विनम्र अभिवादन !

• छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती (तिथीनुसार)
• भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांचा आज बलीदानदिन

भाजपच्या पहिल्या सूचीमधील १८४ पैकी ३५ उमेदवार गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे !

भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलणारे पंतप्रधान मोदी हे स्वपक्षातील गुन्हे नोंद असणार्‍या उमेदवारांच्या विरोधात का बोलत नाहीत ? त्यांना लोकशाहीमध्ये गुन्हे नोंद असणारे लोकप्रतिनिधी अपेक्षित आहेत का ?

(म्हणे) ‘भारताने पाकमध्ये खरेच एअर स्ट्राइक केला आहे का ?’ – काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांचा प्रश्‍न

कुठल्याही राष्ट्रप्रेमी भारतीय नागरिकाच्या मनात हा प्रश्‍न आला नाही; कारण त्याला भारतीय सैन्याच्या शौर्यावर विश्‍वास आहे. काँग्रेसवाल्यांना असे प्रश्‍न पडतात; कारण त्यांची राष्ट्रघातकी मानसिकता !

आतंकवाद्यांना ‘अजहरजी’ आणि ‘ओसामाजी’ संबोधणार्‍या काँग्रेसशी सनातन संस्थेचा संबंध जोडणे, हा राजकीय दुष्प्रचार ! – सनातन संस्था

निवडणुकांच्या राजकीय चिखलात हिंदु धर्माचा प्रचार करणार्‍या सनातन संस्थेला ओढण्याचा काहींचा हेतुपुरस्सर प्रयत्न चालू झाला आहे. सनातन संस्थेशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसणारे भंडारी समाजाचे अध्यक्ष श्री. नवीनचंद्र बांदिवडेकर यांना लक्ष्य करतांना सनातन संस्थेचा वापर करण्यात आला.

कातकरवाडी, वरसई (जिल्हा रायगड) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बांधकामातील भ्रष्टाचार हिंदु विधीज्ञ परिषदेकडून उघड

जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरसई ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वरसई कातकरवाडी येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा मुलांना वावरण्यासाठी अत्यंत धोकादायक बनली असून ती कोणत्याही क्षणी कोसळेल अशी स्थिती आहे.

२ मशिदींमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे न्यूझीलंडमध्ये ‘सेमी अॅटोमॅटिक रायफल’च्या विक्रीवर बंदी

न्यूझीलंडमध्ये खाईस्टचर्च येथील २ मशिदींमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर देशभरात शस्त्रांवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. यामुळे न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी ‘सेमी अ‍ॅटोमिक रायफल’च्या विक्रीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे.

मद्यपी टोळक्याकडून सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे वयस्कर कार्यकर्ते यांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की

धूलिवंदनाच्या दिवशी म्हणजेच २१ मार्चला हिंदु जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ राबवण्यात आले. २१ मार्चला दुपारी ४.४५ च्या सुमारास ४-५ हुल्लडबाज आणि मद्यपी लोकांनी हातात प्रबोधनात्मक फलक धरलेल्या सनातन संस्थेच्या साधकाला शिवीगाळ केली, तसेच समितीच्या एका वयस्कर कार्यकर्त्याला धक्काबुक्कीही केली.

वर्ष २०११-१२ नंतर शेतमजुरांची संख्या ४० टक्क्यांनी अल्प झाली ! – राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाचा अहवाल

वर्ष २०११-१२ नंतर शेतात काम करणार्‍या शेतमजुरांची संख्या ४० टक्क्यांनी अल्प झाली आहे, अशी माहिती राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने जारी केलेल्या ‘पिरिओडिक लेबर फोर्स सर्व्हे’ (पीएल्एफ्एस्) २०१७-१८ मध्ये देण्यात आली आहे.

होळी आणि रंगपंचमी यांच्या निमित्ताने होणार्‍या गैरप्रकारांना आळा घाला !

होळी आणि रंगपंचमी यांच्या निमित्ताने होणार्‍या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांच्या वतीने गस्तीपथक सिद्ध करावे, विशेषतः महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या काळात सतर्क राहून असे गैरप्रकार करणार्‍यांना त्वरित कह्यात घ्यावे, या मागण्या येथे पोलीस आणि प्रशासन यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

केंद्र सरकारने निधी संमत न केल्यामुळे नवी मुंबईतील ‘नाला स्वच्छता योजना’ रखडली !

दिघा, ऐरोली, इंदिरानगरसह अनेक ठिकाणी नैसर्गिक नाल्यांना संरक्षण भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी वारंवार केली होती. त्यासाठी ‘जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजने’च्या अंतर्गत (जेएन्एन्यूआर्एम्) ‘नाला व्हिजन’ राबवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.


Multi Language |Offline reading | PDF