शहरी नक्षलवादी डॉ. तेलतुंबडे यांना ११ फेब्रुवारीपर्यंत अटक नाही – पुणे पोलीस

शहरी नक्षलवादी डॉ. आनंद तेलतुंबडे यांना ११ फेब्रुवारीपर्यंत अटक करणार नाही, अशी ग्वाही पुणे पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात ५ फेब्रुवारीला दिली; मात्र तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामिनाला राज्य सरकारने जोरदार विरोध केला.

देवाची आवड असलेला ५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील चि. ईशान मेहता (वय ३ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. ईशान मेहता हा एक आहे !

पुन्हा अण्णा !

अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे पुन्हा एकदा उपोषण चालू केले आहे. या वेळी त्यांनी महाराष्ट्रात लोकायुक्तांची नेमणूक करण्यासमवेत मुख्यमंत्र्यांना लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्याची मागणी केली आहे.

(म्हणे) ‘शहरी माओवाद अशी काही संकल्पना नाही !’ – डॉ. आनंद तेलतुंबडे

‘शहरी माओवाद’ अशी काही संकल्पना नाही. ही ‘थिअरी प्रॉक्सी’ म्हणून वापरली जात आहे. माओवाद्यांऐवजी जे सरकारविरोधात लढत आहेत, मानवी अधिकाराच्या गोष्टी करत आहेत, त्यांना लक्ष्य केले जात आहे. (खोटारडे तेलतुंबडे ! निरपराध्यांना मारणार्‍या नक्षलवाद्यांना मानवी अधिकार का शिकवला नाही ? – संपादक)

संभाजी ब्रिगेडचे सांगली जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर यांच्यावर खंडणीचा तिसरा गुन्हा नोंद

माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करून बांधकाम विभागाच्या अभियंत्यांकडे १ लक्ष रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणी संभाजी ब्रिगेडचे सांगली जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर आणि त्यांचे साथीदार कृष्णात विश्‍वनाथ जंगम (रहाणार वाळवा) यांच्यावर ईश्‍वरपूर पोलीस ठाण्यात खंडणीचा तिसरा गुन्हा नोंद झाला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखनाथ आखाड्याच्या तंबूला आग; २ तंबू भस्मसात

कुंभमेळ्यातील सेक्टर १५ मधील लोअर मार्गावरील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘महासभा गोरखनाथ आखाड्या’तील २ तंबूंना ५ फेब्रुवारीला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत पैसे, कपडे, धारिका आणि तंबू भस्मसात झाले; मात्र आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार करतांना धर्मांध महिलांकडून हिंदु महिलांना अटकाव करण्याचा प्रयत्न

‘एका शहरात हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा काही हिंदु महिला प्रसार करत होत्या. प्रसार करत असतांना काही धर्मांध महिलांनी प्रसार करणार्‍या हिंदु महिलांना थांबवले आणि ‘तुम्ही इकडे येऊन काय करता ? तुम्ही वाद निर्माण करता’, असे मोठ्या आवाजात बोलू लागल्या.

आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाला १० टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान

केंद्र सरकारने सवर्ण वर्गातील गरिबांना १० टक्के आरक्षण लागू केले आहे. महाराष्ट्रातही ते लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने घेतला आहे. मराठा आरक्षणाला न्यायालयात आव्हान देणार्‍या याचिकादार जयश्री पाटील यांच्या वतीने अधिवक्ता सदावर्ते यांनी या सवर्ण आरक्षणालाही आव्हान द्यायचे असल्याने मराठा…

चर्चने हिंदूंना विविधता शिकवू नये !

‘फसव्या राष्ट्रभक्तीचा स्वीकार करावा यासाठी धर्माचा आधार घेतला जात आहे. भारतातील पालटत्या राजकारणाचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारताचे अनेक तत्त्ववाद आणि विविधता हे पूर्वी वैशिष्ट्य होते;

केंद्राच्या सागरमाला प्रकल्पांतर्गत मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई आणि मालवण येथून जलवाहतुकीसह ‘रो-रो’ सेवा चालू करणार !

ठाणे, वसई, बेलापूर, पालघर, मुंबई, रायगड, मालवण ही शहरे केंद्राच्या सागरमाला प्रकल्पाच्या अंतर्गत जलवाहतूकमार्गे जोडून त्यातून प्रवासी वाहतुकीसह ‘रो-रो’ सेवा (वाहने बोटीतून नेण्याची सोय) चालू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.


Multi Language |Offline reading | PDF