श्रीलंका ४० सहस्र तमिळी हिंदूंंना ठार केल्याच्या आरोपाच्या चौकशीस सिद्ध !

‘लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल इलम्’ (लिट्टे) याच्या समवेत झालेल्या युद्धामध्ये श्रीलंकेच्या सैन्याकडून मानवाधिकाराचे उल्लंघन करण्यात आले होते, असा आरोप करण्यात आला आहे.

ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात ३ मासांत कार्ययोजना बनवा !

विविध शहरांमध्ये ध्वनीप्रदूषण होणार्‍या ठिकाणांची माहिती घेऊन ते दूर करण्यासाठी कार्ययोजना बनवावी, असा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे.

स्वामी असीमानंद यांच्यासहित ४ आरोपी निर्दोष

हिंदु आतंकवादाचा ढोल बडवणारे पुरो(अधो)गामी, हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे आणि तथाकथित निधर्मीवादी आता कुठल्या बिळात लपले आहेत ?

वडोदरा (गुजरात) येथे हिंदु अल्पसंख्यांक होण्याच्या भीतीने विरोध म्हणून हिंदूंचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार !

भाजपशासित राज्यात हिंदूंना अशी भीती वाटते, तर काँग्रेस आणि अन्य हिंदुद्वेषी पक्ष सत्तेवर असलेल्या राज्यांत हिंदूंची स्थिती काय असेल, हे लक्षात येते !

हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाउद्दीन याच्या काश्मीरमधील १३ संपत्ती जप्त

पाकमध्ये रहाणारा जिहादी आतंकवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाउद्दीन याच्या जम्मू-काश्मीरमधील १३ संपत्ती अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) जप्त केली आहे.

आचारसंहितेच्या कारणाखाली पोलिसांनी पिंपरी (पुणे) येथील अफझलखानवधाचे फलक हटवले

पुणे पोलिसांची मोगलाई ! आचारसंहितेचा आणि अफझलखानवधाच्या फलकाचा काय संबंध ? सत्य इतिहास समाजासमोर आणण्यास निवडणुकीचे निमित्त करून आडकाठी केली जाणे, हे अन्यायकारक आहे !

(म्हणे) ‘भारतियांना आवडत नसले, तरी चीनच्या उत्पादनांचा वापर त्यांना करावाच लागेल !’ – चीनच्या सरकारी वर्तमानपत्राचा दावा

चीनच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्या देशाला सर्वच क्षेत्रांत अग्रेसर केल्याने चीन असे म्हणण्याचे दुःसाहस करतो. हा आतापर्यंतच्या भारतीय शासनकर्त्यांना आरसा दाखवण्याचा प्रयत्न आहे. याला कोणताही भारतीय नाकारू शकत नाही, हीसुद्धा वस्तूस्थिती आहे !

गोध्रा हत्याकांडाच्या प्रकरणी याकूब पटालिया याला जन्मठेप

२७ फेब्रुवारी २००२ या दिवशी गोध्रा येथे साबरमती एक्सप्रेसमधील एका डब्याला आग लावून त्यातील ५९ कारसेवकांना जाळून ठार मारल्याच्या प्रकरणी येथील विशेष न्यायालयाने याकूब पटालिया या आरोपीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

(म्हणे) ‘आतंकवादी संघटनांचे समर्थन करणार्‍या पाकच्या ३ मंत्र्यांची हकालपट्टी करा !’ – बिलावल भुत्तो झरदारी यांची मागणी

देशात बंदी घालण्यात आलेल्या आतंकवादी संघटना आणि त्यांची प्रशिक्षण स्थळे यांचे समर्थन करणार्‍या ३ मंत्र्यांची पंतप्रधान इम्रान खान यांनी हकालपट्टी करावी, अशी मागणी पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी)चे अध्यक्ष आणि विरेधी पक्षनेते बिलावल भुत्तो झरदारी यांनी केली आहे


Multi Language |Offline reading | PDF