भारताने पाकचे ‘एफ्-१६’ विमान पाडले, तर कारवाईत भारताचे ‘मिग-२१’ पडले !

काश्मीरमध्ये पाक वायूदलाच्या घुसखोरीला भारतीय वायूदलाचे तत्परतेने प्रत्युत्तर – भारतीय वायूदलाने कारवाई करून पाकचे विमान पाडले असले, तरी मुळात पाकचे विमान भारताच्या सीमेमध्ये घुसू कसे शकले, असा प्रश्‍न निर्माण होतो.

भारतीय सैन्याकडून पाकच्या ५ चौक्या उद्ध्वस्त

भारताच्या वायूसेनेने केलेल्या कारवाईनंतर पाकच्या सैन्याने काश्मीरमधील राजौरी आणि पुंछ येथील सीमेवर शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करत गोळीबार केला. याला भारतीय सैनिकांनी प्रत्युत्तर दिले. त्यात पाक सैन्याच्या ५ चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या.

(म्हणे) ‘पुलवामाची चौकशी करू; पण आम्हाला युद्ध नको !’ – इम्रान खान यांची शरणागती

पाकने कितीही गयावया केला, तरी इतिहास पहाता पाक असे उपकार विसरून भारताच्या पाठीत खंजीर खुपसतो ! हे लक्षात घेऊन त्याच्या भूलथापांना भाजप सरकारने बळी पडू नये !

अमेरिका ओसामाला ठार करू शकते, तर भारतालाही हे शक्य आहे ! – अरुण जेटली

अमेरिकेचे ‘नेव्ही सील कमांडो’ पथक पाकिस्तानातील अबोटाबादमध्ये घुसून अल् कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनला ठार करू शकते, तर भारतही हे करू शकतो. सध्याच्या परिस्थितीत सर्व काही शक्य आहे, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे.

मिग-१७ चॉपरच्या अपघातात २ वैमानिकांचा मृत्यू

उडत्या शवपेट्या झालेली मिग चॉपर्स ! इतक्या वर्षांत भारतीय शासनकर्ते यावर उपाय काढू शकले नाहीत किंवा ती वायूदलातून बाद करू शकले नाहीत. त्यामुळे युद्धात नाही, तर अशा अपघातांत बहुमोल अशा वैमानिकांचा नाहक मृत्यू होणे, हे भारताला लज्जास्पद आहे !

राममंदिराचे प्रकरण न्यायालयाने नियुक्त केलेल्या मध्यस्थांकडे सोपवण्याचा विचार ! – सर्वोच्च न्यायालय

अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी हे प्रकरण न्यायालयाने नियुक्त केलेल्या मध्यस्थांकडे सोपवण्याविषयी सर्वोच्च न्यायालय विचार करत आहे. ‘आता हे प्रकरण अनेक वर्षे असेच चालू रहाणार आणि राममंदिराची उभारणी पुन्हा लांबणीवर पडणार’, असे हिंदु समाजाला वाटल्यास चूक ते काय ?

पाकमधील आमची कारवाई आतंकवाद्यांच्या विरोधात ! – सुषमा स्वराज

भारताच्या विरोधात पुन्हा आतंकवादी आक्रमणाच्या सिद्धतेत असलेल्या जैश-ए-महंमदला धडा शिकवणे, हा आक्रमणामागचा उद्देश होता. आम्ही पाकिस्तानला वारंवार सांगूनही त्याने आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई केली नाही. त्यामुळे आम्हाला ही कारवाई करावी लागली. – सुषमा स्वराज

सनातनच्या ७७ व्या संत पू. (श्रीमती) सत्यवती दळवीआजी यांचा देहत्याग

सनातनच्या ७७ व्या संत पू. (श्रीमती) सत्यवती दळवी (वय ८३ वर्षे) यांनी २७ फेब्रुवारीच्या सायंकाळी ७.५५ वाजता देवद येथील सनातनच्या आश्रमात देहत्याग केला.

सोप्या भाषेत धर्मशिक्षण देणे, हे सनातन संस्थेचे वैशिष्ट्य आहे !  श्री. रमाकांत गोस्वामी, वृंदावन

सनातन संस्था आजच्या काळात भाविकांना सनातन धर्माचे शिक्षण देण्याचे कार्य करत आहे. सोप्या भाषेत धर्मशिक्षण देणे, हे सनातन संस्थेचे वैशिष्ट्य आहे. यासाठी संस्थेने कुंभक्षेत्री धर्मशिक्षण प्रदर्शन लावले आहे.

हवाई आक्रमणातून पाकिस्तानला सुधारण्याची चेतावणी ! – निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत

सुधारा, नाहीतर आमचीही युद्धाची सिद्धता आहे.  हा तर प्रारंभ आहे, असाच संदेश भारतीय वायुदलाच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानची नियंत्रण रेषा ओलांडून केलेल्या आक्रमणातून दिला आहे. यातून पाकिस्तानी लष्कर बोध घेईल, अशी अपेक्षा निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत यांनी व्यक्त केली.


Multi Language |Offline reading | PDF