हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती

हिंदुत्वाचा बुलंद आवाज असलेले हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन !

मदरशांमधून विद्यार्थ्यांवर बिंबवली जात आहे इसिस या आतंकवादी संघटनेची विचारसरणी ! – ‘शिया वक्फ बोर्डा’चे अध्यक्ष वसीम रिझवी,

मदरशांना कोट्यवधी रुपये अनुदान देणार्‍या भाजप सरकारला सणसणीत चपराक ! कधी वेदपाठशाळांमधून आतंकवादी निर्माण होत असल्याचे वृत्त ऐकले आहे का ? तरीही सरकार वेदपाठशाळांना नव्हे, तर आतंकवादी विचारसरणी पेरणार्‍या मदरशांना अनुदान देते, हे लक्षात घ्या !

पाण्यासाठी २६ जानेवारीला हाथरस (उत्तरप्रदेश) येथील ५० युवक स्वतःचाच लिलाव करणार

भीषण पाणीटंचाईविषयी प्रशासनाला वारंवार सांगूनही त्याच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे पाण्यासाठी येथील ५० युवकांनी प्रजासत्ताकदिनी म्हणजे २६ जानेवारी या दिवशी स्वतःचाच लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा करावा ! – राष्ट्रीय वारकरी परिषद

गुजरात सरकारप्रमाणे महाराष्ट्रातही धर्मांतरबंदी कायदा करावा. धर्मांतरित व्यक्ती हिंदु धर्मातील मागासवर्गीय, भटके, आदिवासी, वंचित या प्रवर्गातील शासकीय सवलतींचा लाभ घेऊन अन्य धर्मियांचा प्रसार करत आहेत. धर्मांतर केलेल्यांना हिंदु प्रवर्गातील आरक्षण आणि शासकीय सवलती देऊ नयेत.

काश्मीरमध्ये ३ आतंकवादी ठार

जम्मू-काश्मीरमधील शेपियां येथे सुरक्षादलाचे सैनिक आणि आतंकवादी यांच्यात २२ जानेवारी या दिवशी झालेल्या चकमकीत ३ आतंकवाद्यांना ठार करण्यात सैनिकांना यश आले. 

‘स्टोरी लिमिटेड’ या संकेतस्थळावरून हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांनी काढलेल्या भगवान शिव आणि पार्वती यांच्या नग्न चित्राची विक्री

हिंदूंनो, देवतांचे विडंबन वैध मार्गाने रोखून धर्मकर्तव्य बजावा ! परिणामकारक हिंदूसंघटन उभारल्यास हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे भंजन होण्याचे प्रकार भविष्यात कधीच घडणार नाही !

चेन्नई येथील ‘लॉयला’ महाविद्यालयातील चित्रप्रदर्शनात हिंदूंच्या देवता, प्रतीके आणि भारतमाता यांची विटंबना

केवळ क्षमायाचना नको, तर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे ! अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांचे अशा प्रकारे विडंबन करणार्‍याचे धारिष्ट्य या ख्रिस्ती शिक्षणसंस्थेच्या महाविद्यालयाने केले असते का ? हिंदू सहिष्णु असल्यानेच कोणीही उठतो आणि हिंदु धर्मावर चिखलफेक करतो !

(म्हणे) ‘समाजव्यवस्थेपेक्षा धर्मव्यवस्थेचा पगडा वाढू पहातोय !’ – कवयित्री नीरजा यांची मुक्ताफळे

आपल्या समाजाने आणि देशाने असहिष्णू प्रतिमा आता दुरुस्त केली पाहिजे. कारण समाजव्यवस्थेपेक्षा धर्मव्यवस्थेचा पगडा वाढू पहातोय अशी मुक्ताफळे कवियत्री नीरजा यांनी कल्याणमध्ये उधळली. ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ आणि ‘कल्याण सार्वजनिक वाचनालय’ यांच्या वतीने आयोजित ४४ व्या ‘महानगर मराठी साहित्य संमेलनाचे’ उद्घाटन नीरजा यांच्या उपस्थितीत २० जानेवारीला महाजनवाडी सभागृहात करण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF