जम्मू बसस्थानकावर ग्रेनेडद्वारे केलेल्या आक्रमणात १ जण ठार, ३२ घायाळ

सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक यांद्वारे उरी अन् पुलवामा आक्रमणाचा सूड उगवल्याचे सांगणारे भाजप सरकार या आक्रमणाचा सूड उगवणार कि पुन्हा मोठ्या आक्रमणाची ते वाट पहात रहाणार ?

पाकची गुप्तचर संघटना आयएस्आय जैशच्या साहाय्याने भारतात बॉम्बस्फोट घडवून आणत होती !

मुशर्रफ स्वतः राष्ट्रपती होते, त्या वेळी त्यांनी हे का उघड केले नाही ? आताही ते त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी ही स्वीकृती देत आहेत, हे जनता जाणून आहे !

‘हिंदुस्थान युनिलिव्हर’कडून ट्वीटद्वारे कुंभमेळ्याचा अवमान

हिंदूंनी आता अशा विदेशी आस्थापनांच्या उत्पादनांवर बहिष्कार घालणे, हीच खरी देशभक्ती होय !

पाककडून १८२ मदरसे नियंत्रणात, तर १०० आतंकवादी अटकेत

पुलवामा येथील आक्रमणानंतर पाकवर जागतिक स्तरावरून दबाव वाढत असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे पाकच्या गृह मंत्रालयाने सांगितले. केवळ अटक नको, तर त्यांना फाशी देण्याचे धाडस पाकिस्तान दाखवणार का ?

न्यायाधिशांनुसार सुनावणीची प्रक्रिया पालटणारी भारतीय न्यायप्रणाली !

‘अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणाकडे श्रद्धा किंवा भावनेचा विषय म्हणून पाहिले जाणार नाही. हा खटला भूमीच्या वादाप्रमाणे हाताळला जाईल’, असे ८.२.२०१८ या दिवशी रामजन्मभूमीवरील सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी म्हटले होते.

विवाहबाह्य संबंधातून घडणार्‍या गुन्ह्यांना मालिका आणि चित्रपट कारणीभूत आहेत का, हे शोधा !

मालिका आणि चित्रपट यांतून आपण काय बोध घेत आहोत, हे जाणण्याची तरी बौद्धीक आणि मानसिक क्षमता जनतेमध्ये राहिली आहे का ? अशा गोष्टी टाळण्यासाठी भारतीय संस्कृती आणि धर्म यांचे शिक्षण शाळेतून देण्यासह साधना शिकवणे महत्त्वाचे आहे, हे लक्षात घ्या !

ऑस्ट्रेलियाच्या दोषी कार्डिनलवर आणखी एक लैंगिक शोषणाचा गुन्हा नोंद

वर्ष १९९० मध्ये लहान मुलांचे लैंगिक शोेषण केल्यावरून दोषी ठरवण्यात आलेले ऑस्ट्रेलियाचे कार्डिनल जॉर्ज पेल यांच्यावर वर्ष १९७० मध्ये २ लहान मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणावरून नवीन गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

शांत बसत नसतील, तर ठोकून काढा !

स्वतंत्र विदर्भाची किंवा स्वतंत्र राज्याची मागणी करणे, हे देशाच्या एकसंधतेसाठी धोक्याचे आहे. त्यामुळे अशी मागणी करणार्‍यांवर वैध मार्गाने कारवाई करण्याऐवजी एका केंद्रीयमंत्र्यांनी अशी भाषा वापरणे कितपत योग्य ?

‘षोडशलक्ष्मी यागा’च्या दिवशी भ्रमणभाषवर देवीच्या आरतीचे ध्वनीमुद्रण लावल्यानंतर सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील देवीतत्त्वामुळे त्यांच्या पायांची ठेवण आपोआप एकसारखी होणे

आरती ऐकण्यापूर्वी दोघींच्या पायांची स्थिती वेगवेगळी होती.’ देवीची आरती ऐकतांना पायांची एकसारखी स्थिती त्यांच्याकडून आपोआपच झाली होती. सद्गुरुद्वयींनी डाव्या पायाच्या मांडीवर उजवा पाय ठेवला होता आणि वर असलेल्या उजव्या पायाची स्थितीही सारखीच होती. यामुळे त्यांना आश्‍चर्य वाटले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now