मेहूल चोकसी यांनी भारतीय नागरिकत्व सोडले

पंजाब नॅशनल बँकेतील तब्बल १४ सहस्र कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील फरार आरोपी, तसेच हिरे व्यापारी मेहूल चोकसी यांनी भारतीय नागरिकत्व सोडले. चोकसी यांनी एंटीगुआ येथील भारतीय उच्चायुक्तालयात २१ जानेवारी या दिवशी स्वतःचे पारपत्र जमा केले.

पोलिसांशी असभ्य वर्तन करणार्‍या ५ धर्मांधांना अटक

कर्तव्यावर असतांना वांद्य्राकडे जाणारी टॅक्सी थांबवून पडताळणी केल्याच्या कारणावरून झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर ४ धर्मांध सहकार्‍यांसमवेत येऊन धर्मांध टॅक्सीचालक इब्राहिम शेख याने भररस्त्यात वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई ज्ञानेश्‍वर मेश्राम यांना शिवीगाळ केली……

उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकार साधू-संतांना निवृत्ती वेतन चालू करणार

भाजपशासित उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकार साधू-संतांना निवृत्ती वेतन चालू करणार आहे. वृद्धाश्रम पेन्शन योजनेच्या अंतर्गत उत्तरप्रदेशमधील सर्व जिल्ह्यांत कक्ष उभारून योजनेत सहभागी होण्यासाठी साधू-संतांना आवाहन करण्यात येणार आहे.

अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर मोर्चा काढलेल्या शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य

‘भूमी अधिग्रहण करू नये’ यांसह विविध मागण्यांसाठी सातारा ते मंत्रालय असा अर्धनग्न अवस्थेत शेकडो किलोमीटर चालत मोर्चा काढलेल्या शेतकर्‍यांच्या ७० टक्के मागण्या मान्य केल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी २१ जानेवारी या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.

उपाहारगृहातील अन्न : जिभेचे चोचले कि आरोग्यहानी ?

अन्नपदार्थ शिजवण्यापासून ते प्रत्यक्षात ग्राहकांना देण्यापर्यंत घालून दिलेल्या विविध निकषांचे पालन न केल्यामुळे मुंबई येथील २३९ उपाहारगृहांचे अनुमतीपत्र अन्न आणि औषध प्रशासनाकडून रहित करण्यात आले आहे.

चंद्रपूर येथे जनावरांची तस्करी रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलिसाला गाडीखाली चिरडले !

येथे वाहनातून होणारी जनावरांची तस्करी रोखण्याचा प्रयत्न करणारे पोलीस शिपाई प्रकाश मेश्राम यांच्या अंगावरच गाडी घालून त्यांना चिरडल्याची घटना नागपूर-चंद्रपूर महामार्गावर घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

आदिवासींपर्यंत सरकारी योजनांचे लाभ का पोहोचत नाहीत, याविषयी जाणून घ्या ! – उच्च न्यायालय

आपल्याकडे साधनसामुग्री, पैसा, आधुनिक वैद्य आणि विज्ञान असे सर्व काही आहे. केवळ आदिवासी भागांपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्याची आवश्यकता आहे. आजही मेळघाटासारख्या आदिवासी भागांत कुपोषणाने बालमृत्यू का होत आहेत ?

लक्ष्मणपुरी येथे नातवाच्या मृत्यूची तक्रार नोंदवून घेण्यासाठी ७५ वर्षीय आजीकडून पोलिसांची पाय धरून विनवणी !

स्वतःच्या नातवाच्या मृत्यूची तक्रार नोंदवून घेण्यासाठी ७५ वर्षीय महिलेला ठाणे अंमलदाराचे पाय धरून विनवणी करावी लागल्याची अत्यंत संतापजनक आणि लज्जास्पद घटना येथील गुडम्बा भागात घडली.


Multi Language |Offline reading | PDF