(म्हणे) ‘पनवेल येथील सनातनच्या केंद्रात हत्यारे सापडली !’

पनवेलमधील सनातनच्या केंद्रात हत्यारे सापडली, असा धादांत खोटा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांनी खांदा कॉलनी येथे ‘बहुजन वंचित आघाडी’च्या सभेत ७ मार्च या दिवशी केला.

पाकमधील पूर्वीच्या कोणत्याही सरकारने आतंकवाद्यांवर कारवाई केली नाही !  – पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांची स्वीकृती

इम्रान खान यांना खरेच कारवाई करत असल्याचे दाखवायचे असेल, तर या आतंकवाद्यांना त्वरित भारताच्या कह्यात द्यावे आणि पाकमधील आतंकवाद्यांची सर्व प्रशिक्षणकेंद्रे आणि आतंकवादी निर्मितीचे कारखाने असलेले मदरसे बंद करावेत !

शरीयतनुसार मशीद स्थलांतरित करता येत असल्याने प्रभु श्रीरामांसाठी बाबरीचे स्थलांतर करावे ! – प्रा. मौलाना सलमान नदवी

नेहमी शरीयत कायद्यानुसार वागणारे मुसलमान राममंदिराच्या सूत्राकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करतात, हे लक्षात घ्या ! जेथे शरीयतमुळे तोटा होतो, असे लक्षात येते, तेथे मुसलमान शरीयतला बाजूला ठेवतात !

पाकिस्तानमध्ये बलुची संघटनेकडून गॅस पाईपलाईन उद्ध्वस्त

पाकच्या बलुचिस्तानमधील ‘बलोच लिबरेशन टायगर’ या संघटनेने बलुचिस्तानमध्ये असणार्‍या डेरा बुगती येथील गॅस पाईपलाईन उद्ध्वस्त केली. गेल्या १ मासात या संघटनेनेे केलेले हे तिसरे आक्रमण आहे. सुई गॅस प्रकल्पाजवळील ही गॅस पाईपलाईन उद्ध्वस्त केल्यामुळे ४ जणांचा मृत्यू झाला. 

धार्मिक प्रतिकांची सात्त्विकता वाढवल्यास त्याचा भक्तांच्या साधना-प्रवासावर सकारात्मक परिणाम होतो ! – मिलुटिन पांक्रात्स 

‘प्रत्येक प्रतीक किंवा चिन्ह यातून सूक्ष्म स्पंदने प्रक्षेपित होत असतात. ही स्पंदने सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतात. बहुतांश लोक त्यांच्या धर्माच्या प्रतिकांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांविषयी अनभिज्ञ असतात. त्यामुळे त्यांच्या धार्मिक प्रतिकांमधून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असल्यास त्यांना त्याची जाणीव नसते.

राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्यरत असलेल्या धर्माभिमान्यांचा छळ करणारे पोलीस धर्मांधांसमोर नांगी टाकतात !

‘हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मंगळूरू आणि शिवमोग्गा येथे २७.१.२०१९ या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. हिंदु राष्ट्र-जागृती सभेला अनुमती मिळावी, यासाठी समितीचे श्री. चंद्र मोगेर आणि श्री. प्रभाकर नायक यांनी मंगळूरूच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची भेट घेतली.

निष्क्रीय पोलीस ! असुरक्षित मुलांना सुरक्षा पुरवण्यासाठी पोलिसांचे सहकार्य मिळत नाही, तर अशी पोलीस यंत्रणा काय कामाची ?

‘म्हापसा, गोवा येथील प्रसिद्ध श्री देव बोडगेश्‍वर जत्रेत सुमारे ५० मुले विविध साहित्यांची विक्री करणे, भीक मागणे, डोंबार्‍याचे खेळ यांच्यामध्ये गुंतलेली आहेत. या मुलांचा अनधिकृत कामासाठीही वापर केला जात असावा, तसेच अन्य राज्यांतून ही मुले या ठिकाणी पळवून आणली गेली असावी.

न संपणारा वनवास !

प्रभु श्रीरामांना त्रेतायुगात १४ वर्षे राजकीय वनवासात रहावे लागले होते. त्याप्रमाणे कलियुगातही त्यांना राजकीय वनवास सहन करावा लागत आहे. त्रेतायुगात ते वनवासाला जातांना अयोध्येची जनता रडली होती, तसेच तिने काही दिवस अन्नही वर्ज्य केले होते. कलियुगातही श्रीरामाचे अनेक भक्त आहेत…

राममंदिराचा विषय रखडणे, हे स्वत: हिंदुत्वनिष्ठ म्हणवणार्‍या राज्यकर्त्यांना अशोभनीय ! – उद्धव ठाकरे, शिवसेना

सर्वोच्च न्यायालयाने श्रीराम जन्मभूमीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी ३ सदस्य समिती मध्यस्थ म्हणून नेमली आहे. प्रश्‍न इतकाच आहे की, दोन्ही बाजूच्या पक्षकारांना मध्यस्थी, तडजोड मान्य होती, तर मग २५ वर्षांपासून हा झगडा का चालू ठेवला ?

विदेशी आस्थापन ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’कडून हिंदु धर्माचा पुन्हा अवमान

‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ या विदेशी आस्थापनाचे उत्पादन असलेल्या ‘सर्फ एक्सेल’ या कपडे धुण्याच्या चुर्‍याच्या होळीच्या निमित्ताने बनवलेल्या ध्वनीचित्रफितीच्या विज्ञापनातून होळी सणाचा अवमान करण्यात आला आहे.


Multi Language |Offline reading | PDF