खाणी चालू करण्यासाठी भाजप सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न !

गोव्यात बंद असलेल्या खाणी चालू करण्यासाठी भाजप सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यामधून नक्कीच मार्ग काढला जाईल, असे आश्‍वासन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले.

अनधिकृतरित्या मातीचे उत्खनन केल्याप्रकरणी मेसर्स दिलीप बिल्डकॉन कंपनीला १० कोटी रुपयांचा दंड

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी तालुक्यातील साळगाव येथे अनधिकृत माती उत्खनन केल्याचा ठपका ठेवून महामार्गाचे काम करणार्‍या मेसर्स दिलीप बिल्डकॉन या आस्थापनाला (कंपनीला) सुमारे १० कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

(म्हणे) ‘अल्पसंख्यांकांचा दर्जा देणे, हा राज्यांतर्गतचा विषय !’

देशात मुस्लिम, बौद्ध, ख्रिस्ती, शीख, जैन यांना अल्पसंख्यांकांचा दर्जा देण्यात आला आहे. स्थानिक सूत्रांवरून तेथील राज्यशासन हा निर्णय घेत असते. केंद्रीय अल्पसंख्यांक आयोगाचा यामध्ये सहभाग नाही, असे सांगत केंद्रीय अल्पसंख्यांक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी अल्पसंख्यांकांचा दर्जा देण्याच्या सूत्राला बगल दिली.

(म्हणे) ‘दुष्काळ निवारणासाठी देवस्थान संस्थांनीही हातभार लावावा !’ – शरद पवार

सध्या सर्वत्र भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. साधारणपणे आणखी काही वर्षे या परिस्थितीला तोंड द्यावे लागेल. दुष्काळ निवारणाचे दायित्व सरकारचे असले, तरी देवस्थान संस्थांनीही यात हातभार लावावा, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई ‘बिझनेस व्हिजनरी’ या विशेष पुरस्काराने सन्मानित !

‘हिन्दुस्थान टाइम्स’ या इंग्रजी दैनिकाच्या वतीने समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींचा ‘ठाणे रत्न पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.

यवतमाळ येथे ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन

येथे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पोलीस-प्रशासनास निवेदन देण्यात आले.

करंजे येथील ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा’च्या भूखंडावर अनधिकृत बांधकामे

सातारा नगरपालिकेच्या वतीने लघुउद्योगांसाठी विकसित केलेल्या करंजे येथील ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा’च्या भूखंडावर अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहेत.

काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या शरद पवार यांनी आज त्याच पक्षापुढे निवडणुकीसाठी गुडघे टेकले !  पियुष गोयल, केंद्रीय रेल्वेमंत्री

शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले, तेव्हा त्यांनी काय वक्तव्य केले होते, हे सर्वांनाच माहीत आहे; मात्र आज पक्षापुढे त्यांनी निवडणुकीसाठी गुडघे टेकले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अपयशी झाल्यामुळे आणि आता पुढे कुणीच नसल्याने त्यांनी प्रियांका गांधी यांना पुढे केले आहे.

रामायण हा भारताचा धर्मनिरपेक्ष वारसा ! – अविनाश धर्माधिकारी, माजी सनदी अधिकारी

आदर्श, न्यायनीतीचे राज्य म्हणजे ‘रामराज्य’ असे आपल्याकडे म्हटले गेले आहे. त्यामुळे रामायण हा भारताचा धर्मनिरपेक्ष वारसा आहे.  चिकित्सेच्या नावाखाली रामायणाची एकांगी मांडणी करण्याचे खूळ सध्या आले आहे. ७० वर्षांत आपला इतिहास ज्याप्रकारे लिहिला गेला, पाठ्यपुस्तके ज्या पद्धतीने लिहिली गेली,

कोची (केरळ) येथील श्री मरुवान देवस्थानमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचन

समितीच्या वतीने कु. प्रणिता सुखठणकर यांनी ‘देवालय दर्शनाचे महत्त्व आणि शास्त्र’ ‘कुलदेवतेचे आणि दत्ताच्या नामजपाचे महत्त्व’ यांविषयी सांगितले. या प्रवचनाचा १०० पेक्षा अधिक लोकांनी लाभ घेतला.


Multi Language |Offline reading | PDF