सरकारने राममंदिर शीघ्र गतीने निर्माण करण्यासाठी संतांनी प्रयत्न केले पाहिजेत ! – जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज

रामजन्मभूमीविषयी सर्वोच्च न्यायालयाची भूमिका पाहिल्यानंतर ‘हिंदु समाज संकटात आहे’, असे वाटते. न्यायालयाची उदासीनता राममंदिर उभे करण्यामध्ये प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी आहे.

देशात निर्माण झालेल्या सर्व समस्यांना काँग्रेस उत्तरदायी ! पू. पूर्णदास महाराज

देशात निर्माण झालेल्या सर्व समस्यांना काँग्रेस उत्तरदायी आहे, असे प्रतिपादन राजस्थान येथील रामानंदी वैष्णव संप्रदायाचे पू. पूर्णदास महाराज यांनी येथे केले.

प्रस्तावित नाणार ऑईल रिफायनरी प्रकल्पाला तीव्र विरोध

राजापूर तालुक्यातील प्रस्तावित नाणार ऑईल रिफायनरी प्रकल्पासाठी नेमलेल्या सुखथनकर समितीच्या दौर्‍यावरून शिवसेना आक्रमक झाली आहे. आस्थापनाची दलाली करण्यासाठी ही समिती येणार असेल, तर कोकणातल्या दांड्यानी सुखथनकर समितीची पाठ काढू, अशी चेतावणी खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे…….

आज सावर्डे (रत्नागिरी) स्थानकाजवळ रेल्वेमार्ग ३ घंट्यांसाठी बंद

कोकण रेल्वे मार्गावरील सावर्डे (जिल्हा रत्नागिरी) स्थानकात ‘अपग्रेडेशन’च्या कामामुळे ४ फेब्रुवारी या दिवशी दुपारी ३.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत रेल्वेमार्ग बंद करण्यात येणार आहे……

हिंदु राष्ट्र-जागृती सभांना दडपण्याचा प्रयत्न निंदनीय ! – गंगाधर कुलकर्णी, श्रीराम सेना

शिवमोग्गा आणि मंगळूरू येथे आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभांना कर्नाटक सरकार आणि पोलीस यांच्याकडून देण्यात आलेला त्रास पाहिल्यास आपण भारतात आहोत कि पाकिस्तानात ?, असा प्रश्‍न उपस्थित होतो. सरकारच्या अशा हिंदुविरोधी धोरणाचा हिंदूंनी कडाडून विरोध केला पाहिजे.

गंगा नदीत दूषित पाणी जाणार नाही, यासाठी सरकारने उपाययोजना करणे आवश्यक ! – गंगा आव्हान आंदोलनाचे प्रणेते हेमंत ध्यानी

गंगा नदीत दूषित पाणी जाणार नाही, यासाठी प्रयत्न करणे, हेच खर्‍या अर्थाने गंगारक्षण आहे. दुर्दैवाने ‘नमामि गंगे’ प्रकल्पाच्या अंतर्गत सरकारकडून या दृष्टीकोनातून अपेक्षित प्रयत्न झाले नाहीत, अशी खंत ‘गंगा आव्हान आंदोलना’चे प्रणेते श्री. हेमंत ध्यानी यांनी कुंभनगरी येथे व्यक्त केली.

गोहत्येचा प्रयत्न करणार्‍या ३ आरोपींना अटक ! – पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे

तालुक्यातील धामणदेवी या ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गाजवळ जंगलाच्या परिसरात गोहत्येचा प्रयत्न करणार्‍या ३ आरोपींना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी सहभागी असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.  या वेळी अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, बाजीराव पाटील, शिरीष सासने आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

पोलिसांच्या अन्याय्य कारवाईचा निषेध करण्यासाठी आज उत्तर रत्नागिरीत सर्वपक्षीय बंद आणि लोटे येथे मूकमोर्चा !

तालुक्यातील पीरलोटे येथे घडलेल्या गोवंशियांच्या हत्येच्या प्रकरणी पोलिसांकडे न्याय मागणार्‍या ग्रामस्थांवरच पोलिसांनी लाठीमार केला होता. यामुळे संतप्त ग्रामस्थांकडून उद्रेक घडला होता. या उद्रेकानंतर पोलिसांनी ३०० ग्रामस्थांवर गुन्हे नोंद केले.

हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये साहाय्य, तसेच जिल्ह्यात २ हेक्टर भूमी देणार ! – मुख्यमंत्री

हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांना देण्यात येणारे साहाय्य २५ लाख रुपयांवरून ५० लाख रुपये केले आहे, तसेच ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ योजनेच्या अंतर्गत भारतीय सैन्य दलातील महाराष्ट्रातील शौर्य, तसेच सेवापदक विजेत्यांच्या अनुदानात दुप्पटीने वाढ केली आहे

इयत्ता १२ वीच्या परीक्षेच्या ‘हॉल तिकीटां’मध्ये असंख्य चुका

इयत्ता १२ वीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून चालू होणार आहे; मात्र तत्पूर्वीच परीक्षेच्या ‘हॉल तिकिटां’मध्ये विद्यार्थ्याचे नाव, विषय, परीक्षा माध्यम यांविषयी असंख्य चुका आढळल्या आहेत.


Multi Language |Offline reading | PDF