पोलीस आयुक्त राजीव कुमार यांनी चौकशीसाठी सहकार्य करावे; मात्र सीबीआयने अटक करू नये ! – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांनी शारदा चिटफंड घोटाळ्याच्या प्रकरणात चौकशीसाठी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिकार्‍यांसमोर उपस्थित रहावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ५ फेब्रुवारीला झालेल्या सुनावणीच्या वेळी दिला.

अण्णा हजारे यांनी ७ दिवसांनंतर उपोषण सोडले !

अण्णा हजारे यांच्यासारख्या समाजसेवकाला जनहितकारी मागण्या मान्य करून घेण्यासाठी सात दिवस उपोषण करायला लावणारे शासनकर्ते जनहित कधी साधू शकतील का ?

मुख्यमंत्र्यांनी दोषींवर कठोर कारवाई न केल्यास आंदोलन !  हिंदु जनजागृती समिती

घाटकोपर (मुंबई) येथील पोलीस क्वार्टर्सच्या १७ इमारतींमधील २२२ क्वार्टर्समध्ये रंगलेपन केल्याचे कागदोपत्री दाखवून ३२ लक्ष ७८ सहस्र रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. लोकलेखा समितीने विधीमंडळाला सादर केलेल्या अहवालातही ….

पाकिस्तानकडून पुंछ जिल्ह्यातील सैन्याच्या तळावर रॉकेट लाँचरने आक्रमण

शत्रूराष्ट्र भारताची जीवितहानी करण्याचा प्रयत्न करते, तर भारत ‘पाकची जीवितहानी होऊ नये’, याचा विचार करतो. असा विचार करणारा भारत स्वतःचा आत्मघात केल्याविना रहाणार नाही !

केवळ देवाच्या संकीर्तनाने नाही, तर अधर्माच्या विरोधात लढल्याने समाधान मिळते ! – कोंडवीटी ज्योतिर्मयी, कीर्तनकार, तेलंगण

सरकार मंदिरांना एक रुपयाही देत नाही; मात्र सरकार मंदिरांचे कोट्यवधी रुपये अन्य धर्मियांवर उधळत आहे. मंदिरांकडून चालवण्यात येणार्‍या शिक्षणसंस्थांकडूनही कर घेण्यात येत आहे; मात्र चर्च आणि मशीद यांच्याकडून चालवण्यात येणार्‍या शिक्षणसंस्थांकडून कर घेत नाही. हा हिंदूंवर अन्याय नाही का ?

मुंबई आणि नवी मुंबई येथे २ दिवसांत ६ एक वक्ता हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे यशस्वी आयोजन !

हिंदु जनजागृती समितीकडून मुंबई आणि नवी मुंबई येथे २ दिवसांत ६ ठिकाणी एक वक्ता हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या सभांना उत्स्फूर्तपणे मिळालेल्या प्रतिसादावरून हिंदु जनजागृती समितीच्या कार्याप्रती धर्मप्रेमींचा असलेला दृढ विश्‍वासच दिसून आला. या सभांचा वृत्तांत येथे देत आहोत.

लोटे येथे सहस्रो हिंदूंच्या उपस्थितीत मूक आंदोलन शांततेत पार पडले

लोटे येथे गोवंशियांच्या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या अन्याय्य कारवाईच्या विरोधात ४ फेब्रुवारीला लोटे ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठिकाणी लोटे दशक्रोशीतील सहस्रो ग्रामस्थांनी मूक आंदोलन केले………

गोहत्येचा प्रयत्न करणार्‍या ३ आरोपींना अटक ! – पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे

तालुक्यातील धामणदेवी या ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गाजवळ जंगलाच्या परिसरात गोहत्येचा प्रयत्न करणार्‍या ३ आरोपींना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी सहभागी असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF