कर्मयोग, भक्तीयोग आणि ज्ञानयोग यांचा एकमेवाद्वितीय सुरेख संगम असलेले परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार !

आध्यात्मिक कारणांमुळे देश-विदेशांतील साधकांना त्रास होत असल्यास ते रात्री-बेरात्री कधीही उपाय विचारल्यास तत्काळ प्रेमाने सांगायचे आणि नंतर साधकाची चौकशीही करायचे, म्हणजे ते अखंड कर्मयोगीही होते.

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या चरणी विशेषांकाच्या निमित्ताने कोटी कोटी वंदन…!

आज (फाल्गुन शुक्ल नवमी) त्यांच्या देहत्यागानंतरचा तेरावा दिवस आहे. यानिमित्त त्यांच्या महान कार्याची समष्टीला ओळख व्हावी, या हेतूने हा विशेषांक प्रसिद्ध करत आहोत. स्थूलदेहाने परात्पर गुरु पांडे महाराज आपल्या समवेत नसले, तरी सूक्ष्मरूपाने त्यांची कृपादृष्टी आपल्यावर सदोदित आहे, हे निश्‍चित !

देहत्याग केलेल्या परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या नावापूर्वी ‘परात्पर गुरु’ हीच उपाधी लावण्याविषयी देवाने सुचवणे !

पांडव, संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज इत्यादींना कोणी ‘कैलासवासी’ अशासारखे संबोधन लावत नाही. त्यांच्या आहे त्याच नावाने त्यांना शेकडो, सहस्रो वर्षे संबोधित केले जात आहे. असे असतांना परात्पर गुरु पांडे महाराजांना ‘परात्पर गुरु’ सोडून निराळे काय संबोधायचे ?

दधिची ऋषींप्रमाणे समष्टीच्या कल्याणासाठी सर्वस्व अर्पण करणारे ऋषितुल्य व्यक्तीमत्त्व : परात्पर गुरु पांडे महाराज !

ऋषिमुनींप्रमाणे समष्टीच्या कल्याणासाठी कार्यरत असणारे परात्पर गुरु पांडे महाराज यांच्यातील निस्सीम प्रीती, त्याग, व्यापकता यांचे घडलेले दर्शन !

परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन

जीव-शिवाची भेट ! परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी १८.२.२००५ या दिवशी परात्पर गुरु पांडे महाराज यांची त्यांच्या अकोला येथील घरी जाऊन भेट घेतली तो क्षण ! या भेटीच्या वेळी परात्पर गुरु पांडे महाराज यांचा भाव जागृत झाला. परात्पर गुरु पांडे महाराज ‘हा दिवस स्वतःचा वाढदिवस आहे’, असे समजत.

महोत्सवाचा महाखर्च !

. . . हा अवाढव्य आकडा केवळ राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्याकडून खर्च होणार्‍या रकमेचा आहे. या व्यतिरिक्त निवडणूक पार पाडण्यासाठी सरकारी आणि प्रशासकीय यंत्रणांकडून जो खर्च होईल, तो वेगळाच. यामुळे ही निवडणूक जगातील सर्वांत महागडी निवडणूक ठरण्याची शक्यता आहे !

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या चरणी अर्पण केलेले प्रार्थनारूपी मनोगत !

‘चैतन्य म्हणजे काय असते’, याविषयी प.पू. बाबा नेहमी सांगायचे. त्या चैतन्याची प्रचीती मी आज घेत आहे. त्यांनी जरी देहत्याग केला असला, तरी त्यांचे अस्तित्व मला सातत्याने जाणवते. ते खर्‍या अर्थाने अमर झाले आहेत.

परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांच्या महानिर्वाणानंतर एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

साधकांसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साक्षात प्रतिरूप असलेले, सनातनच्या प्रत्येक साधकांवर अपार प्रीतीचा वर्षाव करणारे ज्ञानयोगी आणि ऋषितुल्य परात्पर गुरु परशराम पांडे महाराज (वय ९१ वर्षे) यांनी ३ मार्च २०१९ या दिवशी सायंकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात देहत्याग केला.

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या देहत्यागाची वार्ता ऐकून ‘महाराजांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर आलेले आक्रमण स्वतःवर घेतले असणार’, असा विचार पू. प्रदीप खेमका आणि पू. (सौ.) सुनीता खेमका यांच्या मनात येणे अन् मयन महर्षि यांनी असेच सांगितले असल्याचे दैनिक सनातन प्रभातमधून समजणे

‘परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या देहत्यागाची वार्ता ऐकून पू. प्रदीप खेमका आणि पू. (सौ.) सुनीता खेमका यांच्या मनात विचार आला, ‘परात्पर गुरु पांडे महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर आलेले आक्रमण स्वतःवर घेतले असणार…..

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याविषयी दैनिक सनातन प्रभातमधून यापूर्वी प्रसिद्ध झालेले वैशिष्ट्यपूर्ण लिखाण

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेले संभाषण (३ मार्च, ४ मार्च, ५ मार्च आणि १२ मार्च २०१९)


Multi Language |Offline reading | PDF