सर्वोच्च न्यायालयाकडून ३ सदस्यीय मध्यस्थ समितीची स्थापना

सर्व पुरावे हिंदूंच्या बाजूने असतांना आणि इतिहासही हिंदूंचा असतांना या प्रकरणाला लागणारा वेळ भारतीय लोकशाहीची निरर्थकता स्पष्ट करत आहे, असे कोणी म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये !

काँग्रेसचे माजी आमदार नीरज भारती यांच्या विरोधात गोवा राज्यात फौजदारी तक्रार

पाकने भारताला, तसेच सनातन संस्थेला लक्ष्य करण्याविषयी चिथावणी देणार्‍या ‘फेसबूक पोस्ट’चे प्रकरण

बिकानेरमध्ये ‘मिग-२१ बायसन’ विमान कोसळले !

संपत्काळात आणि आपत्काळातही कोसळणारे विमान भारतीय संरक्षण मंत्रालय वायूदलाला वापरण्यास का देत आहे, हे भारतियांना न सुटलेले कोडे आहे ! अशा उडत्या शवपेट्यांच्या माध्यमातून भारताच्या सीमांचे रक्षण भारतीय वायूदलाला करावे लागत आहे, हे सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना लज्जास्पद आहे !

मन्नार (श्रीलंका) येथे प्राचीन शिवमंदिरांवर आक्रमण

श्रीलंकेतील अल्पसंख्यांक हिंदू आणि त्यांची मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारतातील हिंदुत्वनिष्ठ म्हणवणारे भाजप सरकार आणि मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना काही करतील, अशी अपेक्षा न करता सर्वत्रच्या हिंदूंनी आता संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याला पर्याय नाही !

(म्हणे) ‘‘चर्च कायद्या’ची कार्यवाही करणार नाही !’ – केरळच्या मुख्यमंत्र्यांचे बिशप यांना आश्‍वासन

‘चर्च कायद्या’ची कार्यवाही केरळ राज्यात करणार नाही, असे आश्‍वासन केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांनी केरळच्या चर्चच्या बिशपांच्या शिष्टमंडळास दिले आहे.

आमदार संदीप नाईक यांच्यावर कारवाई न केल्यास शिवसेना आंदोलन करणार ! – खासदार राजन विचारे

ऐरोली येथील हाणामारीप्रकरणी आमदार संदीप नाईक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांना कह्यात न घेतल्यास शिवसेना पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलन करील, अशी चेतावणी खासदार राजन विचारे यांनी ६ मार्च या दिवशी वाशी येथे एका पत्रकार परिषदेत दिली.

राज्य सरकारचा ११ पोलिसांची जन्मठेपेची शिक्षा स्थगित करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाकडून रहित !

कुख्यात गुंड छोटा राजन याचा हस्तक रामनारायण गुप्ता उपाख्य लखनभैय्या याची २००६ मध्ये पोलिसांनी बनावट चकमक घडवून आणली होती. या प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने ११ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती; मात्र राज्य सरकारने ही शिक्षा स्थगित करून त्यांची कारागृहातून सुटका करण्यास अनुमती दिली होती.

बनावट पारपत्राद्वारे विदेशात जाणार्‍या बांगलादेशी धर्मांधाला अटक

बनावट पारपत्र बनवून विदेशात जात असलेल्या रशिदुल इस्माईल अब्दुल केशम या धर्मांधाला ४ मार्च या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली. तो मूळचा बांगलादेशचा असून भारत-बांगलादेश सीमा ओलांडून कोलकाता येथे आला. तेथे त्याने काही मास काम केले.

चालत्या रेल्वेत महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणार्‍या तिकीट तपासनीसाला अटक

चेन्नईहून मुंबईला येणार्‍या रेल्वेत (एक्सप्रेस) एकट्या महिलेला पाहून तिकीट तपासनीसाने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. एच्. मीना असे या तिकीट तपासनीसाचे नाव आहे. रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ्) जवानांनी कल्याण स्थानकातून मीना याला अटक करून दादर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now