‘सनातन प्रभात’ने निर्माण केलेली धर्मशक्ती ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करील !

एप्रिल १९९८ मध्ये मराठी भाषेतील साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ चालू झाले आणि . . . आज २० वर्षांनंतर ‘सनातन प्रभात’चा क्षात्र-ब्राह्मतेजाचा दृष्टीकोन विकसित झालेला वाचकवर्गच सनातन धर्माची शक्ती बनला आहे. ‘सनातन प्रभात’ने निर्माण केलेली ही धर्मशक्ती धर्मसंस्थापनेच्या कार्याला बळ देईल आणि एक दिवस हिंदु राष्ट्र स्थापील !’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले

आज दैनिक सनातन प्रभातचा १९ वा वर्धापनदिन सोहळा !

ईश्‍वराची कृपा, संतांचे आशीर्वाद आणि हितचिंतकांचे सहकार्य यांमुळेच ‘सनातन प्रभात’चे २० व्या वर्षात पदार्पण झाले आहे. या प्रीत्यर्थ आयोजित सोहळ्याला आपण सहकुटुंब अगत्याने यावे आणि राष्ट्राच्या पुनर्रचनेच्या कार्यात सहभागी व्हावे, ही विनंती !

हिंदूंना दिशादर्शन करणारा दीपस्तंभ ‘सनातन प्रभात’ !

राष्ट्ररक्षण आणि धर्मकार्य यांसाठी ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह गेली २० वर्षे अविरतपणे झटत आहे. कोणत्याही प्रकारचे राजकीय आणि आर्थिक पाठबळ नसतांना एखादे नियतकालिक चालवणे, हा चमत्कार आहे. ईश्‍वराचे पाठबळ आणि संतांचे आशीर्वाद यांमुळेच हे शक्य झाले आहे.

मसूद अझहर याच्या विरोधातील कारवाईची सिद्धता पूर्ण ! – सैन्यदलप्रमुख बिपीन रावत

आतंकवादी मसूद अझहर याच्या विरोधात कारवाई करण्याची सिद्धता आम्ही पूर्ण केली आहे; मात्र या कारवाईची माहिती आम्ही उघड करू शकत नाही, असे प्रतिपादन सैन्यदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी येथे प्रसारमाध्यमांशी बोलतांना केले.

आतंकवाद्यांकडून महिला पोलीस अधिकार्‍याची हत्या

आतंकवाद्यांनी येथील वेहिल गावामधील विशेष महिला पोलीस अधिकारी खुशबू जान यांच्या घरात घुसून त्यांची गोळ्या झाडून हत्या केली.

मसूद अझहर याच्या संदर्भात अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन यांची चीनशी चर्चा

चीन अशा चर्चांना भीक घालणार नाही. हे लक्षात घेऊन भारताने आंतरराष्ट्रीय समुदायावर अवलंबून न रहाता थेट पाकमध्ये घुसून मसूद अझहरला ठार मारावे. असे केल्याने त्याला ‘आंतरराष्ट्रीय आतंकवादी’ घोषित करण्यासाठी भारताला खटाटोप करावा लागणार नाही आणि चीनलाही अद्दल घडेल !

टेनिसपटू सानिया मिर्झा यांनी न्यूझीलंडमधील गोळीबारावर दुःख व्यक्त करणारे ट्वीट केल्यावर लोकांचा ‘पुलवामा येथील आक्रमणाचा निषेध का केला नाही’, असा प्रश्‍न !

धर्मबांधवांवर झालेल्या गोळीबारानंतर सानिया मिर्झा यांना दुःख होते आणि ते त्या व्यक्त करतात; मात्र ‘भारतीय सुरक्षादलांवरील आक्रमणाचे दुःख का व्यक्त केले नाही’, असे विचारल्यावर थातूरमातूर उत्तर देऊन त्या गप्प बसतात ! यातून त्यांची खरी मानसिकता समजते !

आम आदमी पक्षाची काँग्रेससमवेत आघाडी !

जर मला काँग्रेस पुन्हा स्वीकारायला सिद्ध असेल, तर मी काँग्रेसमध्ये पुन्हा जायला सिद्ध आहे, अशी टीका आपच्याच देहलीतील आमदार अलका लांबा यांनी केली आहे. अलका लांबा पूर्वी काँग्रेसमध्ये होत्या.

(म्हणे) ‘कर्तारपूरचे नाव ‘खलिस्तान स्थानक’ ठेवा !’ – पाकच्या रेल्वेमंत्र्यांची दर्पोक्ती

‘शिखांना भडकावण्यासाठी पाककडून जाणीवपूर्वक अशी विधाने करण्यात येत आहेत. त्यामुळे ‘भारतापासून अवघ्या ३ किलोमीटर अंतरावर असणारे पाकमधील हे शिखांचे पवित्र स्थान भारताने कह्यात घेण्याचे धाडस दाखवावे’, असेच सर्व भारतियांना आणि राष्ट्रप्रेमी शिखांनाही वाटत आहे !


Multi Language |Offline reading | PDF