ज्येष्ठ पत्रकारांना प्रतिमास १० सहस्र रुपये मानधन मिळणार !

राज्यातील ज्येेष्ठ पत्रकारांना ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना’ लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून यासंबंधीचा आदेश २ जानेवारी २०१९ या दिवशी जारी करण्यात आला.

मनुष्याचे मन कोणत्याही रोगावर मात करू शकते !

मनुष्याचे मन कोणत्यााही रोगावर मात करू शकते, असे विधान गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ४ फेब्रुवारी या दिवशी ‘जागतिक कर्करोग दिना’च्या निमित्ताने ‘ट्वीट’द्वारे केले. मुख्यमंत्री पर्रीकर स्वादूपिंडाच्या रोगाने आजारी आहेत.

प्रस्तावित नाणार ऑईल रिफायनरीसाठी नेमलेल्या सुखथनकर समितीने गाशा गुंडाळला

प्रस्तावित नाणार ऑईल रिफायनरीसाठी नेमलेल्या सुखथनकर समितीला पहिल्याच दिवशी गाशा गुंडाळावा लागला.

पाकव्याप्त काश्मीरमधील शारदा पीठ आणि शारदा तीर्थयात्रा सर्वांसाठी खुली करावी ! – रवींद्र पंडिता, संस्थापक, सेवा शारदा कमिटी

प्रयागराज (कुंभनगरी), ७ फेब्रुवारी (वार्ता.) – पाकव्याप्त काश्मीरमधील शारदा पीठ आणि शारदा तीर्थयात्रा सर्वांसाठी खुली करावी, अशी मागणी काश्मीर येथील सेवा शारदा कमिटीने केली आहे.

ब्रह्मपूर (मध्यप्रदेश) येथे सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ, सात्त्विक उत्पादने आणि धर्मशिक्षण देणारे फलक यांचे प्रदर्शन

येेथील खंडवा रोडवरील श्री गणपति मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने नुकतेच ग्रंथ, सात्त्विक उत्पादने आणि धर्मशिक्षण देणारे फलक यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

(म्हणे) ‘आनंद तेलतुंबडे यांच्यावरील कारवाई सरकारने थांबवावी !’

पोलिसांकडून डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्यावर नोंद करण्यात आलेला गुन्हा चुकीचा असून हा लोकशाही आणि नागरी स्वातंत्र्यावर घातलेला घाला असल्याने केंद्र आणि राज्य शासनाने त्यांच्यावरील कारवाई त्वरित थांबवावी, अशी मागणी अमेरिका आणि युरोप येथील विविध विद्यापिठांमधील ६०० विचारवंतांनी…

भाग्यनगर येथील श्री. प्रसन्ना आणि सौ. तेजस्वी वेंकटापुर यांनी बाळाच्या (६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चि. बलरामच्या) जन्मापूर्वी आणि जन्मानंतर अनुभवलेली गुरुदेवांची कृपा !

पत्नीला गर्भारपणाच्या ७ व्या मासात अकस्मात पोटात वेदना होऊ लागणे, आधुनिक वैद्यांनी प्रसुती होईपर्यंत तिला विश्रांती घेण्यास सांगणे

हिंदु जनजागृती समितीकडून देहलीतील कनॉट प्लेसस्थित सेंट्रल पार्कमध्ये काश्मिरी हिंदु विस्थापितांविषयीचे ‘फॅक्ट’ प्रदर्शन

हिंदु जनजागृती समितीकडून काश्मिरी हिंदु विस्थापितांविषयीचे ‘फॅक्ट’ प्रदर्शन नुकतेच नवी देहली येथील कनॉट प्लेसस्थित सेंट्रल पार्कमध्ये लावण्यात आले होते.

भ्रष्टाचाराला ‘अच्छे दिन’ !

एखाद्या व्यक्तीने एक लाख रुपयांच्या भांडवलावर एखादा व्यवसाय चालू करावा आणि अवघ्या ६ वर्षांमध्ये ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक माया जमवावी. तेही अर्थव्यवस्थेमध्ये मंदी असतांना !

नक्षलवादी सुधा भारद्वाज यांच्या जामीन याचिकेवर १८ फेब्रुवारीला सुनावणी !

एल्गार परिषदेच्या संदर्भात अटक करण्यात आलेल्या सुधा भारद्वाज यांनी जामीन मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात प्रविष्ट केलेल्या याचिकेवरील सुनावणी १८ फेब्रुवारी या दिवशी होणार आहे. पुणे सत्र न्यायालयाने भारद्वाज यांचा जामीनअर्ज पुणे पोलिसांनी पुरावे म्हणून सादर केलेल्या ४ पत्रांचा आधार घेत ऑक्टोबर २०१८ मध्ये फेटाळला होता


Multi Language |Offline reading | PDF