(म्हणे) ‘युद्ध झाले, तर भारतातील मंदिरांमधील घंटानाद बंद होईल !’

‘युद्ध झाले, तर भारतातील मंदिरांमधील घंटानाद नव्हे, तर भारतासह पाकमधील मशिदींतील अजान बंद होईल’, अशी धमकी भारतातील भाजप किंवा अन्य पक्षांचा एकतरी मंत्री कधी देऊ शकतो का ?

आतंकवादामुळे जम्मू-काश्मीरची ३० वर्षांत ४ लाख ५५ सहस्र कोटी रुपयांची हानी

जिहादी आतंकवादामुळे जम्मू-काश्मीरची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. गेल्या ३० वर्षांत आतंकवादी कारवायांमुळे राज्याची ४ लाख ५५ सहस्र कोटी रुपयांपेक्षा अधिक हानी झाली आहे.

पाक सैन्य सांगेल, तसेच इम्रान खान वागतात ! – इम्रान खान यांच्या पूर्व पत्नीचा दावा

पुलवामा आक्रमणानंतर प्रतिक्रिया देण्यासाठी इम्रान खान हे तेथील सैन्याच्या अनुमतीची वाट पहात होते, असे त्यांची पूर्व पत्नी रेहम खान यांनी म्हटले आहे. ‘स्वतःच्या तत्त्वांना तिलांजली देऊन इम्रान खान सत्तेवर बसले आहेत’, असा आरोपही त्यांनी केला.

सैनिकांवर दगडफेक करणार्‍यांचे स्वागत कसे करायचे ? – हॉटेलचालकांचा प्रश्‍न

पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणानंतर आगर्‍यामधील हॉटेलचालकांनी त्यांच्या हॉटेलमध्ये काश्मिरी नागरिकांना खोली न देण्याचा निर्णय घेतला आहेे. या संदर्भातील काही पत्रकेही त्यांच्याकडून प्रसारित करण्यात आली आहेत.

राममंदिराची सुनावणी २६ फेब्रुवारीला

येत्या २६ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात राममंदिर खटल्याची सुनावणी होणार आहे. या खटल्याच्या सुनावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ५ सदस्यीय खंडपिठातील न्यायमूर्ती शरद बोबडे सुट्टीवर होते.

३७० कलम रहित करण्यासाठी भाजपच्या आमदाराची ‘ऑनलाईन’ मोहीम

जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेले ३७० कलम रहित करण्यासाठी ‘ऑनलाईन’ मोहीम चालू करण्यात आली आहे. त्यासाठी ‘ऑनलाईन साइन इन’ करून पाठिंबा द्या, असे आवाहन भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

भृगु महर्षींच्या आज्ञेने सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ घोषित !

गुरुपरंपरा ही भारताने विश्‍वाला दिलेली अमूल्य देणगी आहे. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गुरुकृपायोगाची निर्मिती करून साधकांना जलद आध्यात्मिक उन्नतीचा राजमार्गच उपलब्ध करून दिला.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी केली तिरुकोष्टीयुर (तमिळनाडू) येथील सौम्य नारायण मंदिरात पूजा !

७.१.२०१९ या दिवशी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी तमिळनाडूतील तिरुकोष्टीयुर येथील सौम्य नारायण मंदिरात जाऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी विशेष पूजा केली. महर्षि मयन यांनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून ५.१.२०१९ या दिवशी सांगितले….

प्रत्येकच कृती परिपूर्ण करण्याचा ध्यास असणार्‍या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकू !

‘मी काढलेली भावचित्रे सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकूंना पहाण्यास पाठवली. तेव्हा त्यांनी त्यात सुधारणा सांगितल्या. आतापर्यंत एखादी अनुभूती आल्यानंतर मी भावचित्रे काढत असे. त्या वेळी ती चित्रे परिपूर्ण काढण्याचा विचार माझ्याकडून होत नसे.

साधना म्हणून नव्हे, तर पैसे मिळवण्याचा व्यवसाय म्हणून नाडीपट्टीवाचनाद्वारे भविष्यकथन करणारे काही नाडीवाचक !

‘भारतातील बर्‍याच ठिकाणी मुख्यत्वे तमिळनाडूमध्ये असणार्‍या बर्‍याच नाडीपट्ट्यांमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी अनेक वेळा ‘हे अवतारी आहेत. महान पुरुष आहेत. श्रीकृष्णानेच ‘जयंत’ नावाच्या रूपात कलियुगात पुन्हा अवतार घेतला आहे.


Multi Language |Offline reading | PDF