लोकसभा २०१९ च्या निवडणुकीत भाजपला निवडून देण्यासाठी विहिंपकडून १४ फेब्रुवारीपासून दुसर्‍या संसदेचे आयोजन !

अयोध्या येथील राममंदिर उभारणीविषयी विश्‍व हिंदु परिषदेने धर्मसंसद घेतल्यानंतर आता कुंभ क्षेत्रात ‘लोकसभा २०१९’च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून विहिंप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्या वतीने १४ ते १८ फेब्रुवारीपर्यंत आणखी एक संसद (सभा) घेण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे.

सनातन संस्थेचे कार्य उत्कृष्ट आहे ! – श्री रमेशगिरी महाराज, जनार्दन आश्रम, कोपरगाव

सनातन संस्थेचे कार्य उत्कृष्ट आहे, हे प्रदर्शन पाहिल्यानंतर लक्षात येते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून हिंदूंमध्ये जागृती होईल, अशी मी अपेक्षा करतो, असे प्रतिपादन कोपरगाव (महाराष्ट्र) येथील जनार्दन आश्रमाचे श्री रमेशगिरी महाराज यांनी केले.

काश्मीरप्रमाणे देशात ‘इस्लामिक स्टेट’ येण्यापूर्वी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करा ! – चेतन राजहंस

वर्ष १९९० मध्ये काश्मीर खोर्‍यामध्ये ‘रलिव्ह’, ‘चलिव्ह’ आणि ‘गलिव्ह’, अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. याचा अर्थ ‘इस्लाम स्वीकारा, काश्मीर सोडा अथवा मृत्यूला सामोरे जा’, असा होतो.

कुंभनगरीत शास्त्र धर्म प्रचार सभेच्या वतीने झालेल्या ‘वर्णाश्रम’ विषयावरील परिसंवादात सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचे मार्गदर्शन !

बंगाल येथील हिंदुत्वनिष्ठ संघटना ‘शास्त्र धर्म प्रचार सभे’ने २ फेब्रुवारी या दिवशी कुंभनगरी येथे ‘वर्णाश्रम’ या विषयावर परिसंवाद ठेवला होता. या परिसंवादाची प्रस्तावना शास्त्र धर्म प्रचार सभेचे सदस्य श्रोवन सेन यांनी केली.

राममंदिराचा प्रश्‍न आताचा नसून वर्ष १५२८ पासूनचा आहे ! – राष्ट्रीय प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे

आपल्या अस्मितेचे रक्षण करायचे असेल, तर कोट्यवधी लोकांची जिथे श्रद्धा आहे, जिथे प्रभु श्रीरामचंद्रांचा जन्म झाला, तिथे मंदिर हवेच, असे मत राष्ट्रीय प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी व्यक्त केले.

सर्व गटांतील महिलांना ‘सॅनिटरी नॅपकिन’ वाटल्याची चूक मान्य करून पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके यांची जाहीर क्षमायाचना !

नांदगांव ग्रामपंचायतीने हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या वेळी वाण म्हणून सॅनिटरी नॅपकिनचे वाटप सरसकट किशोरवयीन मुलींपासून ते वयोवृद्ध महिलांनाही केल्याने सर्व महिला संतप्त झाल्या होत्या. या महिलांनी नांदगाव ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढून सरपंचांना खडसावले होते.

वागातोर (गोवा) येथे २३ फेब्रुवारीपासून ‘सनबर्न क्लासिक’ संगीत रजनी

आशियामधील सर्वांत मोठा नृत्य आणि सांगितिक कार्यक्रम म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘सनबर्न’चे गोव्यात तब्बल ३ वर्षांनी ‘सनबर्न क्लासिक’ या नावाने पुनरागमन होत आहे.

मद्य‘विकास’ !

भारतात मागील ६ वर्षांच्या तुलनेत यावर्षी सर्वाधिकच मद्यविक्री झाली आहे.  थोडक्यात म्हणजे विकासाचे सूत्र घेऊन चाललेल्या सरकारच्या काळात मद्यविक्रीचाही ‘विकास’ झाला आहे. गेल्या वर्षी दारूचे ३५.९० कोटी ‘खोके’ विकले गेल्या.

हज यात्रेसाठीचे अनुदान रहित करून ४५० कोटी रुपयांची बचत करणार

भारतात न्यायालयाच्या आदेशानंतर हज यात्रेचे अनुदान रहित करण्यात आले; मात्र हे पैसे भाजप सरकारने मुसलमानांच्या अन्य योजनांसाठी वळवून आपणही काँग्रेसच्या २ पावले पुढे आहोत, हे दाखवून दिले होते !

उद्दाम  ख्रिस्ती  धर्मप्रसारक  !

सध्या हिंदु धर्मावर होणारे आघात पहाता एक अशी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे, ज्यामुळे हिंदु धर्मावर आघात करण्याचे धारिष्ट्य हिंदुद्वेष्ट्यांमध्ये निर्माण होणार नाही. अशी व्यवस्था केवळ हिंदु राष्ट्रातच निर्माण होईल. यासाठी हिंदूंनी प्रयत्न करायला हवेत !


Multi Language |Offline reading | PDF