काश्मीरमधील ५ फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षाव्यवस्था काढली

पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर भाजप सरकारने काश्मीरमधील ५ पाकप्रेमी फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षाव्यवस्था काढण्याची घोषणा केली.

काश्मीरमध्ये दगडफेक करणार्‍यांना गोळ्या घाला ! – हुतात्मा पोलिसाच्या वडिलांचा उद्वेग

पोलीस हुतात्मा झाल्यानंतर ‘तुम्हाला वाटते, तेच मलाही वाटते’, असे जनतेला सांगणारे पंतप्रधान मोदी यांनी ‘हुतात्मा पोलिसांच्या नातेवाइकांना जे वाटते, तेच स्वतःला वाटते का ?’, हे सांगायला हवे ! जर मोदी यांनाही असेच वाटत असेल, तर दगडफेक करणार्‍या धर्मांधांवर कारवाई का होत नाही ? नूरपूरबेदी (पंजाब) – सैनिकांच्या हातात केवळ दांडे देऊन काय होणार ? काश्मीरमध्ये … Read more

तुमच्या मनात जी खदखद, तीच माझ्या मनातही आहे ! – पंतप्रधान मोदी

तुमच्या मनात जी खदखद आहे, तीच खदखद माझ्या मनातही आहे, असे विधान पंतप्रधान मोदी यांनी येथे केेले. विकासकामांच्या उद्घाटनानिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

हुतात्मा पोलिसाच्या पार्थिवासमवेत भाजपचे केंद्रीयमंत्री के.जे. अल्फोन्स यांनी  ‘सेल्फी’ काढले !

भाजप सरकारमधील केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) के.जे. अल्फोन्स यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पुलवामा येथील आक्रमणात हुतात्मा झालेले पोलीस व्ही.व्ही. वसंतकुमार यांच्या पार्थिवासमवेत काढलेले ‘सेल्फी’ (स्वतःचे स्वतःच छायाचित्र काढणे) ‘अपलोड’ केले होते.

(म्हणे) ‘पुलवामामध्ये ४० मारले,  टुंडलामध्ये ८० मारू !’

येथील शिवनगरमध्ये पुलवामा आतंकवादी आक्रमणाचे धर्मांधांकडून समर्थन करण्यात येत होते. तेव्हा नवीन शर्मा या तरुणाने त्यांना विरोध केल्यावर धर्मांधांकडून त्यांना घरात घुसून लाठी, काठी आणि लोखंडी सळ्या यांनी मारहाण केली.

दैनिक सनातन प्रभातच्या रत्नागिरी आवृत्तीचा वर्धापनदिन सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा

शहरातील टी.आर्.पी. येथील अंबर सभागृहात दैनिक सनातन प्रभातच्या रत्नागिरी आवृत्तीचा १९ वा वर्धापनदिन सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा झाला

धुळे येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत घुमला हिंदु राष्ट्र स्थापनेचा उद्घोष !

येथील मालेगाव मार्गावरील गिंदोडीया मैदानात १७ फेब्रुवारीला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेत सहस्रावधी संख्येने एकवटलेल्या धर्माभिमानी हिंदूंचा हिंदु राष्ट्र स्थापनेचा आवाज संपूर्ण धुळे जिल्ह्यात घुमला.

पुलवामा येथील आक्रमणामुळे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचा राममंदिरासाठीचा शिलान्यास कार्यक्रम काही काळासाठी स्थगित

रामजन्मभूमीविषयी आम्ही घेतलेला निर्णय आवश्यक होता; मात्र पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या घटनेमुळे आकस्मित निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आम्ही अयोध्येत जाऊन राममंदिरासाठीचा शिलान्यास करण्याचा कार्यक्रम काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे

झारखंड येथील पू. (सौ.) सुनीता खेमका सनातनच्या ८४ व्या संतपदी विराजमान !

कुंभक्षेत्री १६ फेब्रुवारीला झालेल्या एका भावसोहळ्यात सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी झारखंड येथील सनातनच्या साधिका सौ. सुनीता प्रदीप खेमका या सनातनच्या ८४ व्या संत झाल्याची घोषणा केली. या आनंदवार्तेमुळे कुंभक्षेत्रातील साधकांनी भावाश्रूंनी कुंभस्नान केल्याचा आनंद अनुभवला.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now