भृगु महर्षींच्या सांगण्यानुसार रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात केलेला श्री गुरुपादुकांचा प्रतिष्ठापना सोहळा

भृगु महर्षींच्या सांगण्यानुसार १०.२.२०१९ या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात श्री गुरुपादुकांचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पूजेपुरत्या पायांत घातलेल्या पादुकांचा) पूजासोहळा पार पडला. त्या वेळी मला हातांच्या बोटांनी इतर १६ पादुकांना स्पर्श करण्यास सांगण्यात आले…..

आतंकवाद्यांना कशी, कुठे आणि काय शिक्षा द्यायची हे सैनिक ठरवतील ! – पंतप्रधान मोदी

पुलवामा आक्रमणात जे कोणी दोषी असतील, त्यांना कोठे शिक्षा द्यायची, ती कशी द्यायची, कोणी द्यायची आणि केव्हा द्यायची, हे सैनिकच ठरवणार आहेत, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे दिली.

(म्हणे) ‘आक्रमणाचा सूड घेण्याची मागणी दुःखदायक !’ – महिला पत्रकार राणा अयुब यांचे देशद्रोही ट्वीट

अशा देशद्रोही पत्रकारांवर गुन्हा नोंदवून त्यांना आजन्म कारागृहात टाकण्याचे धाडस तरी भाजप सरकार करील का ?

कुंभक्षेत्री झारखंड येथील पू. (सौ.) सुनीता खेमका (वय ५८ वर्षे) झाल्या सनातनच्या ८४ व्या संत ! 

कुंभक्षेत्री, कुंभपर्वामध्ये, एकादशीच्या विशेष स्नानाच्या मुहुर्तावर, रामनाथी आश्रमात गुरुपादुका सप्ताह चालू असतांना कुंभ रास असलेल्या झारखंड येथील साधिका सौ. सुनीता खेमका संतपदी विराजमान झाल्या.

सैनिकांची हत्या करणार्‍यांवर कारवाई न केल्यास आम्ही कारवाई करू ! – इराणची पाकला चेतावणी

इराण-पाकच्या सीमेवर १३ फेब्रुवारीला पाकमधील आतंकवाद्यांनी इराणच्या २७ रिव्होल्यूशनरी सुरक्षारक्षकांची आत्मघाती आक्रमणाद्वारे हत्या केली होती.

भृगु महर्षींच्या आज्ञेने रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात साजरा झाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुका प्रतिष्ठापनेचा अलौकिक सोहळा !

ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांचे सगुण रूप असलेल्या गुरूंचे कार्य वाढवणे, हे गुरूंच्या सगुणातील सेवेपेक्षा कित्येक पटींनी मोठे आहे; कारण ते निर्गुणाशी संबंधित आहे. गुरुकार्य वाढवण्यासाठी ऊर्जा आणि शक्ती गुरुच पुरवत असतात.

वैकुंठलोकाची अनुभूती देणारा गुरुपादुका प्रतिष्ठापना सोहळा !

उच्च आध्यात्मिक अधिकार असूनही एरव्ही अत्यंत साधी रहाणी असलेल्या परात्पर गुरूंनी पादुका धारण करणे, हे अत्यंत दुर्लभ होते. तीव्र शारीरिक त्रास होत असूनही परात्पर गुरु डॉ. आठवले सोहळ्याच्या स्थळी आसंदीवर विराजमान झाले.

‘श्रीं’ बीजमंत्राच्या पदकांच्या पूजनाने श्री महालक्ष्मीचे आवाहन !

भृगु महर्षींनी श्री महालक्ष्मीदेवीचा ‘श्रीं’ हा बीजमंत्र सनातनच्या साधकांना आशीर्वाद स्वरूपात दिला असून ‘श्रीं’ बीजमंत्र लिहिलेल्या सुवर्णपदकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी १० फेब्रुवारी या दिवशी हस्तस्पर्श केला, तर १२ फेब्रुवारीला सद्गुरुद्वयींनी त्यांचे पूजन केले.


Multi Language |Offline reading | PDF