११ सहस्र धुळेवासियांचा हिंदु राष्ट्र स्थापनेचा उद्घोष !

धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत हिंदु राष्ट्र-जागृती सभा यशस्वी ! भगवान श्रीकृष्णाचा देश म्हणजे ‘कन्हदेश’ या नावावरून पुढे रूढ झालेल्या खान्देशातील धुळे येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा झाली. धुळेवासियांनी या सभेत हिंदु राष्ट्र स्थापनेचा उद्घोष केला.

सर्वोच्च न्यायालयाकडून महाराष्ट्रासह ११ राज्यांना नोटीस

काश्मिरींना उद्रेकामुळे कोणी मारहाण करत असेल, तर लगेच त्याच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली जाते; मात्र काश्मीरमध्ये सैनिकांवर काश्मिरी धर्मांधांकडून होणार्‍या दगडफेकीच्या संदर्भात कोणीच का न्यायालयात जात नाही ?

देवबंद (उत्तरप्रदेश) येथून जैश-ए-महंमदच्या २ आतंकवाद्यांना अटक

उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने राज्यातील देवबंद येथून जैश-ए-महंमदच्या २ आतंकवाद्यांना अटक केली आहे. शाहनवाज अहमद तेली आणि आकिब अहमद मलिक अशी या आतंकवाद्यांची नावे आहेत.

मुंबईतील रेल्वेस्थानकांवर आक्रमण होण्याची गुप्तचर संघटनांची चेतावणी !

भारतीय आणि मुंबईकर किती दिवस आतंकवादाचे सावट डोक्यावर घेऊन फिरणार ? सर्वपक्षीय सरकारे हे संकट दूर करण्यासाठी निष्प्रभ ठरली आहेत. हे संकट कायमचे संपवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

मुंबईवरील आक्रमणाचा सूत्रधार आतंकवादी हाफिज सईदच्या दोन्ही संघटनांवर पाककडून बंदी !

हा निर्णय घेऊन जगाच्या डोळ्यात धूळफेक करण्याचाच प्रयत्न पाक करत आहे, हे न समजायला जगातील लोक दूधखुळे नाहीत !

भारतात कोणतीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करणार नाही ! – पाकच्या तक्रारीनंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचा निर्णय

पाकच्या नेमबाजपटूंना व्हिसा नाकारल्याचे प्रकरण – पाकला आतंकवादी देश घोषित करून त्याच्यासमवेत असलेले सर्व संबंध तोडून टाकण्याचा निर्णय भारत का घेत नाही ?

लैंगिक शोषण झालेली मुले न्यायाची मागणी करत आहेत ! – पोप फ्रान्सिस 

गेली अनेक वर्षे पाद्य्रांकडून लहान मुले, महिला आणि नन यांचे लैंगिक शोषण केले जात आहे; मात्र ते रोखण्यासाठी व्हॅटिकन सिटीने कोणतेही ठोस उपाय केलेले नाहीत आणि आताही ते करत नसल्याने पोप यांना असे विधान करावे लागत आहे, हे स्पष्ट होते !

काश्मीरमध्ये १ आतंकवादी ठार

येथे सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये एका आतंकवाद्याला ठार करण्यात आले आहे. चकमकीच्या वेळी स्थानिकांकडून होणारा विरोध टाळण्यासाठी या परिसरात २१ फेब्रुवारीच्या रात्रीपासूनच जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

पुलवामा आक्रमणाच्या सूत्रधारांना शिक्षा करा ! – संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी पाकला बजावले

पाकिस्ताने आंतरराष्ट्रीय कायद्यांविषयी त्याच्या असलेल्या दायित्वाची जाणीव ठेवून पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणाच्या सूत्रधारांना त्वरित शिक्षा करावी, असे संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अ‍ॅण्टोनियो गटरेस यांनी पाकला बजावले आहे.

धुळे येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत मान्यवरांच्या जाज्वल्य भाषणांनी हिंदूतेज जागवले !

देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी शिवरायांचे मावळे व्हा ! – आमदार टी. राजासिंह…….
हिंदूंना षंढ बनवण्यासाठी परकियांचा इतिहास शिकवला जात आहे !  कु. रागेश्री देशपांडे, रणरागिणी शाखा……..


Multi Language |Offline reading | PDF