कोटी कोटी प्रणाम !

• सनातनचे ५१ वे संत पू. जयराम जोशी आजोबा यांचा आज वाढदिवस !
• सनातनच्या ७ व्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचा आज वाढदिवस !

गेल्या ५ वर्षांत चीनकडून शिनझियांगमध्ये १३ सहस्र आतंकवाद्यांना अटक, तर त्यांच्या दीड सहस्र टोळ्या नष्ट

तथाकथित ‘निधर्मी’ भारत निधर्मी चीनकडून आतंकवादी आणि आतंकवादी संघटना यांच्या विरोधात कशी कृती करायची हे शिकेल का ? चीनमधील निधर्मी कम्युनिस्ट जिहादी आतंकवाद्यांना संपवण्याचा प्रयत्न करतो, तर भारतातील कम्युनिस्ट जिहाद्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात !

बालाकोट येथील कारवाईनंतर भाजप आघाडी सरकारला पुन्हा बहुमत मिळणार !

बालाकोट येथील कारवाईनंतर भाजपच्या जागेत वाढ होणार आहे, याचाच अर्थ भाजपने गेल्या ५ वर्षांत पाकमधील आतंकवाद्यांचे मूळ नष्ट केले असते, तसेच राममंदिर, समान नागरी कायदा, कलम ३७०, गोहत्याबंदी आदी सूत्रेही सोडवली असती, तर . . . त्याला पुन्हा निवडून दिले असते !

नीरव मोदी यांच्या विरोधात लंडनमधील न्यायालयाकडून अटक वॉरंट

पंजाब नॅशनल बँकेचे १३ सहस्र कोटी रुपये बुडवून लंडनमध्ये पळून गेलेले हिरे व्यावसायिक नीरव मोदी यांच्या विरोधात लंडनमधील वेस्टमिनिस्टर न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे.

ख्रिस्ती असणार्‍या प्रियांका वाड्रा यांना काशी विश्‍वनाथ मंदिरात दर्शनासाठी अनुमती देऊ नये !

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका वाड्रा २० मार्चपासून ४ दिवसांच्या उत्तरप्रदेशच्या दौर्‍यावर जाणार आहेत. या कालावधीत त्या काशीच्या विश्‍वनाथ मंदिरात दर्शन घेऊन पूजा करणार आहेत. याला वाराणसी येथील अधिवक्त्यांनी आक्षेप घेतला आहे.

पाककडून भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकार्‍यांचा छळ आणि हेरगिरी

इस्लामाबाद येथील भारतीय दूतावासातील अधिकार्‍यांचा छळ आणि त्यांची हेरगिरी करण्यात येत असल्यावरून भारताने पाककडे विरोध दर्शवला आहे. तसेच या घटनांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

(म्हणे) ‘राजीव गांधी यांच्या मारेकर्‍यांना सोडू !’ – द्रमुकच्या घोषणापत्रात आश्‍वासन

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तमिळनाडूतील प्रमुख विरोधी पक्ष द्रमुकने त्याचे घोषणापत्र प्रसिद्ध केले आहे.

सीआरपीएफच्या पोलिसांचे हौतात्म्य देश विसरणार नाही ! – अजित डोवाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणातील केंद्रीय राखीव पोलीस दलातील पोलिसांच्या हौतात्म्याला, त्यांच्या शौर्याला देश कधीही विसरणार नाही, विसरू शकणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी येथे केले. 

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now