(म्हणे) ‘भाजपने अल्पसंख्यांकांचे घटनात्मक अधिकार कायम ठेवावेत !’ – चर्च संघटना

देशद्रोही ख्रिस्ती नेते मिझोरामला ‘स्वतंत्र ख्रिस्ती राष्ट्र’ असल्याचे घोषित करतात, तेव्हा चर्च संघटना कुठे झोपलेल्या असतात ? ८ राज्यांत हिंदुु अल्पसंख्यांक आहेत, तेथील हिंदूंचे अधिकार कायम ठेवण्याविषयी, त्यांना अल्पसंख्यांकांचा दर्जा देऊन त्यांना मिळणार्‍या सुविधा देण्यासाठी ही संघटना का बोलत नाही ?

वाहनांद्वारे होणारे प्रदूषण पहाता फटाक्यांच्या मागे का लागता ? – सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्‍न

वाहनांमुळे वायूप्रदूषण होते; मात्र फटाक्यांमुळे वायूप्रदूषणासह ध्वनीप्रदूषणही मोठ्या प्रमाणात होते. सर्वसामान्य जनतेला भोगावे लागणारे फटाक्यांचे दुष्परिणाम, त्यामुळे होणारी पैशांची उधळपट्टी आणि होणारे अपघाती मृत्यू यांचा विचार करता सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवरील बंदी पुढेही कायम ठेवावी.

आणखी एका आक्रमणासाठी भाजपकडून बंगालमधील निवडणूक लांबवली जात आहे ! – ममता बॅनर्जी यांचा आरोप

बंगालला त्रास देण्यासाठी आणखी एका आक्रमणाचा कट भाजपने आखला आहे. त्यासाठीच बंगालमधील निवडणुका लांबवल्या जात आहेत, असा आरोप राज्याच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

पीलीभीत (उत्तरप्रदेश) येथे शिवमंदिरातील मूर्तींची तोडफोड

येथील मोहल्ला बाजारामधील शिवमंदिरातील मूर्तींची अज्ञातांकडून रात्रीच्या वेळी तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

जागतिक शांततेच्या दृष्टीने आतंकवाद धोकादायक ! – मोदी

तुर्कस्थानचे राष्ट्राध्यक्ष रिसेप तय्यीप एर्दोगान यांच्याशी चर्चा करतांना मोदी यांनी ‘आतंकवाद हा जागतिक शांततेच्या दृष्टीने धोकादायक आहे’, असे म्हटले. ‘आतंकवादाच्या विरोधात सर्व देशांनी कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे’, असेही ते म्हणाले.

गेल्या १० दिवसांत भारताच्या प्रत्युत्तरात पाकचे ६ सैनिक ठार

पाक परत कधीही गोळीबार करणार नाही, यासाठी पाकचे अस्तित्वच नष्ट करण्याची आवश्यकता आहे, हे भारतीय शासनकर्त्यांना लक्षात येऊनही ते त्यांच्या कणाहीनतेमुळे तसे करणार नाहीत, त्यासाठी हिंदु राष्ट्रच आवश्यक आहे !

पाकिस्तानी सैन्य काश्मिरी लोकांना आत्मघातकी आक्रमणासाठी दबाव टाकते !

पाक सरकारने या आतंकवादी ठिकाणांना नष्ट करण्याचे दायित्व घेतले पाहिजे आणि या आतंकवाद्यांपासून सुटका करून घेतली पाहिजे. हे आतंकवादी केवळ स्थानिक लोकांचीच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय शांतता नष्ट करत आहेत. – पाकव्याप्त काश्मीरमधील मानवाधिकार कार्यकर्ते एम्. हसन

भाजप सरकारच्या काळात खासगी संस्थांना मिळणार्‍या विदेशी अर्पणात ४० टक्क्यांची घट

ख्रिस्ती मिशनरी आणि जिहादी विचारांचा प्रसार करणार्‍या संस्था यांना विदेशातून धन मिळत होते अन् त्याचा वापर हिंदु आणि देश यांच्या विरोधात कारवाया करण्यासाठी केला जात होता. त्यामुळे सरकारला ही कठोर भूमिका घ्यावी लागली, हे लक्षात घ्यायला हवे !

सिकेरी (मये) येथे गोमंतक गौसेवक महासंघ गोशाळा येथे अग्निहोत्री सोमयाजी सुहोता आपटे यांच्या हस्ते इष्टी यज्ञ

अग्निहोत्री सोमयाजी सुहोता आपटे यांनी सिकेरी (मये) येथे गोमंतक गौसेवक महासंघ गोशाळा येथे १० मार्च या दिवशी सपत्निक श्रौत यज्ञांपैकी एक असा कामेष्टी यज्ञ म्हणजेच इष्टी यज्ञ केला. विशेष म्हणजे हा यज्ञ स्वत:च्या इच्छापूर्तीसाठी नव्हे, तर देशकल्याणासाठी करण्यात आला.


Multi Language |Offline reading | PDF