गुरु थोर कि देव थोर म्हणावा ।

शिष्याला ईश्‍वराची ओळख करून देणारे गुरु ! असे उच्चकोटीचे गुरु उच्चतम असे शिष्य घडवून जिवांचा उद्धार करतात ! जेव्हा हा उच्चतम असा शिष्य गुर्वाज्ञेने आध्यात्मिक उत्तराधिकारी म्हणून कार्य करू लागतो, तेव्हा तो एक अनोखा गुरु-शिष्य संगम असतो.

भारत पाकच्या विरोधात कठोर पावले उचलण्याच्या सिद्धतेत ! – डोनाल्ड ट्रम्प

आतापर्यंत स्वतःच्या कणाहीनतेमुळे आणि अमेरिकेच्या दबावामुळे भारताने पाकच्या विरोधात कठोर कारवाई केली नाही, ही वस्तूस्थिती आहे. आता ट्रम्प असे विधान करून पुन्हा भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असेच भारतियांना वाटते !

(म्हणे) ‘सत्तेत आल्यास काँग्रेस अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी प्रयत्न करील !’ – काँग्रेस नेते हरीश रावत

देशात ५५ वर्षांपेक्षा अधिक काळ सत्तेत असतांना काँग्रेस हे करू शकली नाही, उलट सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून ‘राम काल्पनिक होता’, असे सांगत स्वतः श्रीरामाने निर्मिलेला रामसेतू तोडण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला, हा इतिहास आहे. असे असतांना रावत कोणत्या तोंडाने ‘राममंदिर बांधू’, असे सांगत आहेत ?

वर्ष २०१४ पासून काश्मीरमध्ये प्रत्येक २ आतंकवाद्यांना ठार करतांना १ सैनिक हुतात्मा

दक्षिण आशियातील आतंकवादाची माहिती ठेवणार्‍या ‘एस्एटीपी’ या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार वर्ष २०१४ ते २०१९ या कालावधीत वर्ष २०१८ मध्ये सर्वाधिक आतंकवादी कारवाया झाल्या. वर्ष २०१९ च्या पहिल्या २ मासांमध्ये आतंकवादाशी संबंधित घटनांमध्ये १६….

काश्मीरमध्ये यासिन मलिकसह २४ फुटीरतावाद्यांना अटक

काश्मीरमध्ये पोलिसांनी २४ फुटीरतावाद्यांना अटक केली आहे. यात यासिन मलिक, ‘जमात-ए-इस्लामी जम्मू अ‍ॅण्ड कश्मीर’चा प्रमुख अब्दुल हमीद फैयाज यांचा समावेश आहे.

पाकचे आतंकवादी स्थानिक बंदीवानांना चिथावणी देत असल्याने त्यांना देहलीच्या कारागृहात हलवावे !

जम्मू-काश्मीर प्रशासनाची सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी- कारागृहात असलेले आतंकवादी तेथूनही त्यांच्या कारवाया चालू ठेवतील. त्यामुळे त्यांच्यावर जलदगतीने खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकार आणि प्रशासन प्रयत्न का करत नाहीत ?

भृगु महर्षींच्या आज्ञेने सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ घोषित !

माघ पौर्णिमा हा दिवस सनातनच्या साधकांसाठी अहोभाग्य घेऊन उजाडला ! गुरूंनी दिलेले सद्गुरुपद यर्थार्थपणे भूषवणार्‍या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या सद्गुरुद्वयींना भृगु महर्षींच्या आज्ञेनुसार माघ पौर्णिमेला म्हणजे १९ फेब्रुवारी  या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ म्हणून घोषित करण्यात आले.

सद्गुरुद्वयींनी ‘श्रीं’ बीजमंत्रयुक्त पदक धारण करण्याआधी त्या पदकांची सकारात्मकऊर्जे ची प्रभावळ अन्य पदकांच्या तुलनेत अत्यधिक असण्यामागील आध्यात्मिक कारणमीमांसा

‘महर्षींच्या आज्ञेनुसार विविध ठिकाणी गुरुपादुकांसमवेत ‘श्रीं’ बीजमंत्रयुक्त पदकांचीही स्थापना करण्यात येणार आहे. यासह महर्षींनी ‘सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनीही ‘श्रीं’ बीजमंत्रयुक्त पदक कंठात धारण करावे’, असे सांगितले आहे.

युद्ध जिंकायचे कि क्रिकेट ?

सध्या देशभर विशेषतः प्रसारमाध्यमे आणि क्रीडाक्षेत्रात एकच विषय चर्चिला जात आहे, तो म्हणजे पुलवामात आक्रमण करणार्‍या पाकशी क्रिकेट खेळायचे कि नाही  ? खरेतर असले बिकडोक, निरर्थक आणि स्वाभिमानशून्य प्रश्‍न केवळ भारतातच निर्माण होऊ शकतात किंवा केले जाऊ शकतात…..

मुंब्रा येथून अटक केलेल्या इसिसच्या आतंकवाद्यांनी काश्मीरमध्ये पैसे पाठवल्याचे चौकशीतून उघड !

अन्न किंवा पाणी यांमध्ये विष मिसळून घातपात घडवण्याचा कट रचणार्‍या इसिसच्या १० संशयित आतांकवाद्यांना मुंब्रा आणि संभाजीनगर येथून काही दिवसांपूर्वी आतंकवादविरोधी पथकाने अटक केली. यातील एकाने काश्मीरमध्ये पैसे पाठवल्याचे चौकशीतून समोर आले आहे.


Multi Language |Offline reading | PDF