बैतूल (मध्यप्रदेश) येथे उपजिल्हाधिकारी महिलेने राज्यघटनेला साक्षी ठेवून विवाह केला

बैतूल जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी निशा बांगरे यांनी अग्नीला नव्हे, तर राज्यघटनेला साक्षी राहून सुरेश अग्रवाल यांच्याशी बँकॉक येथे विवाह केला…….

सर्व गटांतील महिलांना सॅनिटरी नॅपकिन वाटल्याची चूक मान्य करून पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके यांची जाहीर क्षमायाचना !

तालुक्यातील नांदगाव गावात हळदीकुंकू समारंभात सर्व वयोगटातील महिलांना सॅनिटरी नॅपकिन वाण म्हणून वाटण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता.

वागातोर येथे २३ फेब्रुवारीपासून सनबर्न क्लासिक संगीत रजनी

वागातोर येथे २३ आणि २४ फेब्रुवारी यां दिवशी सनबर्न क्लासिकचे आयोजन करण्यात आले आहे. आशियामधील सर्वांत मोठा नृत्य आणि सांगितिक कार्यक्रम म्हणून ओळखल्या जाणार्‍या सनबर्नचे गोव्यात तब्बल ३ वर्षांनी सनबर्न क्लासिक या नावाने पुनरागमन होत आहे.

फुरुस येथे ७ अजगरांना मारून जमिनीत पुरले : वनविभागाकडून चौघांना अटक 

खेड तालुक्यातील फुरुस-फळसोंडे येथील जंगलात ७ अजगर मारून एकाच ठिकाणी पुरल्याचे उघड झाले आहे.

देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर खोटे गुन्हे नोंदवल्यामुळे तिघांना तुरुंगवास !

संभाजीनगर येथून देवदर्शनासाठी निघालेल्या १०० हून अधिक भाविकांपैकी तीन भाविकांवर पोलिसांशी वाद घालून मारहाण केल्याचा खोटा गुन्हा नोंद केल्यामुळे त्यांना नऊ दिवस कारागृहात जावे लागले, तर एका भाविकाला मारहाण करण्यात आली आहे.

प्रयागराज येथे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका वाड्रा यांना दुर्गादेवीच्या रूपात दर्शवून श्री दुर्गादेवीचे विडंबन !

हिंदूंच्या देवतांच्या रूपात काँग्रेसच्या नेत्यांना दाखवणारी काँग्रेस दुसरीकडे या देवतांचा अवमान करत असते ! आताही त्यांनी देवतांचा अवमानच केला आहे. याविरोधात हिंदूंनी वैध मार्गाने कारवाई होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !

डहाणू (पालघर) येथील खाडीपाड्यावरील ख्रिस्ती धर्मप्रसाराला बंदी घालण्याकरिता विशेष ग्रामसभा घेण्याची आदिवासींची मागणी

येथील चिखले ग्रामपंचायतीच्या अंतर्गत खाडीपाडा या आदिवासी पाड्यावर चालणार्‍या ख्रिस्ती धर्मप्रसाराला बंदी घालण्याकरिता विशेष ग्रामसभेची मागणी येथील स्थानिकांनी केली आहे. संविधानाविषयीची माहिती देणार्‍या वादग्रस्त फलकाचा ठराव रहित करणे, हाही एक अन्य विषय यात आहे.

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा !

शारदा चीटफंड घोटाळा अनुमाने ३० सहस्र कोटी रुपयांचा आहे. काहींच्या मते तो यापेक्षा अधिक रुपयांचा आहे. सीबीआयने याविषयी ७६ गुन्हे नोंदवले आहेत आणि ३१ आरोपपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली आहेत.

हिंदुस्थानला जन्मभूमी मानणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार तारेक फतेह

तारेक फतेह हे पाकिस्तानात जन्मलेले कॅनडा निवासी आंतरराष्ट्रीय ख्यातनाम पत्रकार आहेत, तसेच अनेक पुस्तकांचे लेखक आहेत. ते स्वत:ला हिंदु वंशपरंपरेतील मानतात.


Multi Language |Offline reading | PDF