काश्मीरमध्ये सीआर्पीएफ्च्या ताफ्यावरील स्फोटात ४२ पोलीस हुतात्मा

काश्मीरमध्ये अधिकाधिक आतंकवाद्यांना ठार करण्यात येत असूनही जोपर्यंत आतंकवाद्यांचा कारखाना असणार्‍या पाकला आणि आतंकवादाच्या विचारसरणीला संपवले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद कधीही संपणार नाही, हे लक्षात घ्या !

मिझोराममध्ये नागरिकत्व कायद्याविरुद्ध केलेल्या आंदोलनात स्वतंत्र ख्रिस्ती देशाची मागणी करणारे फलक झळकले

‘धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर’ हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वाक्य आज अनेक दशकांनंतरही सिद्ध होत आहे!

(म्हणे) ‘व्हॅलेंटाईन डे’ला विरोध करणार्‍यांना ‘कामदेव दिवस’ साजरा करत असल्याचे सांगा !’ – शशी थरूर

१४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ होता, त्या पार्श्‍वभूमीवर ‘व्हॅलेंटाईन डे’ला जर संघ परिवाराने तुम्हाला ‘ट्रोल’ केले किंवा ‘मित्र आणि मैत्रिणी यांच्यासमवेत बाहेर फिरू नका’, अशी धमकी दिल्यास त्यांना सांगा ‘आम्ही भारताचा पारंपरिक ‘कामदेव दिवस’ साजरा करत आहोत’, असे ट्वीट काँग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीयमंत्री शशी थरूर यांनी केले.

युरोपमधील ऑस्ट्रिया देशातील मुली धर्मांध शरणार्थींकडून होणारा त्रास टाळण्यासाठी रस्त्याने जातांना हिजाब घालतात !

युरोपमधील अनेक देशांत धर्मांधांची संख्या नगण्य होती; मात्र आता शरणार्थींमुळे ती वाढल्याने त्यांचा त्रास कसा होतो, ते आता या देशांना समजायला लागले आहे ! हा त्रास गेली १ सहस्र २०० वर्षे भारत कसा सहन करत आहे आणि त्याचे यामुळे किती तुकडे झाले, हे आता त्यांच्या लक्षात येईल !

जगात वर्ष २०५० ला मुसलमानांची लोकसंख्या सर्वाधिक होणार

असे झाले, तर भारताचे इस्लामी राष्ट्र होण्यासमवेत संपूर्ण जगच इस्लाममय होईल, याचे आश्‍चर्य वाटू नये !

तोट्यात चालणारे बीएस्एन्एल् बंद करण्यासह अन्य पर्यायांवर विचार करण्याची केंद्र सरकारची सूचना

प्रत्येक सरकारी आस्थापन नेहमी तोट्यातच का चालते ? आणि ते खाजगी आस्थापनांनी चालवल्यास त्यांना नफा कसा मिळतो?, हे गणित भारतियांना समजलेले आहे !

जपानमध्ये उणे २५ डिग्री तापमानात भगवान नरसिंहाची मूर्ती साकारणार्‍या भारतीय संघाला प्रथम क्रमांक

बर्फामध्ये शिल्प साकारण्याची जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धा

पुरो(अधो)गाम्यांनी हिंदु राष्ट्र निर्मितीच्या विचारांचा धसका घेतला आहे ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

समाजातील एक मोठा घटक भारत पुन्हा हिंदु राष्ट्र व्हावे, या मताचा आहे. हिंदु धर्म नष्ट करू पहाणार्‍या आक्रमकांचे वंशज आणि गुलामगिरीची मानसिकता बाळगणारे जन्महिंदू जिवाच्या आकांताने हिंदुत्वाला अन् हिंदु राष्ट्र संकल्पनेला विरोध करत आहेत.

कोणतीही अपेक्षा न करता साधना आणि सेवा करणारे खरे साधू असतात ! – श्री श्री १००८ महामंडलेश्‍वर रामभूषणदास महाराज, वृंदावन

कुंभमध्ये येऊन विकारांना सोडले, तरच आपण समाजाचे कल्याण करू शकतो. वेशभूषेवरून कोणी साधू होत नाही. चरस आणि गांजा ओढल्यामुळे कोणतीही साधना होत नाही. ….


Multi Language |Offline reading | PDF