कोटी कोटी प्रणाम !

• आज रामदासनवमी
• छत्तीसगड येथील सनातनचे १८ वे संत पू. चत्तरसिंह इंगळे यांचा आज वाढदिवस
• सोलापूर येथील सनातनच्या ६६ व्या संत पू. (श्रीमती) नंदिनी मंगळवेढेकर यांचा आज वाढदिवस

जैश-ए-महंमदचे मुख्य प्रशिक्षणकेंद्र नष्ट

भारतीय वायूदलाचे अभिनंदन ! गेल्या ३ दशकांत झालेल्या आतंकवादी आक्रमणांचा असा सूड का घेण्यात आला नाही, त्यासाठी ४० सैनिकांच्या हौतात्म्याची वाट का पहावी लागली, याचे उत्तर काँग्रेस आणि भाजप या दोघांनीही दिले पाहिजे !

कच्छ (गुजरात) येथे पाकचे ड्रोन उद्ध्वस्त

२६ फेब्रुवारीला येथील सीमेवर पाकचे मानवविरहित विमान (ड्रोन) भारतीय सैन्याने उडवले.

(म्हणे) ‘भारताला योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी प्रत्युत्तर देणार !’ – इम्रान खान

पाकमध्ये भारताला प्रत्युत्तर देण्याची क्षमता नसल्यानेच तो आतंकवाद्यांच्या माध्यमातून भारताच्या विरोधात छुपे युद्ध करत आहे ! पाकने प्रत्युत्तर देण्यापूर्वीच भारताने त्याचा समूळ नाश करावा !

(म्हणे) ‘भारताने निर्जनस्थळी बॉम्ब फेकले !’ – पाक सैन्य

निर्जनस्थळावर टाकलेले बॉम्ब ही पाकला चेतावणी आहे, असे त्याने समजावे ! जर पाकला असे वाटते की, भारताने निर्जनस्थळी बॉम्ब फेकले असतील, तर तो भारताला प्रत्युत्तर देण्याची भाषा का करत आहे ?

आता मसूद अझहर आणि हाफिज सईद यांच्यावर कारवाई करा ! – असदुद्दीन ओवैसी

यांच्यावर कारवाई करण्यासमवेत ‘भारतातील पाकप्रेमी, काश्मीरमधील सैन्यावर दगडफेक करणारे देशद्रोही आणि मेहबूबा मुफ्ती, फारुख अब्दुल्ला यांच्यासारखे राजकीय नेते यांच्यावरही कारवाई करा’, असे ओवैसी कधी म्हणणार ?

पणजी येथे जैश-ए-महंमदच्या नावाची आक्षेपार्ह पत्रके असलेली बॅग सापडली, आतंकवादविरोधी पथकाकडून शोधाशोध

पुलवामा येथे आतंकवादी आक्रमण करणारी जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेची पत्रके असलेली बॅग बांबोळी येथील बीएस्एन्एल् कार्यालयाजवळ सापडली आहे. या प्रकारानंतर आतंकवादीविरोधी पथकाने या ठिकाणी झाडाझडती घेतली.

हिंदु राष्ट्र स्थापन होईपर्यंत सनातनचे साधक स्वस्थ बसणार नाहीत ! – सौ. नयना भगत

सनातन संस्थेने तथाकथित विचारवंतांचे पितळ उघडे पाडल्याने आणि त्यांच्या हिंदु धर्म विरोधी अपप्रचाराला चोख वैचारिक प्रत्युत्तर दिल्यानेच संस्थेला लक्ष्य बनवण्यात आले आहे. यातूनच त्यांच्या हत्यांमध्ये संस्थेचे नाव गोवून संस्थेचे भव्य कार्य ….

निधर्मी भारतात जर सर्व धर्मियांचा विकास होत असेल, तर मग केवळ हिंदूंच्याच मंदिरांचा पैसा का वापरला जातो ? – वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे, हिंदु जनजागृती समिती

भारताच्या सीमेवर प्रत्यक्ष युद्ध चालू झाले असले, तरी भारताच्या अंतर्गत अनेक ठिकाणी  लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद यांच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे युद्ध चालूच आहे. त्यामुळे भारतात छोटे पाकिस्तान निर्माण होत आहेत.


Multi Language |Offline reading | PDF