हिंदु धर्माच्या विरोधात षड्यंत्रे रचली जात आहेत ! – सरसंघचालक मोहन भागवत

हिंदु धर्माच्या विरोधात अनेक दशकांपासून षड्यंत्रे रचली जात आहेत; मात्र त्यासाठी हिंदूंना आणि त्यांच्या संघटनांना संघटित करून ही षड्यंत्रे उधळून लावण्याची आवश्यकता असतांना संघ असे कुठेच करतांना दिसत नाही. याविषयी सरसंघचालकांनी सांगायला हवे !

साडेचार वर्षांत राममंदिर का उभारले नाही, याचे उत्तर भाजपने द्यावे ! – आखाडा परिषद

इतक्या वर्षांत त्याने राममंदिर का बनवले नाही, याचे उत्तर त्याने दिले पाहिजे, असे प्रतिपादन आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी केले आहे.

रामजन्मभूमी न्यासाच्या ६७ एकर भूमीवर राममंदिर उभारण्याचे काम चालू व्हावे ! – उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

२.७७ एकर भूमीच्या वादावर कुणाला याचिकांचे आपटी बार सर्वोच्च न्यायालयात फोडत बसायचे असतील, तर ते खुशाल फोडावेत; मात्र ६७ एकर भूमी कायद्याने रामजन्मभूमी न्यासाची आहे. त्यावर मंदिराच्या उभारणीचे काम चालू व्हावे……..

(म्हणे) ‘हिंदूंच्या धैर्याची परीक्षा घेऊ नये !’ – केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह

गेल्या साडेचार वर्षांत भाजपचे नेते आणि मंत्री असणारे गिरीराज सिंह यांनी अनेक प्रश्‍न उपस्थित केले आणि अनेक विधाने केली; मात्र त्या संदर्भात त्यांनी आणि त्यांच्या सरकारने प्रत्यक्षात काय प्रयत्न केले, हे ते कधीच सांगत नाहीत, हे लक्षात घ्या !

ख्रिस्तीबहुल अमेरिकेतील स्वामीनारायण मंदिरात अज्ञातांकडून तोडफोड करून मूर्तींचे विद्रूपीकरण

भारतातील मंदिरांचे रक्षण न करणारे भाजप सरकार अमेरिकेतील मंदिरांच्या रक्षणासाठी काही करील, याची अपेक्षाच नाही. हिंदूंनो, आता जगभरातील मंदिरांचे रक्षण करण्यासाठी संघटित व्हा !

संभाजीनगरमधून अटक करण्यात आलेल्या सुरळे बंधूंना जामीन संमत

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी अटकेत असलेले सचिन अंधुरे यांचे मेहुणे शुभम सुरळे आणि अंजिक्य सुरळे यांच्या घरी आतंकवादविरोधी पथक (एटीएस्), केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) वगैरे अन्वेषण यंत्रणांनी धाडी घातल्या होत्या आणि या दोघांना अटक केली होती.

नोटाबंदीमुळे बेरोजगारीचा प्रश्‍न गंभीर ! – राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाचा दावा

नोटाबंदीमुळे उपस्थित झालेल्या अडचणींविषयी आता प्रश्‍न उपस्थित होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर सरकारनेच पुढे येऊन त्याला उत्तर देणे अपेक्षित होते. तसे न झाल्याने आता नोटाबंदीच्या निर्णयावर संशयाचे वातावरण निर्माण झाल्यास चूक ते काय ?

१ सहस्र ८०० गायींचा सांभाळ करणार्‍या जर्मन महिलेला ‘पद्मश्री’

एका जर्मन महिलेला गायींचे महत्त्व लक्षात येते, ते गोरक्षकांना ‘समाजकंटक’ म्हणवणार्‍यांना कधी लक्षात येणार ?

आपत्तींवर मात करण्याचे नवनवीन मार्ग शोधले पाहिजेत ! – मुख्यमंत्री

राज्यात अल्प पाऊस होऊनही शेतीच्या उत्पादनात घट होण्याऐवजी भरघोस वाढच झाली. जलयुक्त शिवार योजनेमुळेच दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीवर मात करणे शक्य झाले. त्याप्रमाणे कृत्रिम बुद्धीमत्ता, अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा उपयोग आणि ……


Multi Language |Offline reading | PDF