रामजन्मभूमी वाद हा भूमीचाच नाही, तर धार्मिक भावनांचाही प्रश्‍न ! – सर्वोच्च न्यायालय

मध्यस्थ नेमण्याचा निर्णय राखून ठेवला

पुढच्या कारवाईच्या वेळी विरोधकांना विमानाला बांधून न्यायला हवे ! – केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के. सिंह

भारताने आतंकवादी देश पाकला नष्ट केल्यास कोणी प्रश्‍न विचारण्याची आणि त्यांना उत्तरे देण्याची आवश्यकता भासणार नाही, हे भाजप सरकारने लक्षात घेऊन कृती करणे आवश्यक आहे !

वायूदलाकडून केंद्र सरकारला ‘एअर स्ट्राईक’चे पुरावे देण्यात आल्याचे वृत्त

भारतीय वायूदलाने २६ फेब्रुवारीला पाकच्या बालाकोट येथील  जैश-ए-महंमदच्या तळावर आक्रमण केले होते. या संदर्भातील पुरावे वायूदलाने केंद्र सरकारला सादर केले आहेत, असे वृत्त ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीनने दिले आहे.

अमेरिकेने पाक नागरिकांसाठीच्या व्हिसाची मुदत ५ वर्षांवरून केवळ ३ मासांवर आणली !

अमेरिकेने पाकिस्तानी नागरिकांना मिळणार्‍या व्हिसाच्या मर्यादेमध्ये मोठी घट केली आहे. ही मर्यादा आता ५ वर्षांवरून केवळ ३ मासांवर आणण्यात आली आहे. ही माहिती अमेरिकेच्या उच्चायुक्तालयाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

हिंदुविरोधी विधाने करणार्‍या पाकच्या मंत्र्याची मंत्रीमंडळातून हकालपट्टी

हिंदूंविषयी आक्षेपार्ह विधाने करणार्‍या पाकमधील फय्याज अल हसन चौहान या मंत्र्याची हकालपट्टी करण्यात आली आहे. पाकच्या पंजाब प्रांतामधील सरकारमध्ये फय्याज हे माहिती आणि सांस्कृतिक मंत्री होते.

(म्हणे) ‘कपाळावर कुंकवाचा टिळा आणि भस्म लावणार्‍यांची भीती वाटते !’ – कर्नाटकातील काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या

गेल्या २ वर्षांपासून राहुल गांधी कपाळावर टिळा लावून हिंदूंच्या मंदिरात जातात त्याची भीती सिद्धरामय्या यांना वाटत नाही का ?

राफेल प्रकरणातील कागदपत्रांची संरक्षण मंत्रालयातून चोरी करून बातम्या प्रसिद्ध ! – केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती

संरक्षण मंत्रालयातून संवेदनशील आणि गोपनीय कराराची कागदपत्रे चोरी कशी होऊ शकतात ? चोरी होऊ देण्याला उत्तरदायी असणार्‍यांवरही कारवाई झाली पाहिजे !

जगातील सर्वाधिक प्रदूषित २० शहरांमधील १५ शहरे भारतात !

जगातील २० सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या सूचीमध्ये १५ शहरे भारतातील आहेत. यामध्ये देहलीजवळील ‘राष्ट्रीय राजनाधी क्षेत्र (एनसीआर)’ हे वर्ष २०१८ मधील जगातील सर्वाधिक प्रदूषित क्षेत्र म्हणून नव्याने समोर आले आहे.

वायूप्रदूषणामुळे जगभरात ७० लाख लोकांचा मृत्यू ! – संयुक्त राष्ट्र

घर आणि घराबाहेरील वायूप्रदूषणामुळे प्रत्येक वर्षी ७० लाख लोकांचा मृत्यू होत असतो. यात ६ लाख मुलांचा समावेश आहे, अशी माहिती पर्यावरण आणि मानवाधिकार यांविषयीचे संयुक्त राष्ट्राचे विशेष दूत डेविड आर्. बॉयड यांनी दिली आहे.

बोईसर येथे अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी नियुक्त केलेल्या विशेष पथकातील २ पोलिसांचेच लाच घेतल्याप्रकरणी स्थानांतर

पालघर जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या विशेष पथकातील पोलीसच हप्ते घेत असल्याचा प्रकार पुढे आला आहे.


Multi Language |Offline reading | PDF