न्यूझीलंडमध्ये २ मशिदींमधील गोळीबारात ४९ जण ठार

येथील २ मशिदींमध्ये करण्यात आलेल्या गोळीबारात ४९ जण ठार झाले, तर २० जण गंभीररित्या घायाळ झाल्याची घटना १५ मार्च या दिवशी घडली.

जोतिबा यात्रेत खोबरेवाटी उधळण्यावरील बंदी प्रशासनाकडून यंदाही कायम

प्रशासनाने घेतलेले निर्णय आणि त्याची कार्यवाही यांची सक्ती केवळ हिंदूंच्या परंपरांविषयीच केली जाते. रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत ध्वनीप्रदूषण करायचे नाही, या नियमाचे पालन न करणार्‍या अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर पोलीस कधीही गुन्हे नोंद करत नाहीत ! कायदा जर सर्वांना समान आहे, तर हिंदूंना एक न्याय आणि दुसर्‍या धर्मियांना दुसरा, असे का ?

पोलंडमध्ये गेल्या ३ दशकांत ४०० हून अधिक पाद्रयांकडून लहान मुलांचे लैंगिक शोषण

येथे एका संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार पोलंडमधील एका मोठ्या कॅथलिक चर्चने, ‘गेल्या ३ दशकांत चर्चच्या ४०० हून अधिक पाद्रयांनी लहान मुलांचे आणि मुलींचे लैंगिक शोषण केले’, हे स्वीकारले आहे. भारतातील प्रसारमाध्यमे अशा बातम्या जाणीवपूर्वक दडपतात आणि हिंदु संतांवरील खोट्या आरोपांना कुप्रसिद्धी देतात !

मसूद अझहरला ‘जागतिक आतंकवादी’ घोषित करण्याचा प्रस्ताव चीनने फेटाळल्याच्या निषेधार्थ जळगाव येथे आंदोलन

पाकिस्तानी सैन्याच्या संरक्षणात असलेला जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याला गेल्या १० वर्षांत चौथ्यांदा वाचवणार्‍या चीनला त्याच्या भारतात विकल्या जाणार्‍या मालावर बहिष्कार टाकून धडा शिकवा, असे आवाहन श्री. कैलास सोनवणे यांनी केले.

आचारसंहितेचे कारण पुढे करत जळगाव जिल्ह्यातील काही गावांतून भगवे ध्वज काढले !

आचारसंहितेचे कारण पुढे करत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा झाकण्याचा आदेश देणे आणि भगवे ध्वज काढणे हे देशाचा पाकिस्तान झाल्याचे द्योतक नाही का ?

हिंसाचारात कोणी उजव्या विचारसरणीचे नसल्याने डावे आता सनातनच्या मागे लागले आहेत ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे, प्रवचनकार आणि लेखक

आज लोकांना जे खरे आहे, ते द्यायला हवे. श्रीराम समजून घ्यायचा असेल, तर रावण हवाच. शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील, तर औरंगजेब हवा आणि हिटलर समजून घ्यायचा असेल, तर स्टॅलिन हवा. जगात सर्वांत जास्त हिंसा घडवणारे डावे विचारवंत आणि मुसलमान आहेत. जे सांगू जे लिहू त्याप्रमाणे वागणे, याला विचारवंत म्हणतात. हिंसाचारात कोणी उजव्या विचारसरणीचे नसल्याने डावे आता सनातनच्या मागे लागले आहेत, असे प्रतिपादन प्रवचनकार आणि लेखक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले. 

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धुळे येथे मंदिर, नदी परिसरात टाकून दिलेल्या देवतांच्या मूर्ती आणि चित्रे यांचे विसर्जन !

धुळे येथे नदी, मंदिरे अन् झाडाखाली टाकून दिलेल्या देवतांची चित्रे, मूर्ती आणि संतांची छायाचित्रे यांचे  हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्थानिक हिंदु धर्मप्रेमींच्या साहाय्याने पाण्यात विसर्जन करण्यात आले. या वेळी कालिका माता मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर, गणपती मंदिर येथील मंदिरांच्या बाहेर ठेवलेल्या खंडित मूर्तींचे विसर्जन हत्ती डोह येथे करण्यात आले.

खारघर (नवी मुंबई) येथे ‘इटर्नल हिंदू फाऊंडेशन’च्या वतीने ‘शाश्‍वत देवालय’ या मोहिमेचा शुभारंभ !

येथील शिवमंदिराच्या प्रांगणात १० मार्च या दिवशी ‘शाश्‍वत देवालय’ या मोहिमेचा शुभारंभ ‘इटर्नल हिंदू फाऊंडेशन’चे संरक्षक के.एन्. गोविंदाचार्य यांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी भारतमातेला पुष्पार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर श्रीफळ वाढवून ‘शाश्‍वत देवालय’ या नोंदणी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now