अशी देशद्रोही विधाने करणार्‍या लोन यांना आजन्म कारागृहात डांबून त्यांच्या पक्षांवर बंदी घातली पाहिजे; मात्र असे धाडस कणाहीन भाजप सरकार कधीही करणार नाही, हेही तितकेच खरे !

कल्याण शहर शिवसेना शाखेच्या वतीने उत्साहात शिवजयंती साजरी !

येथील कल्याण शहर शिवसेना शाखेच्या वतीने २३ मार्चला तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. कल्याण शहरातील विभागीय शाखेचे अनुमाने ५० चित्ररथ मिरवणुकीत पारंपरिक ढोलताशा पथकासह, लेझीम पथक, मर्दानी खेळ, भजनी मंडळ, आदिवासी नृत्यपथक, विविध गडांचे देखावे,


Multi Language |Offline reading | PDF