लोकप्रतिनिधींच्या वाढत्या संपत्तीवर लक्ष ठेवणारी यंत्रणा का स्थापन केली नाही ?

केंद्र सरकारने लोकप्रतिनिधींच्या अचानक वाढणार्‍या संपत्तीवर लक्ष ठेवण्यासाठी एखाद्या यंत्रणेची स्थापना का केली नाही ?, असा प्रश्‍न विचारत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला नोटीस बजावली आहे. यावर २ आठवड्यांत उत्तर देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

पश्‍चात्ताप करावा लागू नये, यासाठी मतदान करा ! – पंतप्रधान मोदी

‘आपण मतदान केले असते, तर अशी वाईट परिस्थिती आज नसती’, असा विचार त्याच्या मनात आला पाहिजे. असा पश्‍चात्ताप करावा लागू नये, यासाठी मतदान करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे केले आहे.

लोकसभा निवडणुकीवर ५० सहस्र कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता

ज्या देशातील प्रत्येक नागरिकावर ६२ सहस्र रुपयांचे कर्ज आहे, त्या देशातील निवडणुकीवर असा खर्च केला जात असेल आणि त्यातून निवडून येणार्‍यांमध्ये अनेक जण हत्या, बलात्कार, फसवणूक, खंडणी आदी गुन्हे करणारे असणार आहेत, तर याला लोकशाही म्हणता येईल का ?

भारताच्या ‘एअर स्ट्राईक’मध्ये २०० आतंकवादी ठार झाले ! – गिलगिट येथील सामाजिक कार्यकर्त्याची माहिती

पाकिस्तानी सैन्याधिकार्‍याने बालाकोट येथील भारताच्या ‘एअर स्ट्राईक’मध्ये २०० आतंकवादी मारले गेल्याची स्वीकृती दिली आहे. आतंकवाद्यांचा या वेळी ‘मुजाहिद’ म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.

पुलवामामध्ये आतंकवाद्याकडून एका सैनिकाची हत्या

पुलवामा येथे एका आतंकवाद्याने सैनिक आशिक अहमद नायक उपाख्य आसिक हुसेन (वय २५ वर्षे) यांची त्यांच्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ आस्थापनाच्या संचालकांच्या विरोधात पाळधी (जळगाव) येथे पोलिसांत तक्रार नोंद

‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ या आस्थापनाने ‘सर्फ एक्सेल’ या उत्पादनाचे रंगपंचमीनिमित्त एक विज्ञापन प्रसारित केले आहे. या विज्ञापनात हिंदूंच्या सणांच्या निमित्ताने पुन्हा एकदा जाणीवपूर्वक हिंदूंचा अवमान करण्यात आला आहे.

न्यूझीलंडमध्ये ‘सुपरमार्केट’च्या चुकीमुळे गोमांस खावे लागल्याने शुद्धीकरणयात्रेचा खर्च देण्याची हिंदूची मागणी

कुठे चुकून गोमांस भक्षण करावे लागल्याने संबंधितांकडे शुद्धीकरणाचा खर्च मागणारे विदेशातील धर्माचरणी हिंदू, तर कुठे स्वतःहून गोमांस भक्षण करून वर त्याची बढाई मारणारे भारतातील धर्मद्रोही हिंदू !

राष्ट्रीय प्रश्‍न, राजकीय पक्ष आणि राष्ट्रीय ऐक्य !

‘भारताला स्वातंत्र्य मिळून ३७ वर्षे झाली, तरी अद्याप राष्ट्रीय प्रश्‍नांची नोंद ‘राष्ट्रीय प्रश्‍न’ म्हणून घेतली जात नाही. याला मुख्यतः राजकीय पक्ष उत्तरदायी आहेत. आपण ब्रिटिशांची सांसदीय शासनप्रणाली स्वीकारली; पण त्यासह येणार्‍या दायित्वांकडे दुर्लक्ष केले. कोणत्याही प्रकारची पाश्‍चिमात्य पद्धतीची लोकशाही…

भारतीय लोकशाहीचे सध्याचे लाजिरवाणे स्वरूप !

‘पूर्वीच्या निवडणुकांत दोन चांगल्यांमधील अधिक चांगला उमेदवार कोण, त्याला मतदार मते देत. आता दोन वाईटांमधील कमी वाईट कोण त्याला किंवा जो अधिक पैसे देईल, त्याला मते देतात !’

गोव्यातील निवडणूक ‘इस्टर’ आणि ‘होली वीक’च्या कालावधीत आल्याने ख्रिस्ती समाजाकडून नाराजी व्यक्त !

भारतीय निवडणूक आयोगाने गोव्यात २३ एप्रिलला लोकसभेच्या दोन मतदारसंघांसाठी, तसेच शिरोडा, मांद्रे आणि म्हापसा मदारसंघांसाठी पोटनिवडणुका घोषित केल्या आहेत. ही निवडणुकीची दिनांक ‘इस्टर’ आणि ‘होली वीक’च्या कालावधीत आल्याने ख्रिस्ती समाजातील अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF