विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची आज सुटका करण्याची पाकची घोषणा

पाकच्या कह्यात असलेले भारतीय वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची १ मार्च या दिवशी सुटका केली जाईल, अशी घोेषणा पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या संसदेत केली. असे असले, तरी भारताने धूर्त पाकच्या विरोधात धडक कारवाई चालूच ठेवणे अपेक्षित आहे !

भारताचे ‘पायलट प्रोजेक्ट’ यशस्वी झाले, आता खरी कृती नंतर करू ! – पंतप्रधान

खरी कृती नंतर नाही, तर आताच पूर्ण करायला हवी! गेली ७१ वर्षे भारताने जे भोगले आणि अजूनही भोगत आहे, त्याचा शेवट होणे आवश्यक आहे. जनतेला केवळ ‘पायलट प्रोजेक्ट’ नकोत, तर पूर्ण कृती हवी आहे !

भारत आणि पाक यांच्यातील संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर लवकरच ‘शुभवार्ता’ समजेल ! – डोनाल्ड ट्रम्प

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर एक शुभवार्ता समजेल. दोन्ही देशांतील तणाव वाढत आहे आणि तो अल्प करण्याच्या प्रक्रियेमध्ये अमेरिकाही सहभागी आहे. हा तणाव लवकरच निवळेल, असे दिसत आहे.

पाकने आतंकवाद्यांवर कारवाई करावी ! – जपानने पाकला सुनावले

काश्मीरमध्ये परिस्थिती बिघडत असून त्याविषयी आम्हाला चिंता आहे. पुलवामा आक्रमणामागे हात असलेल्या जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. आतंकवादाचा सामना करण्यासाठी पाकने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे

(म्हणे) ‘भारतीय वायूदलाच्या कारवाईचा भाजपला लाभ होऊन भाजप कर्नाटकमध्ये २२ हून अधिक जागा जिंकेल !’ – भाजपचे नेते येडियुरप्पा

भारतीय वायूदलाने पाकचे विमान पाडले. यानंतर भारतीय नागरिक पंतप्रधान मोदी यांच्या निर्णयाचे स्वागत करतांना दिसत आहेत. पाकवरील आक्रमणामुळे भाजपला कर्नाटकमध्ये लोकसभेच्या २२ हून अधिक जागा जिंकण्यास साहाय्य होईल,

अजित डोवाल आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॅम्पिओ यांच्यात दूरभाषवरून चर्चा

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॅम्पिओ यांनी २७ फेब्रुवारीला रात्री उशिरा दूरभाषवरून चर्चा झाली.

हेराल्ड हाऊस रिकामे करण्याचा देहली उच्च न्यायालयाचा आदेश

देहली उच्च न्यायालयाने ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ (एजेएल्) या संस्थेला देहलीतील ‘आयटीओ’मधील ‘हेराल्ड हाऊस’वरील नियंत्रण सोडण्याचा आदेश दिला आहे. एजेएल् ही संस्था काँग्रेस पक्षाचे मुखपत्र ‘नॅशनल हेरॉल्ड’चे प्रकाशक आहे.

पाकच्या कह्यात असलेले भारतीय वैमानिक अभिनंदन वर्थमान यांनी दाखवलेल्या शौर्याचा पाकच्या प्रसारमाध्यमांकडून उल्लेख

पाकच्या लढाऊ विमानांनी काश्मीरमध्ये घुसखोरी केल्यावर भारताच्या वायूदलाच्या विमानांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यातील एका विमानाला पाडले; मात्र त्याच वेळेत भारताचे मिग २१ बायसन हे विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले.

व्हॅटिकन सिटीचे आर्थिक व्यवहार प्रमुख कार्डिनल जॉर्ज पेल यांना पदावरून हटवले !

व्हॅटिकनमधील मोठ्या पदावरील पाद्य्राला लैंगिक शोषणाच्या प्रकरणी दोषी ठरवून त्यांची पदावरून हकालपट्टी होते, तरी भारतातील पुरो(अधो)गामी, निधर्मी असणारे ख्रिस्तीप्रेमी, तसेच ख्रिस्ती मालकांची प्रसारमाध्यमे मात्र मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !

सनातनच्या पू. (श्रीमती) सत्यवती दळवीआजी पंचतत्त्वात विलीन !

सनातनच्या ७७ व्या संत पू. (श्रीमती) दळवीआजी (वय ८३ वर्षे) यांनी २७ फेब्रुवारीला सायंकाळी ७.५५ वाजता येथील सनातनच्या आश्रमात देहत्याग केला. २८ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ११ वाजता त्यांच्यावर देवद येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF