(म्हणे) ‘शांततेची एक संधी द्या !’

कुत्र्याचे शेपूट कोणत्याही नळीत घातले, तरी ते वाकडेच रहाते, हे वास्तव आहे.  पाकचेही हेच वास्तव आहे. त्यामुळे अशा विनंतीकडे भारताने दुर्लक्ष करणेच योग्य ! अशी विनंती केवळ दिखावा असून भारताकडून कोणतीही कारवाई होऊ नये, यासाठी केलेला बनाव आहे.

मागासवर्गीय असल्यामुळे काँग्रेसने मला ३ वेळा मुख्यमंत्री बनण्यापासून रोखले !

स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांत काँग्रेसने मागासवर्गियांना मूर्ख बनवण्याचा कसा प्रयत्न केला, हेच एक मागासवर्गीय असणारे काँग्रेसचे नेते उघड करत आहेत. तथाकथित पुरो(अधो)गामी हे लक्षात घेतील का ?

(म्हणे) ‘पाकची भारतावर ५० अणूबॉम्ब टाकण्याची सिद्धता आहे का ?’ – परवेझ मुशर्रफ

वर्ष १९६५ आणि वर्ष १९७१ मध्ये या दोन्ही ठिकाणांवरून पाकने भारतावर आक्रमण केले होते; मात्र दोन्ही ठिकाणी त्याला धडा शिकवण्यात आला होता. वर्ष १९७१ मध्ये भारताचे सैन्य लाहोरपर्यंत गेले होते, तर कराची बंदर उद्ध्वस्त करण्यात आले होते, हे मुशर्रफ यांनी विसरू नये !

(म्हणे) ‘कलम ३७० काढले, तर भारताचे काश्मीरशी असलेले नाते संपुष्टात येईल !’ – काँग्रेस नेते सैफुद्दीन सोझ

या कलमामुळेच काश्मीरशी अन्य भारतियांचे नातेच निर्माण होऊ देण्यात आलेले नाही. ते काढले की, खर्‍या अर्थाने ते नाते निर्माण होईल आणि काश्मीरमध्ये खर्‍या अर्थाने भारताचे दर्शन होईल !

कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ नका ! – उच्च न्यायालय

निळवंडे धरणासाठी शिर्डी संस्थानकडून ५०० कोटी रुपये देण्याच्या प्रकरणी हिंदु विधीज्ञ परिषदेची हस्तक्षेप याचिका – खंडपीठाने ‘या प्रकरणी कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ नयेत; मात्र प्रतिदिनच्या खर्चाला अनुमती आहे’, असा आदेश दिला.

पाद्य्रांकडून झालेले लहान मुलांचे लैंगिक शोषण नरबळीसारखे ! – पोप फ्रान्सिस

चर्चमध्ये पाद्य्रांकडून मुले, नन्स आणि महिला यांच्या लैंगिक शोषणाच्या जगभरात असंख्य घटना घडल्या आहेत अन् घडत आहेत; मात्र भारतातील ख्रिस्तीप्रेमी आणि ख्रिस्ती मालक असलेली तथाकथित निधर्मीवादी प्रसारमाध्यमे यावर मौन बाळगतात !

सुरक्षादलांवर जमावाकडून होणार्‍या आक्रमणांमुळे त्यांच्या मानवाधिकारांसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

अशी याचिका प्रविष्ट करावी लागते, याचाच अर्थ सरकार आणि तथाकथित मानवाधिकारवाले यांना सुरक्षादलांच्या मानवाधिकाराशी काहीही देणेघेणे नाही, असाच होतो !

महर्षि मयन यांनी सांगितल्याप्रमाणे सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी रामेश्‍वरम् येथे केलेले परिहार (उपाय) आणि त्या वेळी आलेल्या अनुभूती

११.१.२०१९ या दिवशी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी तमिळनाडूतील रामेश्‍वरम् येथे विशेष पूजा केली.

‘सनबर्न क्लासिक’ला अनुज्ञप्ती दिल्याने काँग्रेसची शासनावर टीका

काँग्रेसचे ‘वरातीमागून घोडे !’ ‘सनबर्न’ महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी महोत्सवाला विरोध करणारी काँग्रेस एवढे दिवस मूग गिळून गप्प का होती ?

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील विघ्ने दूर व्हावीत, यासाठी न्हिवे-कातवड (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री दत्तक्षेत्रात केला श्री दत्त सुदर्शन याग !

न्हिवे-कातवड येथील श्री दत्तक्षेत्राचा ७ वा वर्धापनदिन नुकताच भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.


Multi Language |Offline reading | PDF