नक्षली साहित्य वाचले म्हणून अटक होणार नाही ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

. . . असे मुख्यमंत्री सांगतात, तर कर्नाटकातील विशेष अन्वेषण पथकाकडून ‘भगवद्गीतेतील शिकवणीवर आधारित सनातनचा ‘क्षात्रधर्म साधना’ ग्रंथ वाचून आरोपींनी गौरी लंकेश आणि अन्य पुरोगाम्यांच्या हत्या केल्या’ म्हणून आरोपपत्रात उल्लेख केला जातो.

(म्हणे) ‘सनातन संस्थेवर सरकार बंदी घालत नाही !’

अंनिसचे तत्कालीन कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या अन्वेषणातून काहीच निष्पन्न झालेले नाही. पोलिसांना ठिकठिकाणी शस्त्रे आणि बॉम्ब यांचे साठे सापडत आहेत. त्याविषयी सरकार कोणतीही कारवाई करत नाही.

देवीला साडी नेसवण्याची पद्धतच ठाऊक नसल्याने ७४ उमेदवार प्रात्यक्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील पगारी पुजारीपदाच्या परीक्षेतील प्रकार : हा तर मंदिर सरकारीकरणाचा गंभीर दुष्परिणामच ! देवीला साडीच नेसवता येत नसेल, तर असे पगारी पुजारी देवीशी संबंधित पूजाविधी कसे पार पाडतील, याचा विचारच न केलेला बरा !

अरुणाचल प्रदेशमध्ये संतप्त जमावाने उपमुख्यमंत्र्यांचा बंगला जाळला

अरुणाचल प्रदेशमध्ये सध्या ६ आदिवासी समुदायांना स्थायी निवासी प्रमाणपत्र देण्याच्या प्रस्तावाच्या विरोधात आंदोलन चालू आहे. या आंदोलनाला २३ फेब्रुवारीला हिंसक वळण लागले. यातूनच २४ फेब्रुवारीला येथे संतप्त जमावाने राज्याचे ….

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कुंभमेळ्यामध्ये गंगानदीत पवित्र स्नान

येथे २४ फेब्रुवारी या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगानदीत स्नान केले. तसेच नंतर येथे पूजाअर्चा केली. या वेळी त्यांच्यासमवेत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.

पुलवामामध्ये हुतात्मा झालेले सैनिक हे राजकीय व्यवस्थेचे बळी ! – राज ठाकरे यांचा आरोप

पुलवामा येथे हुतात्मा झालेले सैनिक हे राजकीय व्यवस्थेचे बळी आहेत. संरक्षण सल्लागार अजित डोवाल यांची कसून चौकशी केल्यास धक्कादायक सत्य बाहेर येईल, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.

(म्हणे) ‘जोपर्यंत भारतातील मुसलमान जिवंत आहेत, तोपर्यंत येथील मंदिरांतून घंटेचा आवाज येत राहील !’ – खासदार असदुद्दीन ओवैसी

१०० कोटी हिंदूंना संपवण्याची धमकी देणारे अकबरुद्दीन ओवैसी यांच्या बंधूंनी अशी विधाने करणे हास्यास्पद ! हिंदूंनो, मतांसाठी केल्या जाणार्‍या अशा भूलथापांना बळी पडू नका आणि आगामी निवडणुकीत अशांना त्यांची जागा दाखवून द्या !

अमेरिकेत बिअरचे नाव ‘हनुमान’ ठेवून देवतेचे विडंबन

विदेशात सातत्याने आणि जाणीवपूर्वक मद्य, शौचालयांचे भांडे, पादत्राणे आदींवर हिंदूंच्या देवतांची नावे आणि चित्रे ठेवून त्यांचा अवमान केला जात आहे. अशांवर कठोर कारवाई होण्यासाठी भाजप सरकारने स्वतःहून प्रयत्न करायला हवेत !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी तमिळनाडूतील उत्तिरकोसमंगै येथील मंदिरात केली पूजा !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ११.१.२०१९ या दिवशी तमिळनाडूतील रामनाथपूरम् जिल्ह्यातील उत्तिरकोसमंगै या गावातील ‘मंगलेश्‍वरी समेत मंगलनाथ स्वामी’ मंदिरात जाऊन विशेष पूजा केली.


Multi Language |Offline reading | PDF