संरक्षित वास्तूमध्ये धार्मिक कार्यक्रमाला बंदी असतांना नियम डावलून धर्मांधांनी लोहगडावर (जिल्हा पुणे) केला उरूस !

मांसाहार शिजवून, तसेच मलमूत्र विसर्जित करून गडाचे पावित्र्य केले भंग ! अनधिकृत उरूसाच्या विरोधात शिवप्रेमींनी पोलिसांत तक्रार करूनही उरूसाला संरक्षण देणारे पोलीस कायद्याचे पालन करणार्‍यांसाठी आहेत कि अनधिकृत काम करणार्‍या धर्मांधांच्या रक्षणासाठी ? पोलीस कुणाचे पगारी नोकर आहेत ?

चिनाब नदीवरील प्रकल्पाच्या निरीक्षणासाठी पाकचे पथक भारतात येणार

पाकच्या पथकाने हे प्रकल्प कसे नष्ट करायचे, याचा अभ्यास केल्यास आश्‍चर्य वाटू नये ! अनेक वाईट अनुभव येऊनही जर भारत अजून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्याची सवय सोडत नसेल, तर भारताची हानी कोणी रोखू शकत नाही !

भावी हिंदु राष्ट्रात कधीही कोणावरही अन्याय होणार नाही !

पूर्वीच्या काळी हिंदु राजांच्या दरबारामध्ये राजगुरु असत. ते धर्मशास्त्र, न्यायशास्त्र, अर्थशास्त्र, युद्धशास्त्र अशा सर्वच विषयांत प्रवीण असलेले आचार्य असत. ते राजाला राज्याच्या संदर्भातील सर्व विषयांत योग्य समादेश (सल्ला) देत. त्यामुळे कधीही कोणावरही अन्याय होत नसे.

हिंदु जनजागृती समितीच्या कर्नाटक राज्यातील हिंदु राष्ट्र-जागृती सभेला मोठ्या प्रमाणात विरोध !

हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या फलकावरील ‘हिंदु राष्ट्र’ या शब्दाला विरोध करण्यासाठी विदेशातून दूरभाष, तर पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून अनुमती देण्यात दिरंगाई ! शिवमोग्गा येथे सभा रहित करण्यासाठी दबाव आणला जात आहे.

पाकव्याप्त काश्मीरमधील हिंदूंचे प्राचीन शारदापीठ खुले करण्यासाठी काश्मिरी हिंदूंचे प्रयत्न

पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या हिंदूंच्या प्रसिद्ध शारदापीठासाठीही ‘कॉरिडोअर’ (मार्ग) बनवावे, – काश्मिरी हिंदूंची मागणी. हिंदूंना जो संघर्ष काँग्रेस सत्तेत असतांना करावा लागत होता, तसाच संघर्ष त्यांना भाजपच्याही राजवटीत करावा लागत असेल, तर भाजपला निवडून देऊन काय उपयोग झाला ?

रामजन्मभूमी ही हिंदूंचीच !

‘राममंदिर’ हा शब्द जरी उच्चारला, तरी हिंदूंमध्ये चैतन्य आणि उत्साह संचारतो. एवढे या शब्दात सामर्थ्य आहे. ‘राममंदिर’ हे हिंदूंच्या अस्मितेशी निगडित सूत्र आहे. १६ व्या शतकात मुसलमान आक्रमक बाबर याने अयोध्येत राममंदिर पाडून तेथे मशीद उभारली

अमरावती येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त वाहनफेरी !

२७ जानेवारीला येथील गाडगेनगरच्या मैदानावर होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचारार्थ २४ जानेवारीला शहरात भव्य वाहनफेरी काढण्यात आली. गाडगेनगरच्या मैदानापासून चालू झालेल्या वाहनफेरीची त्याच मैदानावर सांगता झाली.

महाराष्ट्रात ठिकठिकाणी दिलेल्या निवेदनांनंतर सर्वांचाच सकारात्मक प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा अभियान !

विद्वेषी ममता !

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राज्यात सध्या जे काही चालू आहे, ते हिटलरच्या दडपशाहीपेक्षा अल्प नाही ! बंगाल हा जणू व्यक्तीगत संपत्ती असल्याप्रमाणे ममता बॅनर्जी यांनी त्याचा राजकीय आखाडा बनवला आहे. …


Multi Language |Offline reading | PDF