सत्ता हवी असणार्‍या राजकीय पक्षाने हिंदूंच्या मागण्यांची पूर्तता करावी ! – कपिल मिश्र, अपक्ष आमदार, नवी देहली

प्रयागराज येथील कुंभनगरीमध्ये सनातन संस्थेच्या प्रदर्शनात ‘हिंदु चार्टर’ (हिंदूंचे घोषणापत्र) या विषयावरील पत्रकार परिषद ! आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ता हवी असणार्‍या राजकीय पक्षाने हिंदूंच्या न्याय्य मागण्यांची पूर्तता केली पाहिजे – ‘हिंदु चार्टर’चे श्री. कपिल मिश्र

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सर्व संतांनी संघटित व्हावे ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

कुंभक्षेत्रात ८ फेब्रुवारी या दिवशी ‘भूमा निकेतन पंडाल’ येथे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या हेतूने संतसमाज तथा हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे एक दिवसीय हिंदु राष्ट्र अधिवेशन आयोजित केले होते.

मुख्यमंत्री असतांना स्वतःचे पुतळे उभारण्यावर खर्च केलेला जनतेचा पैसा परत करण्याचा आदेश

मुख्यमंत्री असतांना उभारण्यात आलेल्या स्मारकांवर आणि स्वत:च्या पुतळ्यांवर खर्च करण्यात आलेला पैसा परत करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांना दिला आहे.

सनातनद्वेषाची कावीळ झालेल्या ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीकडून हिंदु राष्ट्र-जागृती सभेविषयी अपप्रचार !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या सोलापूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेविषयी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने ‘सनातनी विखार’ आणि ‘सनातनची सभा वादात अडकण्याची शक्यता’ असे मथळे देऊन पूर्वग्रहदूषित वृत्त प्रसारित केले.

‘निवडणुकीनंतर मंदिराचे पाहू’, असे म्हणणे म्हणजे शरयूत रक्त सांडलेल्यांचेे बलीदान नाकारण्यासारखे ! – उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

‘निवडणुकीनंतर मंदिराचे पाहू’, असे बोलणे म्हणजे शरयूत रक्त सांडून ज्यांनी बलीदान दिले, ते नाकारण्यासारखे आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी ८ फेब्रुवारीच्या ‘दैनिक सामना’मधील अग्रलेखाद्वारे केले आहे.

वर्ष २०१३ मधील मुझफ्फरनगर दंगलीत २ हिंदु तरुणांची हत्या करणार्‍या ७ धर्मांधांना जन्मठेपेची शिक्षा

. . . याला न्याय म्हणता येईल का ? वर्ष २०१३ मध्ये दंगल भडकण्यास कारणीभूत  ठरलेल्या २ हिंदु तरुणांच्या हत्येच्या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने मुझम्मिल, मुझस्सिम, फुकरान, नदीम, जहांगिर, अफझल आणि इक्बाल या ७ जणांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

भोपाळ येथील काँग्रेसच्या फलकावर राहुल गांधी ‘राम’, तर पंतप्रधान मोदी ‘रावण’ !

हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍या काँग्रेसच्या विरोधात गुन्हा नोंद करून संबंधितांना कारागृहात डांबायला हवे ! अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचा असा अवमान करण्याचे धाडस कोणीही कधी दाखवत नाही, हे लक्षात घ्या !

शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर किल्ले प्रतापगड येथील अफझलखान कबरीच्या परिसरात कलम १४४ लागू

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासनाकडून अफझलखान कबरीच्या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

भगवंत आणि खरे स्वातंत्र्य !

स्वातंत्र्य म्हणजे स्व + तंत्र. स्व = आत्मा ! आत्म्याच्या तंत्रानुसार चालणारे कार्य म्हणजेच ईश्‍वरेच्छेने होणारे कार्य ! हे समजले की, आनंद मिळतो; कारण जिकडे-तिकडे तोच आहे. त्याचेच साम्राज्य आहे.


Multi Language |Offline reading | PDF