देशात लोकसभेच्या निवडणुका ७ टप्प्यांत होणार : २३ मे या दिवशी मतमोजणी

लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक ७ टप्प्यांत घेण्यात येणार असून सर्व ठिकाणांची मतमोजणी २३ मे या दिवशी होणार आहे आणि त्याच दिवशी निकाल घोषित करण्यात येतील, – केंद्रीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष सुनील अरोरा

निवडणूक प्रचारात सैनिकांची छायाचित्रे वापरू नका ! – निवडणूक आयोगाचा राजकीय पक्षांना आदेश

निवडणुकीच्या प्रचारामध्ये सैनिक किंवा सैन्याधिकारी यांच्या छायाचित्रांचा वापर करू नका, असा आदेश निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आणि स्थानिक राजकीय पक्ष यांना पत्र पाठवून दिला आहे.

(म्हणे) ‘आतंकवाद आता सहन करणार नाही !’ – नरेंद्र मोदी

आतंकवादाविषयी आता आम्ही गप्प बसणार नाही. पुष्कळ झाले. आता सहन करणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकचे नाव न घेता चेतावणी दिली.

पुंछमध्ये पाककडून गोळीबार

१० मार्चला सकाळी पाकच्या सैन्याने पुंछ येथील सीमेवरील भारतीय चौक्यांवर शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करत गोळीबार केला.

(म्हणे) ‘राममंदिर उभारणीपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !’ – रा.स्व. संघ

जर न्यायालयाच्या माध्यमातूनच राममंदिराविषयी निकाल लागणार आहे, तर संघाच्या आंदोलनाला काय अर्थ रहातो ?

मलेशियामध्ये फेसबूकवरून इस्लामचा अवमान करणार्‍या युवकाला १० वर्षांची शिक्षा

मलेशियासारख्या इस्लामी राष्ट्रात इस्लामचा अवमान करणार्‍याला लगेच शिक्षा होते; मात्र भारतासारख्या निधर्मी देशात धार्मिक श्रद्धास्थानांचा अवमान करणार्‍यांना अनेक वर्षे शिक्षाच होत नाही !

इंदूर येथे शाळेच्या बसच्या धडकेत शेळीचा मृत्यू झाल्याने धर्मांधांनी बसवर केलेल्या दगडफेकीत ९ शाळकरी मुले घायाळ

एका शेळीचा मृत्यू झाल्यावर धर्मांध आक्रमक होतात; मात्र प्रतिदिन शेकडो गायींच्या हत्या होत असतांना हिंदू मात्र शांत बसतात !

‘इथिओपियन एअरलाइन्स’चे विमान कोसळून १५७ जणांचा मृत्यू

इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा येथून केनियातील नैरोबी येथे जात असलेले बोईंग ७३७ विमान कोसळले आहे. या विमानातून प्रवास करत असलेल्या ८ कर्मचार्‍यांसह १५७ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

लंडनमध्ये पाकची गुप्तचर यंत्रणा ‘आयएस्आय’चे खलिस्तानी समर्थकांच्या साहाय्याने भारतियांवर आक्रमण

पाकची गुप्तचर यंत्रणा ‘आयएस्आय’ने लंडनमधील काश्मिरी खलिस्तानी समर्थकांना हाताशी धरून भारतीय नागरिकांवर आक्रमण केल्याची घटना ९ मार्चच्या रात्री येथील भारतीय दूतावासाबाहेर घडली.

दक्षिणायनच्या प्रतिनिधींनी हुबळ्ळी येथे घेतली राहुल गांधी यांची भेट !

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली देशभरात हिंदूविरोधी अभियान राबवणारी हिंदुद्रोही दक्षिणायन संघटना गोव्यात आगामी लोकसभा निवडणुका काँग्रेसच्या तिकिटावर लढवण्यासाठी इच्छुक आहे.


Multi Language |Offline reading | PDF