आज ठाणे येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन !

आज ठाणे येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा ! या सभेला अधिकाधिक हिंदूंनी उपस्थित राहून धर्मकर्तव्य बजावावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रभु श्रीरामचंद्र केवळ हिंदूंचेच नव्हे, तर मुसलमानांचेही पूर्वज असल्याने अयोध्येतच राममंदिर होणार ! – योगऋषी रामदेवबाबा

प्रभु रामचंद्रांचे मंदिर अयोध्येतच होणार. ते अयोध्येत नाही, तर काय व्हॅटिकन सिटी किंवा मक्का अथवा मदिना येथे होणार का? अयोध्या ही रामाची जन्मभूमी आहे, हे निर्विवाद सत्य आहे.

वर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळणार नाही ! – ज्योतिष परिषद

वर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळणार नाही. भाजपला मित्रपक्षांच्या सहकार्याने सत्ता स्थापन करावी लागेल. ‘असे झाल्यास नितीन गडकरी पंतप्रधान होतील’, असे भविष्य येथील ज्योतिष परिषदेने वर्तवले आहे.

डॉ. मनमोहन सिंह पंतप्रधान असतांना सरकारी धारिका सोनिया गांधी यांच्या घरी जात होत्या ! – दिवंगत पत्रकार कुलदीप नय्यर यांच्या पुस्तकात दावा

डॉ. मनमोहन सिंह यांनी असे कितीही दावे फेटाळले, तरी ते सोनिया गांधी यांचे कळसूत्री बाहुले होते, हे जनतेलाही ठाऊक आहे !

धर्मांतरास विरोध केल्यावरून भाजप नेत्याची हत्या करणार्‍या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या जिहादी संघटनेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक

मुसलमान धर्मप्रचारकांना हिंदूबहुल भागात इस्लामचा प्रसार करण्यास विरोध केल्याचा राग ठेवून काही धर्मांधांनी भाजपचे कार्यकर्ते रामलिंगम् यांची ५ फेब्रुवारीला निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी ५ धर्मांधांना अटक केली असून काही जण पसार (फरार) झाले आहेत.

‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे शत्रूचा बदला घेणार्‍या देशात भारताचे नाव आले ! – अमित शहा, पक्षाध्यक्ष, भाजप

अद्यापही सीमेवर प्रतिदिन चकमकी होऊन सैनिक हुतात्मा होत असतांना, तसेच सीमेवरील भारतीय नागरिकांचे पाकच्या आक्रमणांमुळे बळी जात असतांना ‘शत्रूचा बदला घेणार्‍या देशांत भारताचे नाव आले’, असे म्हणणे कितपत योग्य आहे ?

आरक्षणावरून राजस्थानमध्ये गुर्जरांकडून पुन्हा आंदोलन

आरक्षणामुळे भारताची अधोगती झाली आहे, भारतियांच्या हे कधी लक्षात येणार ? भारतातील आरक्षणाची विकृती नष्ट झाल्याविना भारत महासत्ता होऊ शकत नाही, ही वस्तूस्थिती आहे !


Multi Language |Offline reading | PDF