(म्हणे) ‘आक्रमण करणार्‍यांना मोठे मूल्य चुकवावे लागेल !’ – पाकचे नाव न घेता नरेंद्र मोदी यांचे विधान

पुलवामामध्ये आक्रमण करणार्‍या आतंकवादी संघटनांनी आणि प्रमुखांनी पुष्कळ मोठी चूक केली आहे. याचे मोठे मूल्य त्यांना चुकवावे लागेल. जे गुन्हेगार आहेत त्यांना नक्की शिक्षा मिळेल. एकाही आतंकवाद्याला सोडले जाणार नाही.

भारताकडून पाकला दिलेला ‘सर्वाधिक आवडते राष्ट्र’ हा दर्जा रहित

पावणे पाच वर्षांनंतर आणि शेकडो सैनिक हुतात्मा झाल्यावर पाकला लाभदायक ठरणारा केवळ एक दर्जा रहित करणारे भाजप सरकार काय कामाचे ? आतंकवाद पोसणार्‍या पाकच्या विरोधात मंदगतीने हालचाली करणारे भाजप सरकार पाकचा निःपात काय करणार ?

यापूर्वीही आक्रमणे झाली; मात्र कोणी काहीच करत नाही ! – हुतात्मा विजयकुमार यांच्या वडिलांची खंत

सैनिक देशासाठी प्राणार्पण करण्यास सिद्ध आहेत; मात्र त्या प्राणांचे मोल शासनकर्त्यांना कळत नाही आणि त्यामुळेच ते यावर ठोस कृती करत नाहीत, हे जनतेचे दुर्दैव !

आक्रमणाचा अमेरिका, रशिया, फ्रान्स आदी देशांकडून निषेध

पुलवामा येथील आक्रमणाचा अमेरिका, फ्रान्स आणि रशिया यांच्याकडून निषेध करण्यात आला आहे, तसेच त्यांनी चिंताही व्यक्त केली आहे.

(म्हणे) ‘कोणत्याही अन्वेषणाविना भारत पाकशी आक्रमणाचा संबंध जोडत आहे !’- पाकचा साळसूदपणा

जैश-ए-महंमदने हे आक्रमण घडवले असून या संघटनेच्या आतंकवाद्यांना पाकमध्ये प्रशिक्षण दिले जाते, हे सर्वश्रुत आहे; मात्र भाजप सरकारच्या नेभळट परराष्ट्र धोरणामुळेच पाक तोंड वर करून अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे दुःसाहस करतो !

आक्रमणाचे चोख उत्तर दिले जाईल ! – सीआर्पीएफ्चे ट्वीट

आम्ही ना विसरणार ! ना क्षमा करणार ! हुतात्मा बंधूंना आमचा नमस्कार असून त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही ठाम उभे आहोत. या आक्रमणाचे  चोख उत्तर दिले जाईल, असे ट्वीट केंद्रीय राखीव पोलीस दलाकडून (सीआर्पीएफ्कडून) करण्यात आले आहे. 

मसूद अझहरला ‘जागतिक आतंकवादी’ घोषित करण्यास चीनचा पुन्हा नकार

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग गुआंग यांना जैश-ए-महंमदचा प्रमुख मौलाना मसूद अझहर याला जागतिक आतंकवाद्यांच्या सूचीमध्ये समावेश करण्याविषयी प्रश्‍न विचारण्यात आला.

भारताला आता संरक्षण मंत्री नको,तर युद्धमंत्री हवा आहे ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे 

देशात युद्धाची परिस्थिती नसतांनाही सीमेवर जवानांचे हुतात्मा होणे आपल्या देशासाठी लज्जास्पद आहे. शत्रूदेशाचा कायमचा बिमोड करण्यासाठी भारताला आता संरक्षण मंत्री नको, तर युद्धमंत्री हवा आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी येथे केले.


Multi Language |Offline reading | PDF